तुमच्या आयुष्यात स्थिरता आणणारा लेख
अश्विनी कुमार
योगायोग जर तुमच्या चांगल्यासाठी घडत असेल तर घडू द्या.
एक उद्योजक हे खूप तणावात समुपदेशनासाठी आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून देहबोली वरून व आवाजावरून असे वाटत होते कि ते जीवनात प्रचंड संकटांचा सामना करत आहेत.
त्यांचा उद्योग हा उत्तम सुरु होता. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखीच घडत होती. त्यांना कधीही कुणाची गरज भासली नाही. प्रत्येक परिस्थिती ज्यासाठी उद्योजकांना अनेक वर्ष वाट बघत रहावी लागत होती ती त्यांना अगदी सोप्या पद्धतीने भेटत होती.
म्हणजे एकप्रकारे योगायोग हा जुळून येत होता. जो आपण कुणालाही समजावून सांगू शकत नाही कि असे का होते ते. पण आपण राहतो तार्किक जीवनात. जिथे लोकांना स्वतःवर कमी विश्वास व मनुष्य प्राण्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेवर जास्त विश्वास.
ह्या व्यवस्थेत श्रीमंत, सत्ताधारी ह्यांना कधीही यशाचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही व गरीब मध्यम वर्गांना त्यांच्याच वर्गातील लोक हि स्पष्टीकरण देवून देखील त्यांचे स्पष्टीकरण नाकारतात.
खर म्हणजे योगायोग हा नैसर्गिक असतो. ह्या जगातील कोणीही व्यक्ती ती जन्मजात हा गुण घेवून जन्माला आलेली असते. पण कालांतराने त्यावर अनैसर्गिक मानवी नियमांचे संस्कार होवून तो जन्मजात गुण हा त्या व्यक्तीमधील संपूर्णपणे संपवला जातो.
ह्याला मानसशास्त्रात सायकोलोजी ऑफ फ्लो असे म्हणतात तर अध्यात्मिक शास्त्रात उर्जेचा प्रवाह असे म्हणतात. हि अशी अवस्था आहे ज्यामध्ये मनुष्य अशी परिस्थिती निर्माण करतो कि ज्यामध्ये त्याला जे पाहिजे व त्या व्यक्तीमध्ये कोणीही येत नाही किंवा येवू शकत नाही. इतके सुस्पष्ट ध्येय त्याला दिसत असते.
म्हणजे अपयशाच्या भीतीपेक्षा यशाच्या उड्डाणाची भावना हि तीव्र असते. ह्या उड्डाणामध्ये पडायची भीती नसते, ह्या भीतीचे रुपांतर पंखामध्ये बळाच्या रुपात अवतरते.
जस जसे तुम्हाला अगदी आरामात सर्वकाही भेटत जाते तेव्हा अनेकांची नकारात्मकता हि जागी होत जाते. जर तुम्ही अश्या लोकांच्या सहवासात आलात तर नुकसान व्हायची शक्यता हि जास्त असते.
शारीरिक जखमेपेक्षा मानसिक जखम हि खोलवर वार करते. ह्यामुळे मनुष्य मरत नाही तर निर्जीव निरस आयुष्य जगत असतो.
जेव्हा शारीरिक जखम होते तेव्हा आपण ती जखम फक्त वरवर चा उपचार करून बरी नाही करत तर त्या जखमेवर खोलवर उपचार करून त्या जखमेची काळजी घेत, वेळच्या वेळी औषध उपचार करत ती जखम पूर्ण पने बरी केऊन टाकतो.
पण मानसिक जखमेचे असे नाही आहे. ती जखम झाली तरी दिसून येत नाही. जर आई वडील सतत आपल्या मुलांना तू ढ आहेस असे बोलत गेले तर ती लहान मुल ते खरे मानून ढ सारखाच वागायला लागतो.
म्हणजे त्याच्या हुशारीला गंभीर इजा होते कारण त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी आघात केलेला असतो व त्यानंतर देखील त्यावर उपचार केलेला नसतो त्यामुळे हुशारी हि जखमी होवून कायमस्वरूपी संपून जाते व त्याजागी मंदबुद्धी जागा घेते.
असेच काही वार तुमच्या योगायोगाला होत असतात. जे जास्त जवळचे असतात त्यांचा वार नेहमीच खोलवर होत असतो व जे लांबचे असतात त्यांचा वार इतका आघात करत नाही. जर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तर तुमच्या मनाला काहीही आघात होणार नाही पण नसाल तर प्रचंड आघात होईल.
मी जे सांगत आहे ते समजून घ्या.
जर योगायोग हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक रित्या काम करत आहे तर त्याला तसेच काम करू द्या. विनाकारण शंका कुशंका घेवू नका. जी सकारात्मक फळे तुमच्या वाट्याला येत आहेत त्यांचा आस्वाद घ्या. काहींना ह्याची सवय नसते. ते तुम्हाला नकारात्मक बोलायला सुरवात करतील कारण त्यांच्या आयुष्यात असे काही घडतच नाही आहे.
त्यांच्या मनात काही विश्वास घट्ट रुजले असतात. जसे कि “कठीण परिश्रम करावे लागते” ह्या विचारामुळे त्यांना योगायोगाने जे काही दिले त्यावर ते विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटते कि हे योगायोगाने झाले जे कधी तरी आपल्या आयुष्यात काम करते व इथेच सुरवातीलाच ते योगायोगाला आपल्या आयुष्यातून काढून टाकतात. व पुढील आयुष्य हे फक्त आणि फक्त कठीण परिश्रम ह्या विश्वासावर जगू लागतात.
प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळे असते. काहींचे आयुष्यातील रस्ते हे सुखकर असतात तर काहींचे हे संकटांनी भरलेले असतात. तुम्हाला तुमचाच रस्ता पकडून चालायचे आहे, जर तुम्ही दुसर्यांचा रस्ता पकडून चालतात तर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वतः च्या हाताने बरबाद करत असाल.
विज्ञान व अध्यात्माने देखील सांगितले आहे कि मनुष्याच्या आयुष्यात नैसर्गिक आपत्त्या ह्या खूप कमी म्हणजे 2 टक्के असतात बाकी संकटे तो स्वतः च्या हाताने निर्माण करत असतो. योगायोग हा जन्मजात तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि ती देणगी तुम्ही नाकारतात व तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकतात. हि चुकी तुमची आहे.
अनेकदा असेही होते कि लोकांना तुमची प्रगती बघवत नाही त्यामुळे सुद्धा अनेक लोक सतत बोलून बोलून त्यांचे नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात रुजवायचे प्रयत्न करत असतात. जग हे असेच आहे.
सर्वच काही तुम्हाला चांगली लोक भेटणार नाहीत, अनेकदा पाय खेचणारी देखील भेटतील. आणि जर वेळीच त्यांना आवरले नाही, त्यांच्यावर काबू मिळवला तर पुढे प्रत्येक वेळेस तुम्हाला पाय खेचणारी लोकच भेटत जातील.
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक क्षमता असते ती योगायोग ह्या रूपाने तुमच्या मध्ये आहे. ती क्षमता पूर्णपणे वापरा, दुसर्यांकडे का नाही आहे ह्याचा विचार नका करू किंवा त्यांच्या सारखे तार्किक आयुष्य जगू नका. तुम्ही तुमच्याच क्षमतेचा वापर करत जा. ह्या जगात कोणीही एकसारखा नाही आहे, प्रत्येकामध्ये विशेष काहीतरी गुण आहेचच.
जागृत आणि हुशार बना, चांगले चालू आहे तर चांगले चालू द्या. सर्वांना सांगत बसू नका. विज्ञान किंवा अध्यात्मिक स्वतःला मानसिक दृष्ट्या सक्षम करा. आपला औरा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहून अजून मजबूत करा. आत्मविकास हे दररोज प्रत्येक क्षणी करत रहावे लागते जसे आपण श्वास घेतो तसे.


