Skip to content

पॉर्न फिल्म पाहण्यास उद्युक करणारी कारणे माहितीयेत का ?

पॉर्न फिल्म पाहण्यास उद्युक करणारी कारणे माहितीयेत का ?


आपलं मानसशास्त्र टीम


अश्या फिल्म्स पाहणे किंवा न पाहणे हि आज प्रत्येकाची व्यक्तिगत बाब जरी असली तरी आज घराघरात असे फिल्म्स पाहणारे चाहते मात्र वाढत आहेत, यात तिळमात्र शंका नाही. आज घरातील प्रत्येक १० पैकी ७ ते ८ सदस्य हे पॉर्न पाहतात आणि त्यापैकी ३ ते ४ सदस्यांना त्याचं व्यसन जडलेलं आहे.

तर अशा या पॉर्न फिल्म्स जरी आपल्या अवतीभवती इंटरनेट किंवा अँड्रॉइड मोबाईल मार्फत वावरत असल्या तरी शेवटी त्या पाहायच्या कि नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असलं तरी सुद्धा त्या पाहणाऱ्यांचा टक्का का वाढतोय. याचाच अर्थ हि अतिशय संशोधन करण्याची बाब आहे.

सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा असे व्हिडिओ पाहणे आजकाल मानाचे मानले जात आहे. कुणी एखादा चुकून फोटो किंवा व्हिडिओ पाहताना दिसला कि अमुक-अमुक वयात अशा गोष्टी होतंचं असतात, आम्ही सुद्धा अशा गोष्टी केल्या होत्या, असे बोलून त्या व्यक्तीला जणू आरोपीच्या कचाट्यातून टाळ्या वाजवून खाली उतरविले जाते.

पण कामासुत्र सारख्या शास्त्रोक्त रीतीने लिहून ठेवलेले अनेक ग्रंथांच्या आवृत्या असूनही आपली मानसिकता पाश्चिमात्य संस्कृती असणाऱ्या अशा व्हिडीओंकडे का बरं वळत असेल, याचा मानसशास्त्रीय पद्धतीने विचार करायला हवा.

काही प्रमुख कारणे पाहूया….

१) प्रचंड प्रमाणात केलेली जाहिरात

कामासूत्र मागे पडण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. आपल्या देशाने प्रथम जगाला काम भावना शिकवली आणि अजूनही कामासुत्र आपल्या जागी सय्यमाच्या अवस्थेत योग्यच आहे. पॉर्न व्हिडिओ म्हणजे काही शिक्षण नव्हे. पण एखादी वेबसाईटची लिंक मिळाली तर आपणच सगळ्यात जास्त आणि उत्कृष्ट रीतीने जाहिरात करायला तरबेज असतो, म्हणून ती अत्यंत कमी वेळात घराघरात पोहोचली.

२) जे झाकलंय ते पाहण्याकडे ओढा

उघडपणे दिसणाऱ्या शारीरिक अवयवांपेक्षा जे झाकलेलं आहे ते डोळ्यांनी पाहून काम भावना तृप्त करण्याचा ओढा असल्याने सुरुवातीचे पॉर्न व्हिडिओ त्या भावनेनेच पाहिले जातात आणि त्यानंतर अवास्तव लैंगिकता जन्म घेते. पूर्वी शहरात गुढग्यापर्यंत ड्रेस असला कि रोखून पाहणारी माणसं असायची. पण आता महत्वाचे पार्ट लपवून बाकी सगळं उघडं जरी असलं तरी ते नॉर्मल मानलं जातं. आणि पॉर्न व्हिडिओ मध्ये तर सर्रास अगदी सगळंच पाहायला मिळतं.

३) मनाची अस्वस्थता दूर होते

असे व्हिडिओ पाहून मनाची अस्वस्थता दूर होते, अशी मानसिकता ठेवून दिवसभर त्या व्हिडिओला चिकटून राहणारी माणसं सुद्धा चिक्कार आहेत. म्हणजेच मनातल्या अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय म्हणून असे व्हिडिओ पाहिले जातात. अगदी सहजच अगदी सहजच बायकोशी भांडण करून आलेला अमित रेल्वेच्या प्रवासात व्हिडिओ पाहताना दिसतो आणि आज असे अनेक अमित आपल्या अवतीभवती आहेत, ज्यांना आता आजूबाजूचं कसलंही भान उरलेलं नाहीये.

४) लैंगिक असमाधान

असे व्हिडिओ पाहून कित्येक मुलं-मुली वयात येण्याच्या आधीच लव्हगुरु बनलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे समाधानतेची पातळी अतिशय उच्च असल्याने आणि त्या पातळीला समाधान न मिळाल्याने तात्काळ www.com वर जाऊन उरलेली अवास्तव काम भावना तृप्त केली जाते. तसेच विवाहानंतर जोडीदाराकडून काम तृप्ती झाली नसल्यास घर, ऑफिस आणि रस्त्यावर कोठेही असे व्हिडिओ पाहिले जातात. आजकाल तर मेंदूत असं रसायनच बनलंय कि मधुचंद्राच्या रात्रीत किंवा हनिमूनला अशा व्हिडीओचा डेटा जर सोबत ठेवला नसेल त्या रात्रीचा काहीच उपयोग नाही. हे इतकं आपलं मानगुटीवर बसलेलं आहे.

५) एक लाईफ स्टाईल म्हणून

दिवसभरात एखादी सिरीयल पाहिली नाही किंवा आज क्रिकेट खेळलो नाही तर आज काहीतरी गमावल्याची एक कमालीची भावना मनात असायची तसंच दिवसातून एक पॉर्न पाहिल्याशिवाय आता रहावतंच नाही. रात्री डाउनलोडींगला टाकून झोपणे आणि दुसऱ्या दिवशी काहीही करून वेळ काढून ती पाहणे हे आता आयुष्य बनलं आहे. त्यापैकी आवडलेला स्टॉक जमा करणे आणि मित्रांना पाठवून फुशारकीची टिमकी मिरविणे हे असं आता स्वतःला प्रेसेंट करणं खूप भारी वाटायला लागलं आहे. तसेच जबरदस्ती जोडीदारालाही पाहायला भाग पाडले जाते.

अशी हि ५ प्रमुख कारणे आज आम्ही शोधली. तुम्ही सुद्धा खाली कमेंट करून या मागील मानसशास्त्रीय कारणे सांगू शकता. पण एक मात्र नक्की कामासुत्र किंवा आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी लैंगिकतेवर किंवा लैंगिक जीवनावर निरनिराळे साहित्य लिहून आयुष्य समाधानी करण्याचा प्रयत्न केला, ते साहित्य वाचणे तर सोडाच पण त्यांच्या नावापेक्षाही आज आपल्याला पाश्चिमात्य पॉर्न इंडस्ट्रीमधल्या नटा-नटिंची नावे माहिती आहेत…..

हि आपल्यासाठी खूप शरमेची बाब असेल……



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पॉर्न फिल्म पाहण्यास उद्युक करणारी कारणे माहितीयेत का ?”

  1. Shrikrishna Inamdar

    सिनेमात आपण पाहतो की एक पोलीस ऑफिसर सगळ्या गुंडांना वठणीवर आणतो, आणि ते सगळ्यांना आवडते. 1983 वर्ल्ड कप किंवा तत्सम जिंकलेल्या मॅचेस सगळे नेहमी आनंदाने पाहतात. पाडद्यावरील प्रणय, संकटांवर मात करणारा हिरो ही अशी दृश्य पहाण्यामागच एक मनोवैज्ञानिक कारण म्हणजे जे आपण करू इच्छितो ते पडद्यावर पाहून समाधान मिळवणे किव्वा आपणच ते करत आहोत असे अंशतः मानणे. या मुळेच पॉर्न विडिओ सगळे पाहतात. हे पूर्वी इतकं सहज पाहता येत नव्हतं. पण आता त्याची विपुल आणि सहज उपलब्धता हे सुद्धा पॉर्न विडिओ च्या हल्ली इतक्या वापराचे कारण असू शकते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!