Skip to content

वाईट काळात लोकं साथ का सोडून जातात ??

वाईट काळात लोकं साथ का सोडून जातात ??


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


“वेळ चांगली असली की लोकं जवळ येतात आणि वेळ वाईट असली की लोकं ओळख सुद्धा देत नाहीत”

या पारंपारिक कचाट्यात जगणं आता सोडायला हवं…

कारण पुनः पुन्हा तीच पुनरावृत्ती होते आहे.

एक आकर्षणाचा नियम आहे, तुमच्या अवतीभवती जास्तीत जास्त सकारात्मकता असेल तर लोकं तुमच्या अवतीभवती असणारच आहे. याउलट अवतीभवती नकारात्मकता सर्वाधिक असेल आणि सारखीच असेल तर त्या कोशात थांबायला कोणाला आवडणार ??

मग लोकं सोडून जातीलच की.

म्हणून चांगली वेळ आणि वाईट वेळ याचा लोकांच्या येण्या-जाण्याशी काहीही संबंध नाही. वाईट काळातही तुम्ही समर्पकपणे सकारात्मक राहून विषय हाताळत असाल तर लोकं का सोडून जातील, पण विषय न हाताळता हताश होऊन तुमचं अवलंबित्व समोरच्याप्रति वाढतच असेल तर सोबतीला कोण उभं राहणार…

शिवाय प्रत्येकाला आपापली फॅमिली आणि पर्सनल कामे असतातच की. आणि आपल्याला सुद्धा!

येणाऱ्यांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या.

म्हणून पुन्हा असं बोलणं जाणीवपूर्वक टाळूया…की,

“चांगल्या काळात लोकं गोड बोलतात, वाईट काळात सोडून जातात!”



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!