Skip to content

ती एक चूक सुधारण्याची पुन्हा संधी !!

ती एक चूक सुधारण्याची पुन्हा संधी!


शशी वेळेकर

(समुपदेशक)


हल्लीच एका ४५ वर्षीय व्यक्तीशी तंबाखू सोडवण्या संदर्भात बोलणे झाले त्या संदर्भातील केस पुढीलप्रमाणे.

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी मित्रांसोबत पहिल्यांदाच तंबाखू खाल्ली होती, त्यावेळी चव तर खराब वाटली पण मित्र खातात तर आपण खायला हरकत नाही आणि तसे पण घरात वडील तंबाखू खाताताच म्हणजे नक्कीच यापासून काहीतरी मिळतं असावं.

सुरवातीला दररोज मित्रांसोबत १-२ वेळा मज्जा म्हणुन खायचो. हळुहळु या १-२ वेळेचे प्रमाण वाढतच गेले सुरवातीला मित्र तंबाखू द्यायचे मात्र आता स्वतः तंबाखूची पूडी विकत घ्यावी लागली. विकत घेतलेली पुडी कुठे ना कुठे लपून ठेवावी लागत असे, मनात भीती कायम होती जर कधी कोणी तंबाखू खाताना पकडलं तर काय होईल?

पण ३ वर्षे तर तसं काही झालं नाही पण त्यानंतर मात्र माझ्या ह्या सवयी विषयी कोणीतरी घरी सांगितले याविषयी विचारले असता सुरवातीला तर नाहीच बोललो पण नंतर खरं सांगावच लागलं आता तर पालकांना पण माहिती पडलं म्हणुन बाहेर तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढले आणि आता दिवसाला एक ते दीड पुडी तंबाखू खायला लागलो, पण पालकांसमोर कधीच खाल्ली नाही.

आता तर प्रत्येक कामाच्या आधीची जागा तंबाखू ने घेतली होती सकाळी उठलो की फ्रेश होण्यासाठी तंबाखू, चहा नंतर, जेवण झाल्या नंतर, कॉलेज ला जाताना, कामावर जाताना अशा सर्व ठिकाणी तंबाखूची गरज भासायला लागली आणि शेवटी मलाच या तंबाखूचा कंटाळा यायला लागला.

पहिल्यांदा तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला तर २-३ दिवस राहिलो पण पुन्हा तंबाखू खाणे सुरू झाले, पुन्हा तेच प्रमाण पुन्हा तीच तंबाखू आज वयाच्या ४५ वर्षा पर्यंत कमीत कमी १२-१५ वेळा तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश काही मिळाले नाही.

प्रत्येक वेळी बेचैनी पणा, चिडचिड पणां, राग येणे, अस्वस्थ वाटणे, डेक दुखणे, एकाकी वाटणे, काहीतरी हरवल आहे असे वाटणे या सारखे त्रास व्हायचे आणि मग पुन्हा तंबाखू खाण्याचा मार्ग निवडायचो.

मनात नेहमी भीती होती ती म्हणजे कॅन्सर होण्याची आणि आता तर तंबाखू खाऊन थुंकताना स्वतःचीच लाज वाटते, मला पाहून माझ्या मुलांनी सुद्धा खायला सुरावत केली तर जसं मी माझ्या वडिलांना पाहून तंबाखू खाण्याची सुरवात केली होती याची पण भीती वाटते.

माझी पत्नी आणि मुलं सुद्धा माझ्या ह्या तंबाखू खाण्याचा सवयीचा तिरस्कार करतात अनेकदा तर वाद विवाद सुद्धा झाले आहे पण तरी सुद्धा काहीच तोडगा निघाला नाही,त्यांच्या समोर खाताना मला स्वतःचीच लाज वाटते आणि मी स्वतःचाच तिरस्कार करतो.

वरील केसच्या संदर्भात तंबाखू विषयी सविस्तर माहिती देऊन सोडवण्या संदर्भात उपाय व औषध देण्यात आले ज्याद्वारे तलफ कमी करण्यात आली.

शरीरातील निकोटिनचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करावे या संदर्भात योग्य आहार सांगितले.

तंबाखू द्वारे शरीरात गेलेले केमिकल्स शरीराच्या बाहेर काढण्यासाठी काय करावे या संदर्भात योग्य ती माहिती दिली.

यापूर्वी तंबाखू सोडतांना कोणकोणत्या चुका झाल्या होत्या व त्या आता कशा प्रकारे सुधारता येतील या विषयी माहिती दिली.

तंबाखूविषयी समाजात असलेले काही गैरसमज पुढीलप्रमाणे

१) तंबाखू खाल्ल्यानंतर अन्न पचन होते.
२) तंबाखू खाल्ल्याने दातांचे दुखणे बरे होते.
३) तंबाखू खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते.
४) तंबाखू खाल्ल्यामुळे रात्रभर जागण्यास मदत होते.
५) तंबाखू खाल्ल्यामुळे काम करण्यास ऊर्जा मिळते.
६) तंबाखू खाल्ल्यामुळे पोट साफ होते.

या सारखे अनेक गैरसमज समाजात आहे व आपण सुद्धा यासारख्या गैरसमजुतीला बळी पडतो.

तंबाखूमुळे होणारे आजार

१) तोंडाचा / घशाचा कॅन्सर
२) Heart Attack
३) High Blood Pressure
४) लकवा मारणे.
५) रोग प्रतिकाशक्ती कमी होणे.
६) दात खराब होणे/ हिरड्या कमजोर होणे.
७) नजर कमी होणे.
८) स्मरणशक्ती कमी होणे.
९) नपुंसकता येणे (पुरुषांमध्ये) / वंध्यत्व येणे ( स्त्रियांमध्ये)

तोंडाचा कॅन्सर होण्यापूर्वीची काही लक्षणे

१) तोंडामध्ये ४ पेक्षा कमी बोटं जाणे.
२) तोंडामध्ये लाल डाग होणे.
३) तोंडामध्ये पांढरा डाग होणे.
४) जेवतांना जास्त तिखट वाटणे.
५) जेवतांना तोंडात जळजळ होणे.

तंबाखूविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीप्रमाणे

१) तंबाखूत ७००० प्रकारचे रसायने असतात त्यापैकी ६९ रसायनामुळे आपल्याला तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

२) तंबाखूत निकोटिन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे आपल्याला वारंवार तंबाखू खाण्याची तलफ लागते.

३) भारतात दर ६ तासाला एका व्यक्तीचा मृत्यू तोंडाचा कॅन्सरमुळे होतो आणि त्याचे मुख्य कारण तंबाखू असते.

 


तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा, बिडी, सिगरेट किंवा कोणतेही तंबाखू जन्य पदार्थ सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

??

क्लिक करा

1 thought on “ती एक चूक सुधारण्याची पुन्हा संधी !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!