“विरोधी विचार, प्रभावी उपाय”
ज्योत्स्ना शिंपी
आता हा शब्द वाचल्यावर आपल्या मनात सहाजिकच प्रश्न निर्माण होतो की हा “विरोधी विचार” काय आहे?
तर काळज्या आणि नकारात्मक दृष्टिकोन घालवण्याचा अतिशय चांगला उपाय म्हणजे “विरोधी विचार”.
नैसर्गिक नियमाप्रमाणे प्रत्येकाचे मन एका वेळी फक्त एकच विचार करू शकते. विरोधी विचार वापरून कुणीही अगदी सहजतेने अतिशय कमी काळात सकारात्मक दृष्टिकोन बनवू शकतो. हा मार्ग अतिशय सोपा आहे.
जेव्हा आपल्या मनात एखादा वाईट किंवा नको वाटणारा विचार येतो, तेव्हाच आणि त्याच क्षणी दुसरा त्याच बाबतीतला चांगला विचार आपण प्रयत्नपूर्वक मनात आणायचा. जसे आपले मन म्हणजे एक चित्र प्रक्षेपण यंत्र आहे. एखादी नको असलेली पाटी आली की ताबडतोब ती बदलून दुसरी चांगली पाटी ठेवायची.
उदाहरण द्यायचे झाले तर समजा आपला आजचा दिवस अगदी वाईट गेला आणि आपण उदास होऊन बसतो. आता आपल्या मनात उदास विचार येणार.
आपल्या मनात आता हे उदास विचार येणार आहेत हे ओळखणे ही ह्याची पहिली पायरी आहे. आपल्याबद्दल आपल्या स्वतःला माहिती असणे ही स्वतःवर नियंत्रण असण्याची पहिली पायरी आहे.
दुसरी पायरी म्हणजे जसे आपण या उदास विचारांना थारा दिलात तसे हे विचार बदलून आनंदी विचार मनात आणून औदासिन्याच्या विरुद्ध विचार करून आनंदी आणि उत्साहपूर्ण राहण्यासाठी मन एकाग्र करू शकतो.
आपण असे विचार मनात आणू शकतो की आपणास फार आनंद झाला आहे. थोडीसे हसून, अशाकाही शारीरिक कृती करायच्या ज्या आपण नेहमी आनंदात असताना करतो. नंतर ताठ बसून दीर्घ श्वास घेऊन मनावर काबू मिळविणे.
आनंदी विचारच मनात आणणे आणि या सगळ्या गोष्टीं केल्यामुळे काही मिनिटातच आपल्याला सकारात्मक फरक जाणवतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक किंवा उदासीन विचार आला की तो लगेच बदलायचा आणि चांगला विचार मनात आणायचा, हा प्रयत्न काही आठवडे केला तर आपणास आढळून की नकारात्मक विचारात काहीच दम नाही.
आपणा सर्वांना उद्याच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ??



लेख आवडला