मन
ज्योत्स्ना शिंपी
आपले मन म्हणजे एक प्रकारची बाग आहे. जर आपण स्वतःच्या मनाची एखाद्या सुपीक आणि चांगल्या बागेसारखी काळजी घेतली तर आपल्या अपेक्षेपेक्षाही ती जास्त बहरेल.
पण जर त्याच्यात नको असलेले गवत किंवा जंगली झाडे झुडपे उगवली तर आपली मन:शांती आपल्याला सोडून जाईल….
आपण आपली बाग एखाद्या देशाभिमानी योध्याने जपावे अशी जपली पाहिजे. कुठल्याही हानीकारक किंवा नुकसानकारक वस्तूंना आत प्रवेश करू देऊ नये.
तरीही आपण आपल्या आजूबाजूस असे कितीतरी लोक बघतो की जे त्यांच्या मनाच्या बागेत कितीतरी विषारी रसायने टाकतात. भूतकाळात जे होऊन गेले त्याबद्दलची खंत, भविष्यकाळात काय होईल त्याची चिंता, स्वतः निर्माण केलेली भीती या सगळ्यामुळे मनाच्या बागेचे खूप नुकसान करतात.
चिंता ही खरोखरच मनाच्या शक्तीची हानी करते आणि आपल्या अंतरात्म्याला जखमी करते.
आणि त्यामुळेच जर आपल्याला चिरंतन सुख आणि अर्थपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर आपल्या बागेच्या दरवाज्याजवळच राखण केली पाहिजे चांगल्या ज्ञानाला आतमध्ये शिरकाव करू दिला पाहिजे.
जसे आपण घरातील केर रोजच्या रोज काढून घर लख्ख स्वच्छ करतो तसेच आपण आपले मन ही नकारात्मक विचार काढून रोजच्या रोज स्वच्छ केले पाहिजे. वास्तविक हे आपल्या रोजच्या दिनचर्येचे एक महत्त्वाची काम असले पाहिजे.
आपल्या क्षमतेला उत्तेजन देऊन सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे पण चांगले केले पाहिजे. मनाची शक्ती ही निसर्गदत्त देणगी आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात सकारात्मक विचारांनाच थारा दिला पाहिजे.
आपणा सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा ??



आपल्या link वर जाहिरातबाजी खूप आहे… त्यामुळे लेख वाचताना प्रॉब्लेम होतो