Skip to content

आयुष्य काय आहे ? ते थांबल्यासारखे का वाटते ??

आयुष्य काय आहे ? ते थांबल्यासारखे का वाटते ??


आपलं मानसशास्त्र टीम


प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो, ज्याक्षणी आपण स्तब्ध होतो. आत्मसात करण्यासाठी.. आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि नीट समजून घेण्यासाठी..

काय आहे हे जीवन ??

आपल्या जगण्याचे नक्की उद्दिष्ट काय ? किंबहुना आपण खरोखरच जगतोय कि निव्वळ अस्तित्वामात्र आहोत. असाही प्रश्न आपल्याला स्तब्ध करतो. काहींना जीवनाच्या अगोदरच्या टप्प्यावर याची जाणीव होते तर काहींना उशिराने आणि काहींना तर कधीही नाही.

आपण एका जीवघेण्या स्पर्धेमध्ये बेभान होऊन नुसते धावत आहोत आणि आपल्याला जे योग्य वाटते, ते काही वेळा विचार न करता देखील आपण करीत असतो. अर्थात त्यात वाईट काही नाही. बहुतांश वेळा, आपण जे काही करीत असतो, त्यात आपल्याला आनंद असतो. पण काही वेळा मात्र रितेपण जाणवते.

इतर कुणीही नाही तर आपणच आपल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो. कसे जगायचे आणि कोणत्या समाजात जगायचे, केवळ याचीच निवड आपण करतो असे नाही, तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत आपणच महत्वाचे निर्णय घेत असतो.

आयुष्य हे काही ओझे नाही. हा सारा खेळ आपल्या मनाचाच असतो. आपणच आपल्या मनामध्ये अडथळे उभे करत असतो आणि त्याच्या भिंती मग सातत्याने उंच होत राहतात. आणि मग बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या विकासाला आपणच मर्यादा घालून घेतो.

वस्तुतः सारे काही आपल्या मनःस्थितीवर अथवा आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर डोंगरही पार होऊ शकतात. जीवनाच्या या वर्तुळात आपणच आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांमध्ये अडकलेलो असतो.

उच्चशक्ती हा जणू मंत्र आहे. आनंदी आणि आपल्याला खुल्या मनाने जे जे काही करावेसे वाटते, ते करण्यासाठी इच्छाशक्तीच आपल्याला पुढे घेऊन जाते. आणि आपण जेव्हा आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपल्या प्रवृतींमध्ये बदल झालेला असतो आणि ताणतणाव हळूहळू कमी झालेले असतात. मन आनंदाने भरलेले असते.

काही वेळेस आयुष्य आपल्याला त्याच-त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा करण्यास प्रवृत्त करीत असते. पण आपल्याला तेच ते करायचे नसते. परंतु आपल्याला ते करावे लागत असते.

तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का कि, असे का होत असावे ?

निसर्ग आपली या माध्यमातून सूक्ष्म परीक्षा घेत असतो आणि आपल्याला शिकवायचा आणि सांगायलाही प्रयत्न करत असतो. परंतु अनेकदा असे होते कि आपल्याला हे संकेत कधी लक्षातच येत नाहीत आपण बहुतांश वेळेला अनावश्यक विचार, क्रोध आणि नैराश्य यांनी भारलेले असतो. जर आपण त्यांचा अधिक खोलात जाऊन विचार केला, तर आपल्या असे लक्षात येईल कि आपल्याला ज्या गोष्टी करण्याची इच्छा नसते, त्या गोष्टी कराव्या लागतात.

त्यामागे देखील अंतिमतः आपल्यालाच लाभ मिळवून देणारे एक वैश्विक कारण असते. अहंकाराने भारलेल्या माणसाला हे सूक्ष्म सत्य क्वचितच समजून जाते. जीवनातील प्रत्येक आव्हान आणि कृती पूर्णतः झोकून देऊन कराल, तेव्हा तेज:पुंज अशा आनंदाचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल.

प्रत्येक जबाबदारी, नातेसंबंध, अपयश यांचा खुल्या मनाने स्वीकार करायला हवा. जेणेकरून तुम्ही त्याचा स्मितहास्यासह अनुभव घ्याल आणि तुमच्या हृदयात खोलवर असलेल्या भावनेचा आनंदाने स्वीकार कराल.

क्षणभर थांबा, विचार करा, आत्मसात करा आणि कृती करा.

सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्याची इच्छाशक्ती, प्रत्येक परिस्थितीमध्ये दुसर्यांनाही संशयाचा फायदा द्यायची तयारी आणि सदैव नम्र राहणे या गोष्टी तुम्हाला तुमच्यातील सौंदर्याचा शोध घेण्यासाठी, तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट समजून घेण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वतःच्या आनंद शोधासाठी खूप मदत करतील.

तुमचा अहंकार जी होष्ट करण्यापासून तुम्हाला अडवत असतो. ती गोष्ट जर तुम्ही करून पाहिलीत, तर तुम्हाला आनंदाची वेगळी अनुभूती येईल. मनापासून केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षण मनापासून आनंदाने अनुभवाल आणि संपूर्णतः आनंदी जगण्याचा प्रयत्न कराल.

हेच परिपूर्ण जीवन आहे. आनंदाने जगणे….सदैव !!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!