Skip to content

स्वच्छंदी आयुष्य जगा.. मन आपोआप आनंदी राहील..

आयुष्य सुख दुःखाचा खेळ आहे…

अजय धागे

प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना चांगल्या किंवा वाईट परिस्थिती घेऊन येतात….

परिस्थिती कधी सुधारेल हे माहित नाही पण मन स्थिती नक्कीच सुधारली पाहिजे…

कारण घडलेल्या परिस्थितीचे विचार
मनात चालतात आणि आपलेच विचार आपल्याला दुःख देतात..

याचाच अर्थ परिस्थिती वाईट आहे…
पण त्यावर चालणारे आणि कधी ही न थांबणारे विचार चक्र आपल्याला सुख किंवा दुःखाच्या ळे आपण जास्तीत जास्त कोणत्या परिस्थितीचे जास्त विचार करतो यावर आपले लक्ष असायला हवे…

निगेटिव्ह घटनेचे आपण जास्त विचार करतो..
आणि आनंदी घटनेचे आपण कमी विचार करतो..

या वरून आपली मन स्थिती आकार घेत असते त्यामुळे आपण आपल्या विचारांना वेळीच परिवर्तन करायला पाहिजे..

दुसऱ्या कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी काही गोष्टी करा:

अगुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी जगतो. कित्येक गोष्टी आपले मन मारून दुसऱ्यांच्यासाठी करतो..

आपल्या सहनशीलतेमुळे किंवा त्यागांमुळे कोणाचे भले झाले तर आपण त्यात धन्यता मानतो.. हेच सगळ्या, भल्या माणसांच्या आयुष्याचे ध्येय असते..

मात्र हे सगळे करत असताना स्वतःला विसरून कसे चालेल..?? जशी आपली दुसऱ्यांप्रति कर्तव्ये असतात तशीच स्वतःसाठी ही काही कर्तव्ये असतात..

आणि ती जर आपण पूर्ण केली नाहीत तर मनात ते दुःख घर करते.. आणि तेच आपल्याला सतत लागून राहते..

म्हणून स्वतःसाठीही जगा.. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी मनात चालू असणाऱ्या वाईट घटनेचे विचार पुन्हा पुन्हा
येणार नाही याची काळजी घ्या..
आणि हे करताना मागे पुढे पाहू नका..
कारण विचार केल्याने परिस्थिती बदलणार नाही..
त्यावर मार्ग शोधल्यास परिस्थिती नक्कीच सुधारेल

स्वच्छंदी आयुष्य जगा.. मन आपोआप आनंदी राहील.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना चांगल्या किंवा वाईट परिस्थिती घेऊन येतात….

परिस्थिती कधी सुधारेल हे माहित नाही पण मन स्थिती नक्कीच सुधारली पाहिजे…

कारण घडलेल्या परिस्थितीचे विचार मनात चालतात आणि आपलेच विचार आपल्याला दुःख देतात..

याचाच अर्थ परिस्थिती वाईट आहे…

पण त्यावर चालणारे आणि कधी ही न थांबणारे विचार चक्र आपल्याला सुख किंवा दुःखाच्या भवऱ्यात घेऊन जातात..

त्यामुळे आपण जास्तीत जास्त कोणत्या परिस्थितीचे जास्त विचार करतो यावर आपले लक्ष असायला हवे…

निगेटिव्ह घटनेचे आपण जास्त विचार करतो..
आणि आनंदी घटनेचे आपण कमी विचार करतो..

यावरून आपली मनस्थिती आकार घेत असते त्यामुळे आपण आपल्या विचारांना वेळीच परिवर्तन करायला पाहिजे..

दुसऱ्या कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी काही गोष्टी करा:

आयुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी जगतो. कित्येक गोष्टी आपले मन मारून दुसऱ्यांसाठी करतो..

आपल्या सहनशीलतेमुळे किंवा त्यागांमुळे कोणाचे भले झाले तर आपण त्यात धन्यता मानतो.. हेच सगळ्या, भल्या माणसांच्या आयुष्याचे ध्येय असते..

मात्र हे सगळे करत असताना स्वतःला विसरून कसे चालेल..?? जशी आपली दुसऱ्यांप्रति कर्तव्ये असतात तशीच स्वतःसाठी ही काही कर्तव्ये असतात..

आणि ती जर आपण पूर्ण केली नाहीत तर मनात ते दुःख घर करते.. आणि तेच आपल्याला सतत लागून राहते..

म्हणून स्वतःसाठीही जगा.. स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी मनात चालू असणाऱ्या वाईट घटनेचे विचार पुन्हा पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या..

आणि हे करताना मागे पुढे पाहू नका..
कारण विचार केल्याने परिस्थिती बदलणार नाही.. त्यावर मार्ग शोधल्यास परिस्थिती नक्कीच सुधारेल

स्वच्छंदी आयुष्य जगा.. मन आपोआप आनंदी राहील..

Online Counseling साठी !

क्लिक करा

“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “स्वच्छंदी आयुष्य जगा.. मन आपोआप आनंदी राहील..”

  1. सुजाता

    नक्कीच विचार करायला लावणारा लेख आहे. आचरणात आणायला च हवा. मी नक्कीच प्रयत्न करेन. काळात असते, पटते, तसे वागते ही, पण कधी तरी ताबा सुटतो आणि वाईट विचारांची प्रचंड गर्दी जमा होते मनात… मग तो काळ जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात। पण हा लेख लक्षात ठे इन नक्की

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!