शारीरिक संबंधातून दोघांनाही समान आनंद मिळायला हवा.
डॉ.सि.व.हुकिरे
कळते पण वळत नाही म्हणनार्या कित्येक जोडप्यांना या लेखाचा नक्कीच फायदा होईल. मुळात या विषयावर मनमोकळेपणाने न लाजता निरोगी चर्चा व्हायला हवी. आणि मला वाटतय अशा प्रकारच्या पोस्ट मुळं कुठं तरी या विषयाला नक्कीच तोंड फुटेल.
खरं तर पती पत्नीच्या शारीरिक संबंधातुन दोघांनाही समान आनंद मिळावा अशी व्यवस्था निसर्गाने संभोगाच्या माध्यमातुन केली आहे.
बर्याच जोडप्यांमध्ये संभोग हा अतिशय यांत्रिक पद्धतिने केला जात असल्यामुळे त्यातल्या खर्या आंनदाला/मजेला ते मुकतात.संभोगाबद्दलच्या अतिशय चुकिच्या अथवा अपुर्ण माहितीमुळं असं होतं.
संभोग करण्यासाठी पती हा लवकर तयार होतो आणि पत्नीस जरा उशीर लागतो.पतीने अनावश्यक घाई करणं आन् पत्नीनं जास्त उशीर लावणं या दोन्ही गोष्टींमुळं संभोगाच्या अत्युच्च आनंदाच्या क्षणाचं timing चुकतं.
त्यामुळं वैवाहिक जीवनात अनेक दिवस सेक्सचा आनंद ? घ्यायचा आसेल तर जरा धिरानं घ्यावं.
संभोगाच्या वेळी पतीने पुढाकाल घेणं आणि पत्नीनं दुय्यम भुमीकेत राहणं हे नैसर्गिक आहे ? म्हणुन उगाचच “माझी पत्नी” बर्याचदा थंडच असते अशी तक्रार करु नये.
कथाकादंबरीत,सिनेमात दाखवल्या जाणार्या किंवा मित्रांनी वाढवुन सांगीतलेल्या सेक्सच्या लाईफची तुलना करु नये त्यापेक्षा तुम्ही किती चांगलं perform करु शकता याकडं लक्ष द्यावं.
योग्य क्षण येईपर्यंत पतीपत्निने Fore play/संभोगापुर्वीचे चाळे करुन आनंदाची देवाण घेवाण करावी.
शिवाय पतिपत्नी ची शारीरिक तयारी,मानसिक अवस्था,कुटुंबात घडणार्या चांगल्या वाईट घटना,एकंदरीतच Mood वर निरोगी संभोग सुख अवलंबुन असतं. “Mood” नावाचं condom वापरलं म्हणजे mood येईलच असं नसतं?
लास्ट बट वन, पती-पत्निचे समाधानकारक शरीर संबंध असणे हा सुखी वैवाहिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे. आणि निरोगी लैंगिक जीवनासाठी पती-पत्निचं मानसिक आरोग्य चांगलं असणं तितकेच महत्वाचं आहे.सोबतच विवाह केवळ सेक्सच्या अनुभवासाठीच केला जात नसतो हे सुद्धा पतिपत्नीने समजुन घेतले पाहिजे.
असो_____सर्व”विवाहितांना” सुखी निरोगी संभोगसुखासाठी सस्नेह सदिच्छा
आणि हो अविवाहितांसाठी हस्तमैथुन शाप नसुन वरदानच आहे?



छान माहिती दिली
छान माहिती दिली
?
पती पत्नी चे योग्य ते शारीरिक संबंध सेक्स, खूप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.