Skip to content

मी… माझी लेक… आणी पाळी….!

वर्षा राहासे


मी… माझी लेक… आणी पाळी….!


आज एका नवीन विषयावर बोलतेय काहिना हा विषय जरा वेगळा वाटेल पण मला वाटल मी यावर लिहाव. आज जेव्हा कपाट आवरत होते तेव्हा विस्पर च पैक पाहुन अंश मला विचारतो की “आई ये आप यूज़ करते हो ना, दिदि क्यों ये यूज़ नही करती???” मी अगदी सहज बोलून गेली की “अभी टाईम है दिदि अभी छोटी है बड़ी होगी ना तब यूज़ करेगी” हे ऐकताच त्याने प्रतिप्रश्न केला “अब तो दिदि होस्टेल जायेगी अब तो वो बड़ी हो गई ना???” त्याच्या या प्रश्नाने मीच विचारात पडले की, खरचं आयुषी आत्ता होस्टेल ला जाईल आणि जर तिला होस्टेला पिरेड्स आले तर????, कशी हैंडल करेल ति????. मग विचार केला आज आपण तिच्याशी या विषयावर बोलायच…

विषय तसा मझ्यासाठी नवीन नव्हता कारण मी सेल्फ डिफेन्स चा डेमो देताना बऱ्याचदा पिरेड्स वर बोलत असते. आणि आयुषी बऱ्याचदा माझ्या सोबत स्कूल्स वर आली होती आणी तिने पिरेड्स बद्दल ऐकल होत. आणि अनिल आणी माझ बोलन हि तिने बऱ्याचदा ऐकल होत… पण आज तिच्याशी बोलताना मलाच कळत नव्हतं की सुरुवात कशी करू?? कारण आज पर्यंत ज्या मुलींशी पाळी बद्दल बोलले होते त्यांना ऑलरेडी पाळी येत होती सो जास्त डिफिकल्ड झाल नाहि. पण आयुषी च्या बाबतीत तस नव्हतं तिला पाळी आजुन यायची होती, शिवाय ति माझ्याशी जास्त open होत नाहि. पण मनाशी ठरवले की नाहि हे तिला माहीत असाव कारण जर तिला पाळी आलि आणी मी सोबत नसले तरी ती ते न घाबरता हैंडल करू शकेल. आणी मी तिला घेऊन बसली आणी बोलण्याची सुरुवात केली पहिले तर इकळचे तिकलचे प्रश्न विचारुन सुरुवात केली मग हळूच तिला म्हटले की, “कबर्ड में विस्पर का पैक हे जरा लेके आओ ना’ ति उठली आणी पैक आणून माझ्या हातात ठेवला. मी तीच पूर्वंन्यान म्हणून तिला विचारल “ये क्या है पता है आपको??” ती बोलली “हां pad हे पिरेड्स पे यूज़ करते है”. मग मी नंतर विचारल की, “आपको पिरेड्स के बारे में क्या पता है?” ती बोलली की “हर लड़की को पिरेड्स आते है, तब दर्द होता है पेट में ब्लड़ आता है सुसु करते हे वहा से, और अगली पीढ़ी को जन्म देने के कार्य में ये बोहत important है” तीच हे बोलन ऐकुन मीच हैरान झाले? की हिला हे सर्व कस माहिती आणी ती किती सहज बोलतेय हे सर्व. मग मी तिला विचारल, ” ये सब कहा से पता चला आपको?” तर ही बया म्हणते की, “आपने बोला था ना स्कूल में तब सूना था लेकिन आई एक बात पूछनी थी?” मी बोल म्हंटले “की अगर पिरेड्स अच्छे होते है तो गांव में लोग उसे गद्दा क्यू बोलते है?” मी विचार केला की हिने कधी पाहिल की लोक पाळी ला गंद समझतात?? कारण माझ्या घरात अस कधीच बोलल गेल नाहि मी विचारल ” किसने पिरेड्स को गंदा कहा था?” तीच उत्तर “padman movie में देखा था, वो बोल रहे थे महावारी गंदी होती है” मग मि विचारल की “( तिला हे हि माहीत होत की पाळी ला माहावारी म्हणतात) आपणे मूवी देखा है ना तो क्या आपको लगता है पिरेड्स गंदे होते है ? ” तीच उत्तर ” पता नही जब मुझे आएंगे तब पता चलेगा” मि बोलले “जब मुझे पिरेड्स आते है तो क्या में गंदी हो जाती हूं?, तीच उत्तर ” नही आप कब पिरेड्स पे होते हो ये पता नही चलता पर पापा जब pad लाते हे तब पता चलता हे” माझा तिला प्रश्न “तो अब बताओ क्या पिरेड्स गंदे होते है? तीच उत्तर ” नही” आजुन बरेच प्रश्न होते तिचे तिच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी तिला समजेल त्या भाषेत तिला सांगत गेले. पण मला या सर्वात एक लक्षात आले की, माझ्या डेमोच्या लेक्चर मुळे, घरातील माझ्या अनिल च्या बोलण्या मुळे तिला पाळी हा विषय समझुन घेण्यात अजिबात अड़चन आली नाहि. तिने अगदीच सहजपणे सर्व समझुन घेतल. घरातील वतावरणाचा मुलांच्या वाढिवर किती परिणाम होतो हे मला समझल. किती न कळत आयुषी ने सर्व अनुकरण केल? शेवटी ति एकच बोलली की “अब में ये बात अपणी सारी friends को बताउंगी की पिरेड्स गंदे नही अच्छे होते है?”

हि माझी आणी माझ्या लेकिची आणी पाळीची छोटीसी स्टोरी☺??????☺☺



आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!