सावधान…आपल्या मुलांचे ‘ब्रेन वाशिंग’ तर होत नाही ना?


गणेश मानस
मानशास्त्रीय समुपदेशक


काही दिवसापूर्वी एका चॅनेलवर अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचा ‘परवरिश’ हा चित्रपट लागला होता. तसा कॉलेज जीवनात मी तो अनेकेवेळा पाहिला होता. त्यातली गाणी खूप आवडत होती. पण तो चॅनेलवर लागल्यानंतर पुन्हा एकदा तो मी पाहिला.

परंतु यावेळी मी त्यातल्या ‘स्टोरी’वर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातील व्हिलन डाकू मंगलसिंग (अमजद खान) याला पोलिस अधिकारी शम्मी कपूर अटक करतो. यावेळी मंगलसिंगची पत्नी अमिताभला जन्म देऊन मरण पावते. शम्मी कपूरच्या घरी विनोद खन्नाचा जन्म होतो. दोघांचेही पालन पोषण केले जाते. परंतु पोलिस अधिकार्‍याचा मुलगा चुकीच्या ‘अनुभवा’ने व्हिलन बनतो आणि मंगलसिंगचा मुलगा मात्रा चांगल्या ‘अनुभवा’मुळे पोलिस अधिकारी बनतो.

Advertisement

आपल्याकडे आईवडीलकांकडून मिळालेली गुणसूत्रे, रक्त यानुसार व्यक्तीचा स्वभाव बनतो, असे म्हटले जात होते. परंतु 40 वर्षापूर्वी आलेल्या या चित्रपटात मात्र व्यक्ती गुणसूत्रे, रक्तामुळे नाही तर ती त्याला मिळालेल्या अनुभवामुळे चांगली वा वाईट बनते.

व्यक्तीला सकारात्मक आणि निरामय परिस्थिती लाभली तर ती चांगली बनते, तर नकारात्मक आणि चुकीची परिस्थिती लाभली ती व्यक्ती बिघडू शकते. मेंदू विज्ञानानेही आता हे सिद्ध केलेले आहे.

व्यक्तीचा जन्म होत असतानाच गर्भाशयामध्ये मेंदूची जडणघडण होत असते. मेंदू हा न्यूरॉन्स (मज्जापेशीं)नी बनलेला असतो. या मज्जापेशी व्यक्तीला मिळणार्‍या अनुभवानुसार तयार होत असतात. त्यासाठी त्यांची अनेक मज्जापेशींशी जुळणी सुरू असते.

Advertisement

या पेशीमधून न्यूरोट्रान्समिटर्स म्हणजे काही रसायने वाहत असतात. ही रसायने पेशींमधून अनुभवाचे संदेशवहनाचे काम करीत असतात. वयाच्या 12 वर्षांपर्यंत मज्जापेशी स्थिरावण्याचे काम सुरू असते. त्यामुळे या कालावधीत मिळालेल्या अनुभवांवरच व्यक्तीचे पुढचे आयुष्य कसे असणार हे ठरत असते. त्यामुळे पालकांनी वयाच्या 12 व्या वर्षांपर्यंत आपल्या मुलाला चांगले सकारात्मक आणि निरामय अनुभव देण्याची आवश्यकता आहे.

या अनुभवाच्या पेशींमधूनच व्यक्तीचे ‘विचार’ पक्के बनत जातात. यामध्ये त्याला भितीदायक अनुभव मिळाले असतील ती भविष्यात भित्री बनू शकते. धार्मिक बनू शकते. गुंड बनू शकते. एकमेकांना मदत करणारी बनू शकते.

दुसर्‍या मदत बनविण्याचे हे वय असते. त्यामुळे मुलांना एखाद्या व्यक्तीबद्दल या वयात वाईक अनुभव आलेले असतील तर पुढे सर्वच तशा व्यक्तीबद्दल ते मत पक्के होऊन जाते. काही संघटना, व्यक्ती मुलांना आपल्या ‘कल्ट’मध्ये लहानपणापासूनच सहभागी करून घेतात.

Advertisement

यातून दुसर्‍या व्यक्ती, धर्म, जात याबद्दल त्यांची मते कलुशित करणारे ‘अनुभवा’चे ‘डाऊनलोडींग’ करीत असतात. यातून मुलांचा स्वभाव कसा तयार होईल, हे सांगण्याची आवश्यकता नाही.

गेल्या काही वर्षात झालेल्या मेंदू विज्ञानातील संशोधनामुळे मुलांचा ‘स्वभाव’ आपण पाहिजे तसा घडवू शकतो, हे आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ‘डाऊनलोडींग’ झालेले विचार आपण काढून टाकून त्यामध्ये बदल करू शकतो.

त्यासाठी त्याला त्याच्या वागण्याची जाणिव करून देऊन ते डिलीट करता येते. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये नवीन अनुभव देऊन त्यापद्धतीने पेशींना शिकवता येते. परंतु आपल्याकडील शिक्षण पद्धती, सामाजिक वातावरण, घरचे वातावरण मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक नाही, असे दिसते.

Advertisement

काही ठिकाणी तर मुलांचा मेंदूच विकसीत होऊच नये, असे वातावरण जाणिवपूर्वक तयार करण्यात येते असे दिसते. कारण आपण पाहिले तर शहरातील बहुसंख्य झोपडपट्ट्यांमध्ये दारुचे अड्डे काढण्यात आलेले असतात.

त्या ठिकाणच्या मुलांनी बहुसंख्य वेळ अभ्यासात न घालवता अन्य कामात घालवावा, याची व्यवस्था केलेली असते. त्यासाठी त्यांचे नेमून दिलेले ‘कार्यकर्ते’ चांगलेच कामाला लागलेले असतात. त्यासाठी वेगवेगळी ‘आमिषे’ तयार ठेवलेली असतात.

त्यामुळे मुलांचा मेंदू सकारात्मकदृष्टीने तयार न होता, नकारात्मकदृष्ट्या तयार होऊ लागतो. याला मानसशास्त्रीय भाषेत ‘ब्रेन वॉशिंग’ असे म्हटले जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे ‘ब्रेन वॉशिंग’ तर होत नाही ना याकडेही लक्ष देणे आवश्यक झालेले आहे.

Advertisement

आता हे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी व्यक्ती, संघटनाच पाहिजे, असे नाही. तर खास दररोज दीड जीबी मोफत असलेला इंटरनेट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेला आहे. यामध्ये आता आपली पिढी अडकत चालली आहे. याचे कुणालाही भान राहिलेले नाही.

दीड जीबी डाटासाठी आपण पैसे मोजतो, पण याचा फायदा मात्र कुणाचा होतो, हे आपल्या लक्षात येत नाही. परवरिश चित्रपटात ब्रेन वॉशिंग करण्यासाठी मंगलसिंग ही व्यक्ती होती, पण आताच्या काळात मोबाईलद्वारे सहज ब्रेन वॉशिंग सुरू आहे. पण त्या मोबाईलच्या मागे अनेक छुप्या मंगलसिंगचा हात आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

Advertisement

Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा


Advertisement

करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

One Reply to “सावधान..आपल्या मुलांचे ‘ब्रेन वाशिंग’ तर होत नाही ना?”

  1. खुप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.