Skip to content

आयुष्यातले चांगले-वाईट बदल स्वीकारावेच लागतात.

दिल है छोटासा , छोटी सी आशा..


मधुश्री देशपांडे गानू


तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतो?? .. छोट्या छोट्या गोष्टींनी , विचारांनी , कृती ने , बदलाने तुम्ही घडत जाता.. प्रगल्भ , समृध्द होत जाता. अचानक नियतीने घडवलेले तुमच्या आयुष्यातील चांगले वाईट बदल तुम्हाला स्विकारावेच लागतात.

पण जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जाणीवपूर्वक चांगले बदल करता तेव्हाच तुम्ही एक माणूस म्हणून समृध्द होता..

अगदी रोजच्या लहान सहान सवयींनीही तुमचं आयुष्य बदलतं…तुमच्या दिवसाची सुरूवात तुम्ही कशी करता.. तुम्ही स्वसंवाद कसा साधता..

शारिरीक स्वास्थ्य त्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य कसे सांभाळता.. अगणित येणार्या विचारांचे सुनियोजन कसे करता. प्रत्येक विचार सकारात्मकच असावा अशी सवय  नव्हे शिस्त मनाला  लावून घ्यावी लागते.

दिवसभरात किती वेळ वाचनाला देता. काय वाचता.. लिखाणाची सवय असेल तर सातत्य हवे.

तुमची सकारात्मक ऊर्जा तुम्ही कोणासमोर व्यक्त करता.. हे तर फार महत्वाचे आहे. नकारात्मक विचार करणारी व्यक्ती तुमची ऊर्जा कमी करते. दिवसभरात तुमच्या सानिध्यात येणार्या व्यक्ती तुम्हाला माणूस म्हणून किती समृद्ध करतात हे फार गरजेचं आहे.

एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात काहीच भूमिका निभावत नसेल , तुमच्या सुखात दुःखात तिची काही ही भूमिका नसेल , तुमच्या आयुष्यात घडणार्या कोणत्याही घटनेत ती कधीही हजर नसेल तर अशा व्यक्तींना केवळ कधीतरी त्यांचा टाईमपास म्हणून त्यांचं  आपल्याशी असलेलं नातं शांतपणे संपुष्टात आणा..

तुमचं अंतर्मन तुम्हाला सूचना देत असतं.. त्या ऐका आणि अंमलबजावणी करा. जी तुमची जवळची , तुमचे कुटूंबिय सहजी तुमच्या गरजेला , तुम्हाला आधार द्यायला उपस्थित असतात अशांना कधीही अंतर देऊ नका.. वेळेला खरंच कोण आपलं कोण परकं हे लक्षात येतंच…

कोणाही साठी सहज उपलब्ध असल्याने आपण आपलीच किंमत कमी करून घेतो. अशा सहज करता येणार्या लहान लहान गोष्टींनी आपण आपले आयुष्य बदलू शकतो. कदर नसणार्या माणसांसाठी चिंता आणि काळजी करू नका.. ठाम निर्णय घ्या.

आपल्या आयुष्यातील सकारात्मकता , समाधान , आनंद आणि तुमची तुमच्या कायम जवळ असणारी माणसे यांची खरी कदर करायला हवी.. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा आनंदी , सुंदर असेल.. नक्कीच..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!