Skip to content

व्यक्त व्हा ! मुक्त व्हा !!

व्यक्त व्हा ! मुक्त व्हा !!


शिवाजी भोसले


प्रत्येक व्यक्तीचं जीवन दिवसेंदिवस गतीमान होत चाललयं. एकतर ते गतीमान होत असावं. विंâवा गतीमान केलं जात असावं. जीवन गतीमान होण्याचं नेमक कारण तरी काय असावं? याचं उत्तर प्रत्येकाला माहिती असतं.

पूर्वी नव्हतं ते आताचं कसं गतीमान झालयं? या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. ऑफिस, नोकरी, व्यवसाय, शेती याकरिता झटणं आणि झगडणं असतं. ते टिकविणं.. वाढविणं.. आणि वाचविण.. यातूनच जीवन अधिक गतिमान झालं असावं.

जीवनात जगण्यासाठी प्रत्येकाला पोट भरावचं लागतं. त्यासाठी काहीतरी करावचं लागतं. पोट भरण्यासाठी काहीचं केलं नाही, असं होत नाही. निदान खावं तरी लागतचं ना… आणि हे खायचं म्हटलं तर त्यासाठी काहीतरी करावचं लागतं.

प्रत्येकाकडे जीवनभर पुरेल इतक तरी सध्याच्या काळात साठविलेलं नसतं. ती आवश्यकताही सद्यस्थितीत वाटत नाही. पूर्वी तसं करावं लागतं होतं, ती आवश्यकता होती. आता साठवूण ठेवणं अशक्य आहे.

एकीकडे जीवन जगण्याची आशा, अनंत ध्येय्य, जगण्याची उम्मेद, तर दुसरीकडे मानवाचं दुःख, ताणतनाव, यातना, जीवनात आलेलं नैराश्य, हातातून निसटून गेलेले क्षण पुन्हा हेवेसे असतात, पण ते शक्य असतं का? हळुवार निसटलेल्या क्षणांना परत आणता येतं का?

जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्तीला दुःख, यातना, ताणतणाव, चिंता, नैराश्य येतचं. आणि ते येणंही आवश्यक असतं. ते नसलं की जीवन अधुरचं असतं. त्याचं असणं महत्वाचं असतं. पण् ते जीवघेणं नसावं. ते कायमचं नसतं, काही क्षणाचं असतं. त्याचं थांबण क्षणभर असतं.

पण मनाला चटके देणारं असतं. दुःख, यातना, भावभावना, ताणतणाव, चिंता, नैराश्य काही क्षणासाठी येतं पण् संपुर्ण जीवनचं व्यापुन टाकतं. त्याचं व्यापुन टाकणं अधिकाधिक मनाला खात जातं.

व्यक्तीचं दुःख, यातना, ताणतणाव, चिंता, नैराश्य यासोबतचं का नातं जोडलं जातं असावं? ते सोडून माणसांना जगता येवू शकता का? मानवी जीवनात त्यांच स्थान काय? असे कित्येक प्रश्न प्रत्येकांसमोर उभे आहेत. आणि या प्रश्नांचं उत्तर शोधणं खूप कठिण झालयं.

प्रत्येक घटनेला, माहिती, बाबींना दोन विंâवा त्यापेक्षा अधिक बाजू असतात. तसचं जीवनाचं आहे. जीवन हे एकांगी चालूच शकत नाही. त्याची असंख्य कारणं आहेत. ती शोधणं आवश्यक आहेत. यासोबतचं आनंद, सुखासोबत दुःख चालत येत असतं. त्याला कवटाळायचं नसतं, त्याला बाजूला सारायचं आणि पुढे चालायचं, हेचं खरं जीवन असतं.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं दुःख, यातना, मनातलं सांगायचं असतं. मन मोकळ करायचं असतं. मत मांडायचं असतं. ते व्यक्त होणं आवश्यक असतं. पण् ते व्यक्त करायचं कुणाकडे? ऐकुण घेणारं कुणीचं नसतं. प्रत्येकाला वाटतं आपलं ऐकलं जावं. मात्र ऐकायचं कुणालाचं नसतं. कुणीतरी आपलं ऐकावं असं वाटतं तर इतरांचंही ऐकलं पाहिजे. आणि ही सुरूवात स्वपासून करावी.

प्रत्येकाचं मत आणि मन व्यक्त होणं आवश्यक आहे. ते मांडणं गरजेचं असतं. मनातं असलेलं मनात दडवून ठेवणं खूप कठिणं असतं. ते दडवावं तरी किती? आणि कुठवर दडवावं? मनातलं जितवंâ दडवलं ते तितकचं बाहेर पडतं. त्यामुळे मनात दडवून ठेवणं अशक्य असतं. ते रित करावचं लागतं.

मनात असलेलं अधिक दडवून ठेवलं की मन अधिक खचून जातं. मनाचं खचलेपण अधिक होत. मानवी मनास, भाव भावनांना साचलेपण येतं. मन मनातचं अधिक भारी होत आणि डोळ्याच्या वाटेने बाहेर पडतं. डोळ्यात साठविलं जातं. मनात असलेलं बाहेर पडणं आवश्यक असतं. साठवणलेलं रित होणं आवश्यक आहे. ते रित कराचं !

मन व्यक्त झालं तर भावभावना, यातना, तनावातून मुक्त होता येतं. मुक्त व्हायचं असेल तर व्यक्त होणं गरजेचं ठरतं. व्यक्त झालं तर मुक्त निश्चित होता येतं. त्याकरिता बोलतं होणं गरजेचं ठरतं. व्यक्त होणं म्हणजे खचणं नव्हे तर जीवनाला काहीतरी नवं देण्यासाठी, नवं अंकुरण्यासाठी, बहरण्यासाठी एकप्रकारचं पेरणंचं असतं.

अनेकांना मुक्त व्हायचं असतं पण् व्यक्त होता येत नसतं. त्यांचं मनाचं खोळंबलेपण मनालाचं अधिक खात जात. मनास, भावनास अधिक खालावत जातं. मनाचं खालावणं, खचंत जाणं खूप गंभीर असतं. व्यक्त होण्यासाठी तसं एकुण घेणारं कुणी असावं लागतं.

जवळचं कोणीचं नसनं, हे पण अव्यक्त होण्याचं कारणं असावं. असं का होतं? आपलं ऐकण्यासाठी कुणीच का नसावं? याचा प्रत्येकांनी विचार करणे आवश्यक आहे.

आपणं व्यक्त व्हावं आणि इतरांनी अव्यक्त रहावं असं नाही. तर त्यांनीही व्यक्त झालं पाहिजे. दोघांनीही व्यक्त झालं तर मनाचं दडपण, ओझं कमी होत जातं. हे ओझं कमी करावं असं वाटतं तर हक्काचं कुणीतरी असावं लागतं.

हक्काचं कुणीचं नसलं की व्यक्त होता येत नसतं. आणि व्यक्त व्हावं ही कसं? बोलण्यास कुणीचं नसलं की व्यक्त कुणाकडे व्हावं? विश्वासाचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं कुणीतरी असावं लागतं ना… हक्काचं असलं की केव्हाही व्यक्त होता येतं.

… पण हक्काचं कुणीचं नसलं आणि व्यक्त झालं तर पुन्हा नव्या समस्यांना, संकटांना सामोरं जावं लागतं. त्याकरिता व्यक्त होण्यापूर्वी समोरची व्यक्ती भावनांना जपणारी आणि समजून घेणारी आहे का? हे आवश्यक तपासून पहावं. प्रत्येकाकडे औषणं मिळतचं असं नाही पण् मिठ नक्कीचं मिळतं. आणि भळलेल्या जखमेला बरं करता यावं याकरिता औषधचं हवं, नव्हे की मिठ..

दुःख, यातना, तानतनाव, भावभावना, नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्यांना शिताफिने बाहेर काढण्याचं असतं. त्यांच्या मनाचं, भावनाचं, विचारांचं आणि एवंâदरीत जीवनाचं ओझं हलक करायचं असतं. मनाचं ओझं एकदा हलवंâ झालं की जीवनाचं जगणं अधिक सुदर होत जातं.

‘जगा आणि जगू द्या’ ही विचारप्रणाली जीवनात प्रत्यक्ष साकारतांना अनेकांचं जीवन सुंदर व्हावं, याकरिता प्रत्येकाचं जगणं असावं. प्रत्येकांनी बोलत रहावं, सातत्याने व्यक्त होत रहावं. व्यक्त झालं की मुक्त होता येतचं. चला प्रत्येकाचं जीवन सुंदर करण्याकरिता व्यक्त व्हावं ! मुक्त व्हावं !



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!