दुःखाची, नैराश्याची भिंत आता आपल्याला सोडावीच लागेल.
मिनल वरपे
(संचालक, आमा)
एक सुंदर विचार असा आहे कि, एखाद्या व्यक्तीने भिंतीला पकडलं आणि नंतर भिंत त्याला सोडेल आणि तो मोकळा होईल असं नाही तर त्यालाच ती भिंत सोडावी लागते. तेव्हाच तो मोकळा होणार.
अगदी असंच आपलं आयुष्य आणि विचार असतात.
याचं अगदी नजरेसमोरील उदाहरण म्हणजे, आताच काही महिन्यापूर्वी घडलेली घटना, एक अशी व्यक्ती जिच्यासोबत आपण कधी बोललो नाहीत, तिला कधी भेटलो नाहीत, फक्त त्या व्यक्तीला टीव्ही मध्ये पाहत आलोय, तिच्याबद्दल ऐकत आलोय. पण अचानक टीव्हीला ब्रेकिंग न्यूज येते कि सुशांत सिंगने आत्महत्या केली.
आणि तेव्हापासून सतत तीच चर्चा आणि त्याच-त्याच न्यूज. आपण ऐकत होतो आणि त्याचवेळी असं जाणवलं कि असं का होतंय आपल्याला. त्याच्या मृत्यूचं ऐकून इतकं का वाईट वाटलं आपल्याला. कितीही ठरवलं कि आता वाईट वाटून घ्यायचं नाही. तरीही येता-जाता इकडून-तिकडून तो विचार काही जात नव्हता.
कोण कुठला तो अभिनेता आणि आपण सामान्य माणसं. आता त्या बातमीचा विचार नाही करायचा. पण तसं तेव्हा अजिबात जमलं नाही. याचं कारण म्हणजे टीव्ही, मोबाईल, फेसबुक, वर्तमान पत्र यांसारख्या सर्वच ठिकाणी तेच ऐकायला आणि पाहायला मिळत होतं आणि आपण सुद्धा त्यापासून लांब राहून दुसरं काही मनोरंजनाचं साधन म्हणून कशातच मन गुंतवत नव्हतो.
पण आज बघा तीच बातमी ऐकून तेवढं वाईट वाटत नाही किंवा ते विचार सुद्धा डोक्यात येत नाही. कारण आज आपण सतत वेगवेगळे काम करतोय. तीच बातमी आता ऐकायला मिळत नाही. पण आज नवीन बातमी, नवीन घटना आणि नवीन विचार मात्र येत आहेत.
सुशांत सिंग हे फक्त एक उदाहरण होतं. पण आपल्या आयुष्यात सतत वेगवेगळ्या वाईट-दुःख देणाऱ्या घटना घडत असतातच. त्या घटनेत आपण इतके अडकतो कि आपल्याला याची जाणीव उरत नाही कि हि गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही.
जशी ती घटना जुनी होते, तशी त्या घटनेचा आपल्यावरील प्रभाव कमी होत जातो. पण गेलेली वेळ आणि गेलेला क्षण आपल्याला पुन्हा मिळत नाही.
एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा सतत विचार आपण केला तर त्यातच आपण अडकून राहणार. त्यामुळे सतत एखादा विचार करण्यापेक्षा तो विचार बाजूला सोडून आपण आपलं मन दुसरीकडे रमवायचं. त्यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळते आणि ज्यामधून आपली वेळ वाया जाणार नाही, असे नवीन विचार सुचतात.
म्हणून वाईट विचार किंवा घटना आपल्याला सोडणार नाहीत तर आपणच त्यांना सोडून पुढे पाऊल उचलायचा प्रयत्न करायचा.
म्हणजेच दुःख देणारी, वाईट वाटायला लावणारी भिंत ओळखून त्यापासून काही अंतर राखूनच ठेवलेलं बरं !!



लेख आवडला
Sir kadhi kadhi aaplya la vat ki apal konich nahi ani te khar pan ast karan je mul jast bolat nahit je gharatach rahtat yevadach kay tar tyana he pan mahiti nast ki aaplya bajula kon rahat tyanch mitrach nastat pan jeva tyala direct bissness kiva job varti zav lagat tithe tar communication skill lagel mitra banvnlya sathi teva to mula la vat ki aaplyala kahich yet nahi aaplyala duniyadarii kahich nahi mahiti ani mang to dipresson madhe zato please yacha var lekha liha