मनोभावना
राजदीप कुलकर्णी
मन आणि भावनांचं खूप जवळच नाते आहे.
मन आहे तर भावना आहेत आणि भावना जाग्या आहेत म्हणून मन जिवंत असतं..
जर भावना नसत्या तर मनाला कोणीच विचारले नसतं.भावना मनातच निर्माण होतात आणि मन शब्दवाटे त्या प्रसूत करतो..
आपण खूपदा म्हणतो की, ह्याला काही मनच नाही, माझ्या भावना समजूनच घेत नाही, निव्वळ दगड आहे..
आपण काही पशु पक्षी नाही …
पण खरंतर ते सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करतातच.आपल्याला कधी कधी त्या समजत नाही इतकंच. आपल्याला तर निर्सगाने वाचेची, शब्दांची देणगी दिली आहे.आपण तर किती सहज भावना व्यक्त करू शकतो। पण..
हा पणच नेहमी आपल्या भावना व्यक्त करण्याचा आड येतो.आपला अहंपणा, दुसरा समजून घेणार नाही किंवा तो नाराज होईल ही वृत्ती आणि स्वतःमध्ये असणारा काहीसा न्यूनगंड हे आपल्या भावना व्यक्त करण्यात असलेले अडथळे असतात.
आजकाल डिप्रेशन, एकाकीपण आणि स्वत्व विसरणे ह्या समस्या खूप कॉमन दिसतात. मग मनुष्य टोकाच्या भूमिकेत जातो आणि स्वतःला संपवून घेतो.
मनुष्य प्राण्याला निसर्गाने अजून एक वरदान दिले आहे जे अन्य कोणत्याही प्राण्याला नाही मिळालं. ते म्हणजे हास्य? निर्मळ हास्य..आपण स्वतःला कधी तरी एकदा प्रश्न विचारावे की शेवटचं खळखळून कधी आपण हसलो??..
रोज अगदी 10 मिनिटं जरी आपण मनापासून आणि दिलखुलास हसलो तरी सगळा स्ट्रेस दूर होतो असे संशोधक सांगतात..
चला तर मग रोज कोणत्याही फालतू जोक ला हसत जा, फालतू कॉमेडी शो ला हसत जा, अगदीच नाही जमलं तर स्वतः च्या मुर्खपणावर,पूर्वी केलेल्या क्षुल्लक चुकांवर हसत जावा☺️☺️
हे सगळे फुकट मिळते आणि त्यानं आपलं काही नुकसान तर नाहीच होत पण आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते हे मात्र नक्कीच???
आपलं मन आणि आपल्या भावना जर कायम जागृत ठेवायचं असेल तर हा छोटासा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.हो न??


