Skip to content

सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतः दुःखी व्हाल !!

सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतः दुःखी व्हाल!


सौ. सुलभा घोरपडे


आत्ताच्या तुलनेत , पूर्वीचे आयुष्य जरा निवांत म्हणता येईल , सर्व काही मिळवण्यासाठी जी धावपळ करावी लागते , ती पूर्वी करावी लागत नव्हती . आत्ताच्या काळात तो निवांतपणा मिळत नाही , विश्रांती मिळत नाही , त्यामुळे ताणतणाव वाढत चालला आहे.

मनुष्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि वाढतच चालल्या आहेत , कामाचा ताण वाढतोय , लग्नाबद्दल मुलामुलींच्या अपेक्षा , होणाऱ्या जोडीदाराबद्दल अपेक्षा , नोकरीच्या अपेक्षा , या सर्वाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतोय आणि ताणतणाव निर्माण होत आहे.

एखादी गोष्ट मनाविरूद्ध घडली की मन निराश होते आणि निराश झालेल्या मनात नकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक विचारामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो , ताणतणावात भर पडते , मानसिक आजाराबरोबर शारीरिक आजारही डोके वर काढतात .

आपली क्षमता नसताना , काही गोष्टी स्वीकारल्यानेही ताण वाढतो . रोजच्या जीवनात अनेक घटनामुळे ताणतणावाला सामोरे जावे लागते , कित्येकदा कुटुंबातील , नात्यातील परस्पर संबंधातील संघर्षामुळेही ताण वाढत असतो .

कोणत्याही घटनेने ताण येत नसून , घडलेल्या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया असते यावर परिणाम अवलंबून असतो .

दिर्घश्वसन केल्याने , श्वास हळूहळू आत घेणे , आत घेतल्यावर थांबून हळूहळू सोडणे , श्वासावर लक्ष केंद्रित करणे याचा प्रभाव स्वताःवर चांगला होतो , छान होतो यामुळे ताण कमी होण्यास मदत होते , कोणताही आवडीचा व्यायाम केल्याने ताण कमी होण्यास मदत होते .

निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याने तसेच आवडीचे गीत , संगीत ऐकल्याने ताण कमी होण्यास मदत होते . विनोदी किस्से ऐकणे , पहाणे , हसणे यामुळे ही ताण कमी होतो . चांगले परस्पर संबंध ताण कमी करण्यास उपयोगी ठरतात.

आपल्या भावनांना दडपून न ठेवता त्यांना वाट मोकळी करून द्या , कुणाला तरी सांगा , व्यक्त व्हा . सकारात्मक राहा , आवडीच्या व्यक्तीशी बोला , वेळेचे नियोजन करा , आवडीचे छंद जोपासा अशा काही उपायांनी ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

सर्वांची मने राखण्याच्या नादात , सर्वांना खूश ठेवण्याच्या नदात स्वतः थकून जालं पण सर्वच जण खूश होतीलच असं नाही म्हणून स्वतः खूश रहा , आनंदी रहा….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतः दुःखी व्हाल !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!