Skip to content

हा लेख तुमचं आयुष्य बदलून टाकण्यास भाग पाडले!

तुमचे आयुष्य बदलवून टाकणारा लेख


अश्विनीकुमार


का कधी कधी आयुष्यात परत तीच परिस्थिती समोर येते?

परीक्षेत अपयश, प्रेम भंग, घटस्फोट, उद्योग व्यवसायात अपयश किंवा आपल्या जे आयुष्य नको आहे ते आपण अनुभवत असतो असे का होते? बहुतांश लोक पहिल्याच अपयशात हार मानतात व परत प्रयत्न नाही करत, काही लोक कालांतराने प्रयत्न करायला लागतात. काहींचा दुसर्या प्रयत्नाचा कालावधी हा अनेक वर्षांनंतर चा असतो त्यानंतर देखील त्यांना तोच अनुभव येतो, असे का?

जर तुम्हाला अपयश किंवा नकारात्मक अनुभव आले तर तुम्ही त्याला समूळ काढून टाकता कि त्याला खात पाणी घालत बसता जेणे करून त्या बी चे रोपट्यात व रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर करून टाकता? आता तुम्हाला समजलेच असेल कि तुम्ही कुठे चुकता ते.

आयुष्यात प्रत्येकाला अपयश हे येतेच फक्त यशस्वी लोक प्रत्येक अपयशानंतर नवीन यशाचे बी पेरण्यासाठी जुन्या अपयशाचे संपूर्ण रोपटे हे आत्मविकास अध्यात्मिक किंवा वैज्ञानिक मार्गाद्वारे मुळासकट काढून टाकतात, जर थोडे मूळ कुठे उरले असेल तर काही वर्ष निगराणी करून एक एक मूळ कायमस्वरूपी काढून टाकतात त्यामुळेच ते यशाचे आयुष्य अनुभवत किंवा जगत असतात.

ठीक आहे परीक्षेत अपयश आले, मशागत करा, मुळासकट ते रोपटे उपटून टाका. त्याजागी आत्मविकासाच्या सहाय्याने नवीन परीक्षा पास होण्याचे बी पेरा मग बघा कसे तुम्हाला शिक्षणाचा वटवृक्ष पदव्यांचे फळ देतो ते.

प्रेम भंग झाला ठीक आहे, निराश होण्याचे कारण नाही आहे. परत आपल्या हृदयाची मशागत करा, हृदय भंगाची रोपटे हि समूळ उपटून टाका. परत प्रेमाचे बी पेरा व मोठे करा तुमच्या प्रेमाचा वटवृक्ष. चाखा त्या प्रेमाची फळे.

उद्योग व्यवसायात अपयश आले आहे? घ्या आत्मविश्वासाची कुरदळ हातात व खोदून काढा अपयशाच्या रोपट्याची मुळे. परत यशस्वी जागतिक उद्योग व्यवसायाचे बी पेरा व आपल्या उद्योग व्यवसायाच्या वटवृक्षाच्या शाखा ह्या पसरवा जगभर.

नको असलेल्या आयुष्याची फळे तुम्ही खात आहेत? कशाला? कि तुम्हाला ती कडू फळे गोड लागत आहेत म्हणून खात आहात? नाही ना, मग मुळासकट उपटून टाका ते रोपटे किंवा वटवृक्ष. पेरा तुम्हाला हव्या असलेल्या परिस्थितीचे अनुभवाचे बी, द्या त्याला आत्मविकासाचे खात पाणी व जगा तुम्हाला जसे आयुष्य पाहिजे ते.

ती व्यक्ती इथेच चुकते कि इमारत नवीन बांधताना कि जुन्या इमारतीचा पाया पूर्णपणे खोदुन काढत नाही. त्यामुळे त्या वरील उभी केलेली इमारत हि डळमळीत असते, ती कधीही पडते. जितकी इमारत उंच तितकेच नुकसान प्रचंड.

जितके भूतकाळापासून शिकले आहात तितकेच पुढे घेवून जा व बाकी भूतकाळाच्या खड्ड्यात तसेच सोडून त्यावर आत्मविकासाची माती व मागील अनुभवाचे खत टाकून नवीन आयुष्याचा वटवृक्ष परत उभा करा.

जर तुम्हाला पाहिजे असलेल्या आयुष्याचे साम्राज्य उभे करायचे असल्यास जुन्या अपयशाच्या साम्राज्याला पूर्णपणे जमीनदोस्त करून संपूर्ण साम्राज्य तुमच्या नुसार उभे करावे लागते, त्यामध्ये तुम्ही एकजरी वीट

भूतकाळातून आहे तशी लावली तर तुमचे साम्राज्य तुमचा राजवाडा हा पूर्णपणे जमीनदोस्त होवून जाईल व त्यावर कोणीतरी दुसरा साम्राज्यवादी तुमच्या चुकांपासून शिकून स्वतःचे साम्राज्य उभे करेल.

हे वास्तव आयुष्य आहे. इथे सर्वच जन स्वतः चुका करत शिकत नाही, त्यासाठी त्यांना हजार आयुष्य देखील कमी पडतील. पण काही हुशार असतात ते दुसर्यांच्या चुकांपासून शिकतात व स्वतःच्या साम्राज्याला एकही ओरखडा न येता आपले शक्तिशाली साम्राज्य उभे करतात, हे साम्राज्य त्यांच्या चुकी मुळे कधीच नष्ट होत नाही, अपवाद नैसर्गिक आपत्ती वगळता.

विचार हे वटवृक्ष आहे तर भावना ह्या बिया आहे. प्रत्येक अपयश मनाला लावून घेवू नका. जर मनाला लावून घेतले तर तुम्ही त्या भावनेचे रुपांतर बी मध्ये करून त्याला वाढवत बसता. मग त्याचे वटवृक्ष होवून ते फळ तुम्ही चाखत बसता, ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात.

जे हुशार असतात, जागृत असतात ते बी जेव्हा पेरले जाते तेव्हाच आत्मविकासाच्या मदतीने ते बी मधून टाकतात ज्यामुळे त्यांना मुळासकट रोपटे किंवा झाड उपटण्याचे प्रचंड त्रास सहन नाही करावा लागत. जरी वटवृक्ष झाला तर तो वटवृक्ष संपूर्ण उपटताना ज्या वेदना सहन होतील त्या सहन करा कारण त्यानंतर तुम्हाला पुढील आयुष्यात इतक्या वेदना सहन करण्याची गरज भासणार नाही.

तुमचे आयुष्य हे तुम्हीच घडवत असतात. कोणीही तुमच्या जागी तुमचे आयुष्य जगू शकत नाही, ना ते तुमच्या आयुष्यातील आनंद जगू शकतात आणि नाही दुख.

मग वाट कसली बघत आहात. करा नवीन सुरवात. घ्या आत्मविकासाची कुदळ तुमच्या हातात. आणि निर्माण करा तुमचे नवीन विश्व. कारण ह्यानंतर तुम्हाला कधीही तुमच्या आयुष्यात नकारात्मक अनुभव परिस्थिती तुमच्या वाटेला येणार नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “हा लेख तुमचं आयुष्य बदलून टाकण्यास भाग पाडले!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!