Skip to content

नेहमी चांगल्या बाजूकडे बघा, आणि पराजय टाळा.

हार व मानसिकता


श्रीकांत कुलांगे


अजय वास्तविक अत्यंत चांगल्या परिस्थितीतून जात असतानाही निराशेच्या गर्तेत सापडला होता. समुपदेशन करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की पीछेहाट, अडथळे, निराशा आणि इतर निराशाजनक परिस्थितींबद्दल तुम्ही कोणती मनोभूमिका स्वीकारता, यावर तुम्हाला यश मिळेल की अपयश, हे ठरत असतं.

अपयशाचं यशामध्ये, पराजयाचं विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला साह्यभूत ठरतील अशा काही मार्गदर्शक गोष्टी अजयला सांगणं गरजेचं वाटले.

१. पीछेहाटीतून विजयाचा मार्ग निर्माण करण्यासाठी, पीछेहाट का झाली, याचा अभ्यास करणं आवश्यक. पराभवातून धडा शिकून पुढच्या वेळी विजयाच्या दिशेनं आगेकूच महत्वाचं.

२. स्वतःच स्वतःचे योग्य टीकाकार बनणे उपयुक्त. स्वतःमधील दोष आणि त्रुटींचा शोध घेऊन त्या सुधारल्यास आपण व्यवसायिक प्रवृत्तीचे बनतो.

३. नशिबाला दोष देणं बंद करून प्रत्येक अपयशाचा अभ्यास केल्यास आपलं काय चुकलं, याचा शोध घेणं महत्वाचं. नशिबाला बोल लावून कुणालाही काही मिळत नाही, हे विसरून चालणार नाही.

४. चिकाटीची प्रयोगशीलतेशी सांगड घालत असताना आपलं ध्येय सोडायचं नाही हे बेसिक आहे, पण आपलं डोकं भिंतीवर घेण्यापेक्षा नवे मार्ग शोधणं, नवनवीन प्रयोग करत राहणं आवश्यक.

५. प्रत्येक गोष्टीला, माणसाला आणि परिस्थितीला चांगली बाजू असतेच हे विसरू चालणार नाही. त्या चांगल्या बाजूचा शोध घेणं व निराशेला दूर पळवणे आपल्या हातात आहे.

अर्थात अजयला हे माहीत नव्हते असे नाही. परंतु आपण या बेसिक गोष्टी लक्षात का ठेवत नाही हा प्रश्न आहे. त्यासाठी खूप खोलात सुध्दा जायची गरज नाही.

१. अयोग्य सल्ला व मित्र.

२. शारीरिक आणि मानसिक आजार.

३. राग आणि चिंता व्यवस्थापन न करणं.

४. आर्थिक टंचाई त्यातून आलेलं वैफल्य त्रासदायक ठरते.

५. फिटनेस ची कमी. वेळेचं अयोग्य नियमन.

६. कमी अभ्यास किंवा पुढील धोके ओळखण्यास अपात्र.

७. कौटुंबिक कलह, त्रासदायक वातावरण.

८. मनावर व विचारांवर ताबा नसणं.

एक ना अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. त्यात जर आपण कच्च्या कानाचे किंवा डोक्याचे असू तर निर्णय नक्कीच चुकणार.

लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ज्याची अपेक्षा असते, तेच तुम्हाला दिसत असतं. नेहमी चांगल्या बाजूकडे बघा, आणि पराजय टाळा. तुमची दृष्टी स्वच्छ असेल, तर जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे तुम्हाला जाणवेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!