Skip to content

मनाची आंतरिक शांतता म्हणजे काय? ती कशी निर्माण करावी??

आंतरिक शांतता म्हणजे काय ?


अर्चना पाटील


आपण आपल्या दैनंदिन जीवणात कळत नकळत अनेक नकारात्मक विचार करत असतो ..अनेकदा बोलताना ,वागताना ,प्रतिक्रिया देतांना जरी विचार पूर्वक देत असलो तरी अनेकदा सहज एक नकरात्मक विचार मनात येतो ..

आपण व्यक्त होताना किती सकारात्मक आहे हे नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ..परंतु अंतर्मनात काहीतरी वेगळं चालू असत ..

उदा .एखाद्या व्यक्तीला आपण वरवर छान ,गोड ,चांगले शब्द वापरून संवाद साधत असतो पण मनातून त्या व्यक्ती बद्दल तिरस्कार ,राग व नकारात्मक भावना असेल तर ,आपल्याला त्या व्यक्ती बद्दल तितकीच सकारात्मक भावना असते का ? हे ही तितकंच महत्वाचं आहे ..

आपण नेहमी म्हणतो की अरेच्या मी किती वेवस्थित वागतो सर्वांशी ,मी किती छान बोलतो ,मी किती सकारत्मक प्रतिक्रिया देतो ..तरी माझ्या वाट्याला असे नकारात्मक का घडते ,माझं मन अशांत का आहे ?

मुळात मन अशांत आहे कारण आपण अनेक नकारात्मक विचार मनात कुरवाळून ठेवलेले असतात .. मग ते एखाद्या व्यक्ती विषयी असेल ,घटने विषयी असेल ..सतत समोरचा हेतू पूर्वकच वागतो अशी अढी मनात निर्माण झालेली असते .मग सतत प्रत्येक व्यक्तीचा वागण्याचा बोलण्याचा ,हेतू चा अर्थ आपल्या अंतर्मनात नकारात्मक तेने घेत असतो ..

समोरची व्यक्ती हेतुपुर्ण वागते हे मनात येन म्हणजे देखील एक नकारात्मक भावना आहे जी आपल्या मनाला अस्वस्थ बनवत असते ..

तुमच्या अंतर्मनातील शांतता ही तुमच्या कृतीत ,बोलण्यातून दिसते तसेच तुमचया चेहऱ्यावर ही दिसते ..

तुमचं आनंदी आणि समाधानी असणं हे तुमचा विचारातून लोकांपर्यंत पोहचत पण चेहऱ्यावर ही तइ भाव दिसतं असतात ..

जगा आयुष्य थोडं आहे तर भरभरून जगा ,नकात्मक विचारांना अंतर्मनात प्रवेश देऊ नका ,एखादी व्यक्ती वा घटने बाबत सतत नकारात्मक विचार येत असतील तर ती व्यक्ती तशीच आहे म्हणून तिला स्वीकारा ,एखादी वाईट घटना घडली असेल तर ती विसरून जा ..

कारण नकारात्मक व्यक्ती आणि घटना कधीतरी बदला घेऊ म्हणून आठवणीत ठेवल्या तर ते तुमचं अंतर्मन कुरतडायला सुरवात करतात ज्याने तुम्ही आतून कधी पोखरले जातात हे कळत ही नाही ..

म्हणजेच अंतर्मनात नसेल पटत तर ती व्यक्ती ,ती घटना सोडून द्या पण द्वेष व तिरस्कार बाळगू नका ..कारण द्वेष व तिरस्कार त्या नकारात्मकतेला आपल्या मनात जिवंत ठेवण्याचे कार्य करते जे अंतर्मनाला मनःशांती कडे कधीच जाऊ देत नाही ..

म्हणून जे आवडत नाही त्याचा फार विचार करू नका , मनात चुकीचे विचार व चुकीच्या व्यक्तींना जागा देऊ नका ..

पहा बरं आज पासून सर्व नकारात्मक व्यक्ती अथवा घटनांना सकारात्मकतेने बघा …खूप प्रयत्न करून ही जर त्या व्यक्तीविषयी सकारात्मक मत वा विचार होत नसेल तर अशा व्यक्तींना मनातून delete करून टाका ..

त्यांच्या प्रतिमा ,त्यांचं वागणं ,बोलणं जे जे तुम्हाला त्रास देत आहे ते delete करून टाका ..मनातील जागा मोकळी करा ..

सकारात्मक व्यक्ती व सकारात्मक विचार हे सुगंधित फुलांसारखे असतात ते आपलं मन प्रसन्न ठेवण्यात मदत करतात …

तर नकारात्मक व्यक्ती व नकारात्मक विचार हे सडलेल्या कचऱ्या सारखे असतात जे दुर्गंधी पसरून आपल जगणं कठीण करत असतात..

मग आता आपणच ठरवायचं मनात सकारात्मक विचारांची बाग फुलवायची की नकारात्मकतेची कचराकुंडी बनवायची …

शेवटी आपली मनःशांती आपल्या हातात ,आपल्या विचारात आहे …दुसरे फक्त निमित्तमात्र असतात ..इतरांचा विचारांना आपल्या आयुष्यात किती प्राधान्य द्यायचं ते आपलं आपण ठरवायचं ..

शेवटी मन आपलं असतं तिथं कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही हे आपण ठरवायचं असतं ..

©आरसा मनाचा
“ससा”



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “मनाची आंतरिक शांतता म्हणजे काय? ती कशी निर्माण करावी??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!