Skip to content

निरोगी मानसिक आरोग्याचे रहस्य महितीयेत का ??

निरोगी आरोग्याचे रहस्य


ज्योत्स्ना शिंपी


आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर कळतं की आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं आहे. वाढत्या आधुनिक जीवन शैली नुसार शारिरीक तक्रारी, समस्या जसे बीपी, शुगर, हृदयाचे ठोके वाढून चक्करच येणे,तसेच ताण तणाव, भीती, क्रोध, अस्वस्थता, चिडचिड, बेचैनी, चिंता या सारख्याही बऱ्याच मानसिक नि भावनिक तक्रारीही कॉमन झाल्या आहेत…

बहुतांशी शारीरिक छोटे मोठे आजार हे मानसिक आणि भावनिक पातळीवर गुंतलेले असतात..

आणि यावर उपाय म्हणून जरी शारीरिक काळजी चांगल्या रीतीने घेतली जसे शुद्ध पाणी, शुद्ध हवा, पौष्टिक आहार, आणि योगा तसेच व्यायाम तरीही एका विशिष्ट पातळीपर्यंतच आपण त्यावर मात करू शकतो…

नकारात्मक सगळे विचार म्हणजे विष आहे. जे शरीरात पसरत जाते. आपण जेव्हा हे ओझं फेकून देतो तेव्हाच शरीरातील सगळे अवयव सुरळीतपणे काम करू लागतात. आणि आपणास चांगला परिणाम कारक रिझल्ट दिसू लागतो

आपले सगेसोयरे, नातीगोती, मित्र-मैत्रिणी, आपली माणसं भरपूर असली तरी, अवांतर, वेगवेगळ्या विषयावर चर्चा जरी होत असल्या तरी, मनमोकळेपणाने संवाद खूप कमी होतो, आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलतच नाहीत ……हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !!

मी दुःख सांगितल्यावर मला कोणी हसणार तर नाही नां अशी भीती वाटत राहते तसेच मी चांगली बातमी सांगितल्यावर आनंदी होतील का नाही अशी शंका ही वाटत असते….मनातल्या भावनांचा निचरा न होणे…खूप बोलावंस वाटणे पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे, योग्य व्यक्ती न सापडणं.. आणि यामुळेच भावनिक आणि मानसिक खूप कोंडमारा होतो आणि त्याचा परिणाम आपसूकच आपल्या शरीरावर होतो..

शारीरिक समस्या, आजार दिसून तरी येतात, समोरच्याला त्या जाणवतात ही… पण मानसिक आणि भावनिक पातळीवरच्या तक्रारी आजार सुरुवातीला किंवा नंतरही जाणवतच नाही त्यामुळेच त्यावरचा उपचार दुर्लक्षित राहतो…आणि त्यामुळेच मनाच्या आजारावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्यांची संख्या तुलनेने फारच कमी आहे.

प्रत्येकाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की या सर्व शारीरिक, मानसिक भावनिक छोट्या-मोठ्या समस्येबद्दल चांगल्या परिणामकारक, विनामूल्य तसेच भरपूर आनंददायी उपचार पद्धती आपल्याजवळच आहे…

१) जसे की स्वतः होऊन पुढाकार घ्या. *व्यक्त व्हा , बोला , मित्र करा* कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल. हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त विश्वासू जागा निर्माण करा. आणि जर का विश्वासू जागा तुमच्या जवळ नसतील तरी काही हरकत नाही.

चक्क सगळ्या भावना तुम्ही कागदावर लिहून काढा . लिहून काढल्यानेही भावनांचा निचरा होण्यास मदत होते. किंवा शांत ठिकाणी बसून तुम्ही तुमच्या मनातल्या भावना, विचार आपले गुरु किंवा देव यांना आपला मित्र समजून व्यक्त ही करू शकता…

२) ज्या नकारात्मक विचारांमुळे आजार झाला आहे, त्या विचारातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त करा आणि त्या बदल्यात *सकारात्मक विचार मनात सतत घोळवत राहा.*

३) स्वतःवर प्रेम करण्यामुळेसुद्धा रोग, आजार बरा होण्याला मदत होते. कारण प्रेम नेहमीच बरं करतं.

सतत आरशात बघा आणि म्हणा -माझं तुझ्यावर प्रेम आहे, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. सुरुवातीला हे असे करणे अवघड जाईल पण सराव करत राहा आणि मग त्यातला अर्थ, भावना तुम्हाला कळेल. मग बघा, हे प्रेम आरशातल्या प्रतिबिंबासारखे चोहीकडे तुम्हाला दिसेल.

४) आणि स्वतः वर प्रेम कसं करायचं? सर्वात आधी स्वतःवर आणि इतरांवर टीका करण्याचं सोडून द्या. तुम्ही जसे आहात तसा त्याचा स्वीकार करा. स्वतःचं शक्य तेवढं कौतुक करा. टीकेमुळे आतलं चैतन्य मोडून पडतं आणि कौतुकानं ते निर्माण होतं.

चला तर मग आपल्या जीवनशैलीत, जगण्याच्या पद्धतीत थोडासा चांगला बदल करून निरोगी निरामय दीर्घायुष्य मिळवू या…..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “निरोगी मानसिक आरोग्याचे रहस्य महितीयेत का ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!