Skip to content

काम सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीची खरच गरज असते का?

काम सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते का?


वंदना खरे


” ‘Sexसाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते ही patriarchal myth आहे’ – असं मी म्हणतेय त्याचं स्पष्टीकरण patriarchal GBmyth या शब्दातून मला पितृसत्ताक समाजरचनेला पोषक गैरसमज असं सुचवायचं आहे. लैंगिक क्रिया(Sex) आणि पितृसत्ता (patriarchy) यांचा परस्पर संबंध लावणे काहींना far fetched वाटू शकते. म्हणून एकदा दोन्ही शब्द सुटे सुटे पाहूया.

Sex या शब्दाचा अर्थ आपण कसा लावतो ? Sex म्हणजे लैंगिक क्रिया. त्या अनेकविध प्रकारच्या असू शकतात. पण बहुतांश वेळा ‘योनीत लिंगाचा प्रवेश’ असाच Sexचा अर्थ घेतला जातो. जणूकाही तेवढीच कृती सर्वात जास्त महत्त्वाची! त्यापूर्वीच्या किंवा नंतरच्या कृतींना foreplay, आफ्टरप्ले, मेकिंग आउट इ. नावं दिली जातात.

अगदी आताआता पर्यन्त समलिंगी संबंधाना अनैसर्गिक, विकृत म्हटले जात होते. तसंच हस्तमैथुन आरोग्याला अपायकारक असल्याचे मानले जात असे. आजही कित्येक लोक तसंच मानतात. थोडक्यात काय तर ज्यातून पुनरुत्पादन होऊ शकत नाही त्या सर्व लैंगिक क्रिया अयोग्य असल्याचे गैरसमज पसरवले जात असतात. या सर्वांचा पितृसत्तेशी काय संबंध?

पितृसत्ताक समाजरचनेमध्ये विविध प्रकारची सत्ता पिढ्यानपिढ्या पुरुषांच्याच हातात एकवटलेली ठेवायची असते. उदाहरणार्थ, एका पुरुषाला वडिलांकडून मिळालेली संपत्ती, कौशल्ये, प्रतिष्ठा इ. आपोआप त्याच्या मुलाला(मुलीला नव्हे) मिळत राहणे. यात मुलगा होण्याला जसे महत्त्व आहे तसे मुलीकडे ती सत्ता मागायचे (किंवा हिसकावून घेण्याचे) बळ न येऊ देणेही महत्त्वाचे आहे.

पितृसत्ता टिकवण्यासाठी स्त्रीयांच्या लैंगिकतेवर, जननक्षमतेवर आणि पर्यायाने मानसिकतेवरही ताबा ठेवणे पितृसत्तेसाठी गरजेचं आहे. म्हणून लैंगिकतेविषयी गैरसमज पसरवणे पितृसत्तेला पोषक ठरते. उदा. स्त्रियांना लैंगिकसुखासाठी आणि orgasmसाठी योनीत लिंगाचा प्रवेश होण्याची गरज नसते – हे शास्त्रीय सत्य आहे.

पण स्त्रियांना ते समजू नये आणि अमलात आणता येऊ नये यासाठी तिला अत्युच्च लैंगिक सुख देऊ शकणारा अवयव (clitoris) कापून टाकण्याची प्रथा अनेक देशांमध्ये आहे. त्या प्रथेला पावित्र्य, स्वच्छता आणि सौन्दर्याच्या नावाखाली सुरू ठेवले जाते. स्त्रियांवरचे पुरूषांचे वर्चस्व केवळ वैयक्तिक पातळीवर नसून सामूहिक असते.

कुटुंबसंस्थेच्या बरोबरीने धर्मसंस्था, कायदे, अर्थव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या सर्व संस्थांच्या द्वारे हे वर्चस्व टिकवले जाते. पितृसत्तेला पोषक गैरसमज ह्या सर्व संस्थांच्या मार्फत पसरवले/टिकवले जातात.

जर पुरुषापुरुषांचे किंवा बायाबायांचेच समलिंगी संबंध राजरोस होत राहिले किंवा लोक एकेकट्याने लैंगिक आनंद मिळवू लागले तर पितृसत्तेचे हे चक्र सुलभतेने पिढ्यानपिढ्या पुढे जाणार नाही. त्यामुळे समलैंगिकता किंवा स्वत:ला लैंगिक आनंद देणं (उदा. हस्तमैथुन) हे अनैसर्गिक, विकृत किंवा पाप असल्याचे गैरसमज पसरवणे पितृसत्तेसाठी आवश्यक ठरतं.

खरं म्हणजे बरेचदा स्त्री आणि पुरुषातले (नॉर्मल मानले जाणारे) लैंगिक संबंध वेदनादायक, हिंसक आणि असंवेदनशील असतात – हे आपण आजूबाजूला पहातच असतो.

अनेकदा बायकोने स्वत:ची लैंगिक आवडनिवड सांगितलेली नवऱ्याना आवडत नाही. अनेक नवरे बायकोची संमती नसताना तिला लैंगिक संबंध करायला भाग पाडतात. बायकांना स्वत:च्या लैंगिक अवयवांची धड ओळखही नसते आणि स्वत:च्या लैंगिक आवडीनिवडी उमजलेल्या नसतात.

कारण लैंगिक बाबतीतले अज्ञान हेच चांगल्या बाईचे लक्षण मानले जाते. विविध व्यक्तींना विविध प्रकारे लैंगिक सुख मिळवता येऊ शकते आणि त्याची आवड असू शकते. दोन माणसे एकत्र मिळून जी लैंगिक क्रिया करतात तोच “खरा ”, “नैसर्गिक” आणि “चांगल्या प्रतीचा” आनंद आहे – ह्या म्हणण्याला काही शास्त्रीय आधार नाही.

पक्षी, मासे, वटवाघळे, माकडे आणि माणसे विविध प्रकारांनी Nonreproductive sex करतात – असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. एकमेकाला त्रास न देता ज्यांना ज्या पद्धतीने कामसुख मिळवायचे असेल तसे मिळवणे हा मूलभूत अधिकार आहे. अमूकच एक पद्धत योग्य असे म्हणणे पितृसत्तेचा आविष्कार आहे.”



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “काम सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीची खरच गरज असते का?”

  1. असहमत ,
    समलिंगी सेक्स मध्ये कसले आलेय ते परम सुख ? ती तर एक विकृतीच मानली पाहिजे.
    एकवेळ हस्तमेथून ठीक आहे पण ते किती काळापुरते ?
    कालांतराने वयानुसार त्यात ही एक प्रकारचा निरस्पणा , वेफॉल्य येते.
    त्यामुळे कायदेशीर वय बंधना पासून पुढे होत राहणारे स्त्री – पुरुषाचे शारीरिक संबंधच अत्यंत योग्य होत.

  2. Shashikant Shripati Bhandare

    नमस्ते मॅडम,
    खुप सुंदर व छान माहिती आपण देऊन सेक्स विषयी लोकांचे असणारे गैरसमज या लेखातून दुर होतील याची मला खात्री वाटते. धन्यवाद!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!