तणावात असताना प्रत्येक व्यक्ती आपल्याला चुकीचीच वाटते.
Dr. Madhuri Misal
हर मुश्किल का हल होता है…
आज नहीं तो कल होता है…
2020 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखे झाले. वर्षाच्या सुरुवातीला कोरोना महामारी आणि नंतर त्याचे दुष्परिणाम आपण पाहिले. अजूनही आपण ह्या संकटातून बाहेर पडलो नाही.
कित्येक कुटुंबातील लोक ह्या महामारी मध्ये मृत पावले. कित्येकजण या काळात मानसिक तणावात राहिले. ह्याच काळात आपण कित्येक मोठ्या पदावर, प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या व्यक्तींच्या आत्महत्येच्या दुःखद बातम्या बघितल्या.
गेल्याच आठवड्यातील डॉक्टर शितलताई आमटे यांची आत्महत्या ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट. डॉक्टर शितल या आदरणीय स्वर्गीय बाबा आमटे यांची नात व डॉक्टर भारती ताई आमटे व डॉक्टर विकास आमटे यांची कन्या.
आदरणीय बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्यात सहभागी होणारी ही तिसरी पिढी. एवढा मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या कुटुंबातील व्यक्तीने अशाप्रकारे जीवनाचा शेवट करावा ही खरच खूप दुःखद बाब आहे.
प्राथमिक माहितीनुसार मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलेले असे पुढे आले .
मानसिक तणावा बद्दल नेहमी बोलले जाते पण मानसिक तणाव म्हणजे नेमके काय?
आपल्या आजूबाजूला काही बदल होत असतात. हे बदल दोन प्रकारचे असतात अनुकूल बदल व प्रतिकूलबदल.
ह्या बदलांवर आपण दोन पातळींवर आपली प्रतिक्रिया देत असतो. एक शारीरिक आणि दुसरी म्हणजे मानसिक. अनुकूल परिस्थिती आपोआप स्वीकारली जाते. पण प्रतिकूल परिस्थिती आपण स्वीकारत नाही. ह्याच प्रतिकूल परिस्थितीला आपण मानसिक स्तरावर जी प्रतिक्रीया देतो ते म्हणजे तणाव.
हा बदल जेवढा मोठा व न स्वीकारण्यासारखा असेल तेवढा तणाव जास्त असतो. हा तणाव जास्त काळ राहिला की चिंतेचे रूप धारण करतो आणि मग पुढे जाऊन नैराश्यासारख्या समस्यांना आमंत्रण देतो.
प्रत्येक प्राण्याला आपले आयुष्य जगताना संघर्ष हा करावाच लागतो. त्यामुळेच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असे म्हटले जाते.
एक छोटीशी गोष्ट आपल्या जन्माची…जी सगळ्यांनाच माहिती आहे..खूप प्रेरणा देणारी आयुष्याला उभारी देणारी. . आपण जन्माला कसे येतो हे साधारणपणे प्रत्येकालाच माहिती आहे.आपला जीवन प्रवास सुरु होतो sperm च्या प्रवासासोबत.अनेक sperm मधला तो एकच sperm आपली जागा बनवतो आणि तो आपण आहोत. म्हणजे पहिली लढाई जिंकणारे आपण आहोत.आपण जेव्हा एका छोटीशी सेल पासून गर्भाशयामध्ये वाढतो पूर्णत्वास येतो. मग अजून थोडा संघर्ष करून ह्या बाहेरील जगामध्ये प्रवेश करतो.
आता संघर्ष अजून वाढतो आणि मग जसेजसे आपण मोठे होत जाऊ तसे तसे या संघर्षाला आपण वेगळ्या पद्धतीने तोंड देऊ लागतो आणि साधी गोष्ट खूप मोठी बनवून तणावग्रस्त होतो.
या तणावाची पण एक गंमत आहे आपण जेंव्हा जेंव्हा ताणतणावात असू तेंव्हा तेंव्हा आपल्याला प्रत्येक जण चुकीचा वाटतो.
आपल्यावर खूप अन्याय होतोय असे वाटू लागते. मग आपण आपल्याच लोकांपासून दूर जाऊ लागतो आणि मग एकटेपणा ओढवून घेतो. Feeling lonely हे वाक्य आता सर्रास बोलले जाते. एकटेपणा मध्ये मग कधी तरी एखाद्या परिस्थितीला तोंड कसे द्यावे हे समजत नाही आणि मग आत्महत्याचे चुकीचे पाऊल उचलले जाते.
आतापर्यंत ताणतणावावर खूप भाष्य झाले. पण हा ताण आलाच म्हणजे तो तसा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे असे म्हणा…मग हा ताणतणाव तुम्ही कसा कमी करावा,त्याला कसे तोंड द्यावे यावर थोडी चर्चा झाली पाहिजे.माझ्यामते ह्या काही गोष्टी आपण आवर्जून कराव्यात की ज्यामुळे हा ताण तणाव थोडा तरी कमी होईल.
दृष्टीकोन- समर्पक अशी एक शायरी
नजर को बदलो तो नजारे बदल जाते है!
सोच को बदलो तो सितारे बदल जाते है!



Tanavat astana itar lokan badal chukicha dhorana, svabhavik jari vatat asel, tarihi, shevti asambhatit ahe. Hi janav ati avasyak asun aple tanavacha khara karan shodun kaadne, atyant garjecha ahe , swatacha jawabdaar amhi swata aslya mulay, itararana dosh dene va swatacha jawabdaari talna sarka ahe. Tanav cha karan apla madla kamturtapana mulay udbhavale asun, tyacha samadhan hi apla vyatitvacha sudhar ani parivartana marfat gadlela uttam hoya.
Nice …