Skip to content

मनाचा होणारा कोंडमारा आणि मानसशास्त्रीय कारणे.

मनाचा होणारा कोंडमारा आणि मानसशास्त्रीय कारणे.


आपलं मानसशास्त्र टीम


एक प्रयोग आहे.

१९२६ मध्ये एका पाळीव कुत्र्यावर एक प्रयोग करण्यात आला. एका चौकोनी बॉक्समध्ये सलग १ महीना कुत्र्याला ठेवण्यात आले. त्या बॉक्सची रचना अशी करण्यात आली होती की, हलकासा सूर्यप्रकाश, पुरेसे ऑक्सिजन आणि ठराविक वेळी अन्ननलिकेतून अन्न मिळेल अशी योजना आखली होती.

शी व सु करण्यासाठीही बॉक्सबाहेर ठराविक वेळी बाहेर पडण्याची सोय होती. महत्वाचे म्हणजे बॉक्सच्या खालच्या थराला कुत्र्याला हलकासा शॉक लागेल इतका अत्यल्प विद्युत प्रवाह सोडण्यात आलेला होता.

पहील्याच दिवशी कुत्र्याला आत सोडून जेव्हा विद्युत प्रवाह सुरू केला, तेव्हा कुत्र्याची बॉक्सबाहेर पडण्यासाठी अनेक हालचाली सुरू झाल्या. बॉक्सबाहेर पडता येणे शक्य नाही, हे ओळखून कुत्र्याच्या हालचाली कालांतराने कमी होत गेल्या.

आणि महीन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या हालचाली पूर्णपणे थांबल्या. कदाचित शॉक लागूनच जगायचंय हे त्याने स्वीकारले असेल.

प्रयोगाचा पहीला भाग इथे संपतो. आता दुसऱ्या भागात……

त्याच आपल्या कुत्र्याला १ महीन्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अशाच एका बॉक्समध्ये ठेवले गेले. तोच हलकासा सूर्यप्रकाश, पुरेसे ऑक्सिजन वगैरे वगैरे.

फक्त एकच बदल केला गेला. तो म्हणजे बॉक्समध्ये एक अशी जागा कुत्र्यासाठी करून ठेवली की, शॉक लागला की पटकन तो उडी मारून बॉक्सबाहेर जाऊ शकेल. प्रयोग सुरू केला.

आश्चर्य…

कुत्र्याने कोणत्याही प्रकारच्या बॉक्सबाहेर पडण्याच्या हालचाली केल्या नाहीत. किंबहुना बॉक्सबाहेर पडण्याची जागा त्याच्या समोर असूनही त्याला ती दिसली नाही.

याठिकाणी कुत्र्याची शॉक सहन करण्याची क्षमता इतकी विकसित झाली होती की, समोरचे पर्याय सुद्धा त्याला दिसत नव्हते. संशोधकांनी त्यानंतर शॉकची तीव्रता हळूहळू वाढवायचे ठरविले. त्यातही बॉक्स मधून बाहेर न येता जोरजोरात विव्हळणे, भुंकने अशा प्रतिक्रिया कुत्र्याकडून मिळाल्या.

परंतु बॉक्स बाहेर पडण्याचे एकही प्रयत्न संशोधकांना आढळले नाही. या भागाच्या तिसऱ्या दिवशी संशोधकांनी कुत्र्याला पूर्ण दिवस बॉक्सबाहेर ठेवायचे ठरविले. त्यातही शॉक अचानक बंद होणे हे त्याच्या सवय झालेल्या मेंदूला पचले नाही.

संशोधकांनी या प्रयोगामार्फत मानवी मेंदूला सुद्धा सवयींनी जडलेल्या आशा कित्येक बाबींची सिद्धता याठिकाणी दिलेली आहे.

या प्रयोगामार्फत मनात आलेले प्रश्न —-

● आपल्याही आयुष्यात आपण अशाच त्रासदायक गोष्टी (शॉक) जीवनाच्या अंगीकृत भाग मानून बसलोय का ?

● आपली सहन शक्ती जरी विकसित झाली असली तरीसुद्धा सहन करण्यापेक्षाही समोर दिसणाऱ्या वेगळ्या पर्यायांबाबत आपण मनाने आंधळे तर नाही झालो आहोत ना ?

● प्रयोगात कुत्र्याचे वर्तन संशोधक नियंत्रित करीत होते, आपल्याला तर बुद्धिमत्ता किंवा सर्वात शक्तिशाली मेंदू निसर्गाकडून मिळूनही आपण आपले जीवन काल्पनिक देव-देवतांना, बाबा-बुवांना आणि नशिबाला अर्पण करून प्राण्यांसारखेच जीवन जगतोय, असे नाही का वाटत ?

◆ आयुष्यातला शॉक जर अचानक बंद झाला, तरी त्या व्यक्तीला त्रास होतो. इथे व्यक्ती प्रतिक्रिया देत नसून तिचा सवयीने जडलेला मेंदू प्रतिक्रिया देतोय, यावर काळजी घेणार्यांनी सय्यम नको का पाळायला ?

◆ आणि आपल्या आयुष्यातला पोसिटीव्ह बॉक्स आपणच नको का ठरवायला ?



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “मनाचा होणारा कोंडमारा आणि मानसशास्त्रीय कारणे.”

  1. लग्नाच्या १७ वर्षानंतर माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याच बाहेरच लफड तिला कळत, तिला २ मुले आहेत, मुलगा आता १४- १५ वर्षाचा, मुलगी १०-१२ वर्षांची, म्हातारे सासू सासरे, आई वडील, ती मैत्रीण house wife aahe, अश्या वेळी काय करावं?
    नवर्यानी कबूल केली चूक आणि वचन दिली आशी चूक होणार नाही, पण तिच्या मनाचा कोंडमारा होतोच ना, विश्वास तर नाही ठेवता येणार, संसार मोडू पण नाही शकणार, नवऱ्यावर प्रेम आहे तीच, पण आता विश्वास नाही, अश्या वेळी तुम्ही काय सल्ला द्याल?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!