Skip to content

आपल्यातल्या निरर्थक व चुकीच्या अपेक्षा कश्या ओळखायच्या ???

अपेक्षांचे ओझे


पल्लवी पाटणकर

(मानसतज्ज्ञ)


प्रत्येक नात्यांमधे अपेक्षा असतात. कधी कोणी आपली काळजी घ्यावी म्हणुन तर कधी आपण कोणाच्या काळजीपोटी त्याला जे सांगतो ते त्यान ऐकावे आणि बदलावे म्हणुन कधी कोणी आपले कौतुक करावे म्हणुन तर कधी कोणी आपल्याला मदत करावी म्हणुन कधी कोणी आपला अपमान करू नये म्हणुन तर कधी कोणी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणुन…अशा एक ना असंख्य अपेक्षा बाळगून आपण वावरत असतो. काही अपेक्षा पूर्ण होतात तर काही कायमच अपूर्ण राहतात. मग पूर्ण न झालेल्या अपेक्षांचे आपण काय करतो तर त्या मनातल्या मनात घोळवत राहतो कितीतरी वेळ आपल्याही नकळत. हा असे वागला आणि त्याने तसे केले मग त्याचे दुःख करीत राहतो. किती वेळ, दिवस, महिने, वर्षे…… मग त्या ओझ्याखाली आपलाच जीव गुदमरतो. त्या ओझ्याचे काय करायचे? कसे उतरवायचे यासाठी हा लेखनप्रपंच.

1. स्विकार – मुळात परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हे

मुळात परिस्थिती आहे तशी स्वीकारणे हे सगळयात महत्वाचे. आपल्या अपेक्षा कितीही रास्त असल्या तरीदेखील त्या समोरच्याने पूर्ण केल्याच पाहिजेत हा अट्टाहासच दुःखाला कारणीभूत ठरतो. कारण त्या अट्टाहासाने केवळ त्रासच होतो, अपेक्षा पूर्ण होणे लांबच राहते.

2. नियंत्रण – आपण दुसर्‍याच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, आपण

आपण दुसर्‍याच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, आपण दुसर्‍याचे वागणे बदलू शकत नाही हे वैश्विक सत्य आहे आणि ते मान्य होणे गरजेचे आहे.

3. स्वतःवर प्रेम – जेव्हा आपण स्वतः वर विश्वास ठेवतो आणि आपल्या सुखाची जबाबदारी

जेव्हा आपण स्वतः वर विश्वास ठेवतो आणि आपल्या सुखाची जबाबदारी आपलीच आहे हे स्वीकारायला तयार होतो तेव्हाच ईतरांकडून असणार्‍या अपेक्षा पूर्ण न झाल्याचे दुःख राहत नाही कारण तेव्हा हे माहीत असते की आपण स्वतः च स्वतः ला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आपण आपल्या मानसिक सुखासाठी दुसर्‍या कोणावरही अवलंबून नसतो कधीच हे सत्य मनापासुन स्विकारले तर आपल्या दुःखासाठ आण दुसर्‍या कोणाला कधीच जबाबदार ठरवणार नाही.

4. प्राधान्यक्रम निश्चिती – ज्या गोष्टीवर, ज्या अपूर्ण अपेक्षांवर आपण वारंवार लक्ष देतोय त्या

ज्या गोष्टीवर, ज्या अपूर्ण अपेक्षांवर आपण वारंवार लक्ष देतोय त्या खरच आपल्यासाठी एवढया महत्वाच्या आहेत का की आपण बाकीच्या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होऊ द्याव्यात? म्हणुनच त्रासदायक गोष्टींपेक्षा ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळेल अशा प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणे आवश्यक आहे. आणि हे सगळे कोणासाठी? तर स्वतः च्या मानसिक शांतीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी. कारण अपेक्षांचे ओझे जाणीवपूर्वक खाली उतरवले तरच मन शांत राहील आणि परिणामी शारीरिक आरोग्य, कार्यक्षमता आणि नातेसंबंध देखील उत्तम राहतील.


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

7 thoughts on “आपल्यातल्या निरर्थक व चुकीच्या अपेक्षा कश्या ओळखायच्या ???”

  1. अप्रतिम ! खुप सोप्या भाषेत तणावमुक्त जीवन जगण्यासाठीची उपाय योजना सांगितली आहे. लेख खुप आवडला.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!