Skip to content

आपण आपले आयुष्य कसे जगतो हे जास्त महत्वाचे आहे !!

आपण आपले आयुष्य कसे जगतो हे जास्त महत्वाचे आहे !!


राजदीप कुलकर्णी


आपण आपले आयुष्य कसे जगतो हे जास्त महत्त्वाचे की आपल्या कडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्त्वाचे??

वरवर पाहता या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतील सगळ्यांना. हा काय प्रश्न आहे असेही काही जण विचारतील..

पण आपले स्वतःचे आयुष्य मनासारखे जगता यावे म्हणून सगळेजण धडपडत असतात. त्याच बरोबर लोकमानसात आपली प्रतिमा ही चांगली असावी असं ही सगळ्याना वाटते. आणि ही तारेवरची कसरत करताना सगळ्यांची खूप दमछाक होते हे नक्कीच??..

म्हणजे आपण सगळे जसं म्हणतो की राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणे खूप गरजेचं आहे,त्याचबरोबर मोठं पद मिळाल्यानंतर ती प्रतिमा जपणं हे पण तितकेच महत्वाचे.पण वास्तविक पाहता असं फारच कमी लोकांच्या वाट्याला येते की मोठं पद आणि स्वच्छ प्रतिमा..

सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात देखील काहीसं असेच असतं.हो ना??
घर, नोकरी, व्यवसाय सांभाळून आपलं स्वतःच वेगळे अस्तित्व निर्माण करणे, त्याचबरोबर स्वतःचे छंद जोपासणे, आपल्या अंगीभूत कलेला वाव देणं आणि परत समाजात चांगली प्रतिमा निर्माण करणं हे सर्वांनाच जमते असं नाही..
ज्यांना हे सगळं जमते त्यांचे खरंच अभिनंदन करायला हवं..??

पुष्कळ वेळेस आपण आपल्या कलागुणांना वावच देत नाही किंवा आपल्या मनात असलेलं आयुष्यच जगत नाही. हा काय म्हणेल?ही काय म्हणेल अस करत करत सगळं आयुष्य निघून जाते.आणि उरतात फक्त क्लेशदायक संवेदना..?

अरे आपण त्या वेळी अस केलं असते तर खूप पुढे गेलो असतो, त्या वेळेस जर थोडंस धाडस केले असते तर या जगण्यांला अर्थ मिळाला असता. पण काय करू? परिस्थिती तशी नव्हती..

मित्र मैत्रिणी नो, आपल्याला सूट होईल अशी परिस्थिती कधीच आयुष्यात येत नसते. आपणच ती परिस्थिती आपल्या बाजूने करायची..

नियती त्याच्या सोंगट्या टाकत राहते. पण आपण त्या सोंगट्या कश्या वापरतो हे आपल्या हातात आहे.. परिस्थिती आपोआपच तुम्हाला योग्य होत राहते..

बघा विचार करा….???



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!