आपण प्रत्येकाने ही इच्छा दडपलेली असते….चला आज वाचून मोकळी करूया !
योगेश चव्हाण
माझी खुप दिवसापासुनची इच्छा आहे…दिवसापासुनची नव्हे तर कीत्येक महीन्यापासुनची…वर्षापासुनची..काहीही न ठरवता निघायच..कुठेतरी तरी वेगळ्याच ठीकाणी जायच..रेल्वे काउटंर वर जायच लास्ट स्टेशनच तिकीट काढायच..पण ठरवायचे नाही कुठे जायचे ते..वाटल तर मध्येच कुठेतरी उतरुन चालायला लागायच.. खुप लोकांना असा प्रवास करावासा वाटतो..मस्त फिलिंग ना की कुठे चाललोय ते माहीत नाही….दीशा माहीत नाही..पण निघायच …
कधी कधी मी अशा प्रवासाला निघालोय याची स्वप्न पण पडतात..अनेक लोकांना वाटत की दीशा ठरवली की मगच काही तरी घडत आयुष्यात..पण खरच मला अस वाटत की अस काही नाही..दीशा स्वत: तुम्हाला काही ना काही देत असते..तुम्ही जिथे जाता तिथे माणस असतात सभोवतालचा निसर्ग असतो..प्रत्येक जण काही ना काही तरी देतच असतो..पण सोबत ही जी उत्सुकता आहे ना …की आता पुढे काय नवीन जेव्हा तुम्हाला माहीत नसत ना की पुढे काय घडणार आहे…तेव्हा जी हुरहुर असते…काळजाच धडधडण असत..ते ठरउन केलेल्या गोष्टीत नाही…
हा प्रवास आयुष्याचा ..जगण्याचा आहे….खरच वाटत.अस आयुष्य असाव ..नात्याविरहीत…काळजी करणारी माणस नकोत..रागावणारी माणस नकोत..घाबरवणारी माणस नकोत..मीच असेन माझ्यासाठी..अस काही करावस वाटल..की कुठे जावस वाटल की आपुलकीचे चेहरे आठवू लागतात..त्यांची काळजी आठवू लागते..त्यांनी आपल्यावर केलेल प्रेम आठवू लागत..मग आपली आपल्यालाच लाज वाटु लागते…की कीती स्वार्थी आहोत आपण..पण कधी कधी एकांतात असल्यावर हे विचार आपसुकपणे वर येतात ..मग मी मलाच समजत नाही..असे विचार करायला लागतो..माहीती आहे हे शक्य नाहीये..
पण अस काही करायला मिळाल..तर मी जरुर करेन ..काहीना हे माझ लिखाण निराशावादी ..निरस ..कंटाळवाणी वाटेल..पण खर सांगतो..मीपणाचा शोध घेण्यासाठी मन एकदा आसुसल ना की खुप घुसमट होते मनाची…जे काही आहे ते आपल्यातच असत.. पण सापडत नाही ….बघुया काय हे ते पुढे….
कधी कधी वाटत निघाव मध्येच उठुन..
अगदी अंताच्या प्रवासासाठी…
कोणच नकोय मला …
मीच असेन फक्त माझ्यासाठी..
वाटत पायथे घालावेत..
डोंगर दऱ्य़ा नदी..
कंटाळा आला की..
झोपावे मस्त जमिनी पाशी…
नकोच कोणी माणस..
काळजी ..प्रेम करणारी..
कधी वाटलच बोलावस..
तर मी बोलेन माझा स्वत:शीच..
माणसांच्या या गर्दीमध्ये..
मी माझा हरवत चाललोय..
का कोणास ठाउक पण कसा..
मी माझाच मलाच विसरत चाललोय…
राहुन राहुन वाटत…
सोडुन द्यावीत बंधन सारी..
सोडुन द्यावेत मोह पाश सारे..
कधी आले मरण तर ..
त्यालाही जवळ घ्यावे प्रेमाने..
जवळ घ्यावे प्रेमाने…
खुप विचित्र आहे मी…
कदाचित उठुन निघुन जाईनही
मागे वळुन पाहणारही नाही..
जरी कोणी थांबल असेल माझ्यासाठीही…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!
लेखात मांडलेला प्रत्येक प्रसंग जीवनाशी सुसंगत वाटतो.