Skip to content

‘आपला मानसिक त्रास’ हा आपल्याच हातात असतो.

आपला मानसिक त्रास’ हा आपल्याच हातात असतो.!


मयूर जोशी


मी एकटेपणाची प्रौढी जाम मिरवतो असे लोक मानतात आणि त्यात काही चुकीचे नाहीये . बाकी लोक प्रेमाच्या , प्रेयसी च्या प्रियकराच्या गोष्टी सांगतात , अगदी कविता चारोळ्या अन्य काय काय लिहितात तसेच me एकटेपणावर मनसोक्त बोलत असतो लिहीत असतो इतकेच .

अर्थात यातील शेवटचा परिच्छेद सगळ्यांनी नीट वाचावा… नाहीतर लोक उगाच पेटतात.

I am the lone wolf…

I am single by choice..not by situation….

माझ्या वयाच्या 18 व्यं वर्षी मी निर्णय घेतला होता की मी एकटा जगणार. कोणतेही रिलेशन किंवा लग्न यात न जाता. बाकी लोकांपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने. चाकोरी बाहेर.

जवळपास सगळे जण एकाच पद्धतीमध्ये आयुष्य जगत असतात. बालपण त्यानंतर शिक्षण मग नोकरीधंदा त्यानंतर लग्न आणि मुलेबाळे. परंतु त्यातील एकही माणूस छातीठोकपणे हे सांगू शकत नाही की मी पूर्णपणे समाधानी आहे. पूर्णपणे आनंदी आहे. आज जर का त्यांना आनंद झाला असेल तर तो उद्या टिकेल की नाही याची त्यांना शाश्वती नसते.

त्यामुळे मला जास्त भावले ते एकटे राहणारे लोक. स्वामी विवेकानंद , शंकराचार्य, बुद्ध, मच्छिन्द्र , गोरख नाथ यांच्यासारखे. त्या वयामध्ये अशा लोकांना वाचून झाले. त्यांनी ठामपणे सांगितले की शाश्वत आनंद आणि समाधान मिळणे शक्य आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पद्धतीने थोडेफार चालून बघूया असा विचार तेव्हा केला.

गेली अठरा वर्ष एकटा राहतो. आई-बाबा आहेत परंतु ते गावी असतात. एकटे राहण्याची इतकी जास्त सवय लागली आहे. एक प्रकारचे व्यसन आहे ते. कोणीही आडवायला नाही. रात्री दोन वाजता मनात आले की गाडी घेऊन निवांत लांबवर फेरफटका मारायला बाहेर पडणे. कोणीही विचारणारे नसते की कुठे चाललास. आपणच आपल्या मनाचे राजे.

अर्थातच माणूस एकटा असला काय किंवा कोणा बरोबर राहत असला काय चांगले आणि वाईट गोष्टी घडत असतातच. परंतु कोणातही न अडकता आणि एकटे राहिल्यामुळे आपल्या आयुष्यात जर काही वाईट प्रसंग आले तर त्याचा दोष दुसऱ्याला देण्याची गरज संपते. जे काही वाईट होत आहे ते फक्त माझ्यामुळे याची जाणीव असते त्यामुळे दोषारोप करणे व दुसऱ्या मुळे मनस्ताप करणे हा भाग संपून जातो.

अर्थातच लोक हा प्रश्न विचारतात आता ठिक आहे तू तरुण आहेस परंतु म्हातारपण आल्यावर लक्षात येईल की जोडीदाराची गरज असते. परंतु याला मी निव्वळ स्वार्थीपणा म्हणतो. म्हातारपणाची सोय म्हणून जर का जोडीदार करण्याचा विचार मनात येत असेल तर तो निव्वळ स्वार्थ आहे. आणि म्हणूनच मी लग्न किंवा एकत्र राहणे याला व्यवहार म्हणतो.

लोक हे उगाचच भावनिक असतात त्यामुळे त्याला प्रेमाचे नाते नाव देतात. म्हातारपणी आपली मुलेबाळे आपली काळजी घेतील ही मनात असलेली इच्छा देखील अत्यंत स्वार्थी. आणि तसेही तुमचा जोडीदार म्हातारपणापर्यंत टिकणार आहे किंवा जगणार आहे याची कोणतीच शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. नवरा-बायको हातात हात घेऊन एकत्र मरत नाहीत सिनेमाप्रमाणे. एकाला मागे ठेवूनच हे जग सोडावे लागते. आणि मागे राहिलेल्या ची फारशी मानसिक आणि भावनिक तयारी झालेली नसते एकटे राहण्याची.

एकटे राहण्यासाठी प्रचंड स्ट्रॉंग बनवावे लागते स्वतःला. शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या. जेव्हा मी आजारी पडतो त्या वेळेला माझ्या आजूबाजूला कोणीही नसते. आणि मी कोणालाही बोलवत देखील नाही किंवा सांगत नाही.

कारण जे काही होईल ते परमेश्वराच्या इच्छेने होईल अशा पद्धतीने माझे आयुष्य चालू असते. स्वतः जाऊन डॉक्टरांकडे जाणे किंवा आजारपणाच्या काळात देखील स्वतःचे जेवण स्वतः बाहेरून आणणे हे सगळं काही मी करतो. आणि त्यामध्ये मला प्रचंड मजा येते.

बाहेरून शरीर आजारी वाटेल परंतु आत मध्ये मी मात्र प्रचंड आनंदात असतो आणि अजूनच जास्त आत्मविश्‍वास कमावलेला असतो की मी कोणावरही अवलंबून नाही. अगदीच मला उठता आले नाही तर मात्र मी अगदी जवळची एक दोन माणसे आहेत त्यांना मला जेवण आणून देण्यास सांगतो इतकेच. परंतु माझ्या जवळ कोणी बसावे आणि माझी काळजी घ्यावी ही मात्र इच्छा अजिबात नसते. उलट आजारपणा मध्ये शरीराचे विकार आणि वखवख कमी झालेले असतात त्यामुळे नामस्मरण आणि अनुसंधान ठेवणे जास्त सोपे जाते.

आत्ताच lockdown मध्ये अचानक स्लिप डिस्क झाली cervical spine मध्ये. प्रचंड pain . 6 दिवस एक तास पण झोप नाही . एक महिना बेड रेस्ट . अगदी जवळचे friends यांनी प्रचंड मदत केली जेवण आणून देणे wagaire. पण या काळात देखील असे वाटले नाही कि कोणी जवळ asave. फ्रेंड्स असलेच पाहिजेत. पण सतत konitari डोक्याशी असले पाहिजे अस नाही. माझ्या घरी sudhha माहित नाहीये कि मी अश्या अवस्थेत आहे. Mulat प्रचंड मानसिक आणि भावनिक ताकद असलेला manusch स्वेच्छेने एकटा राहू शकतो .

म्हातारं पणी काय होणार? अर्थात म्हातारपणापर्यंत जगण्याची अशी इच्छा नाहीच आहे मुळात. परंतु ते आपल्या हातात नसते. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदात जगणे इतके मी करू शकतो आणि ते पूर्णपणे माझ्या हातात आहे. बाकीच्या कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीमुळे किंवा वर्तनामुळे माझ्या आनंदात आणि समाधानात कमीपणा येण्याची शक्यता अत्यल्प असते. मीदेखील जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु कोणाकडून मदत कमीत कमी मागता येईल असे जगण्याचा प्रयत्न करतो. मग ते मानसिक किंवा भावनिक मदत असो.

एकटे राहील्यामुळे आपले छंद जोपासता येतात. आपण जो पैसा कमवत आहोत तो पूर्णपणे आपल्या छंदासाठी किंवा स्वतःसाठी आपण वापरू शकतो. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी देखील वापरू शकतो. कारण माझी बायको आणि माझे मुलेबाळे यांच्याबाबत मला विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

एकटे राहिल्यामुळे अर्थातच स्वतःसाठी मिळणारा वेळ प्रचंड असतो. मी चांगल्या पद्धतीने फोटोग्राफी करायला शिकलो, थोडेफार लिखाण करतो, बऱ्याच विषयांचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. मनाला येईल तसे फिरायला जातो. अर्थात या सगळ्या गोष्टी लग्न झालेल्या लोकांना देखील शक्य असतात यात वाद नाही परंतु त्यामध्ये बरेच तडजोड आणि दुसऱ्या लोकांचा विचार करणे हा भाग असतो.

I neither desire to live nor to die…

म्हणजेच जर का उद्या मला मरण आले तरी देखील मी त्याच्यासाठी तयार आहे पूर्ण आनंदाने. आणि जर का अजून मला दोनशे वर्ष जगायचे आहे असे सांगितले तरी देखील मी तितक्याच आनंदाने ते दोनशे वर्ष काढेल याची मला खात्री आहे.

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर अटॅच होतो त्या वेळेला थोडक्या मध्ये आपण त्या व्यक्तीच्या हातात आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दिलेला असतो.जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात आनंद आला आहे असे आपल्याला वाटते त्याच वेळेला ती व्यक्ती जाण्याने आपल्याला दुःख होणार असते हे आपण आधीच ठरविलेले असते. आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम मी माझ्या आयुष्यावर नक्की होऊन देणार नाही याची मला खात्री आहे.

जर का सगळे तुझ्यासारखे राहिले तर या जगाचे काय होईल, माणूस जात संपून जाईल असे काही जणांचे म्हणणे असते.

पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे कारण सगळेजण एक सारखा विचार करणे कधीही शक्य नाही.

आणि आणि असे समजून चालू या की सगळ्यांनी माझ्यासारखा विचार केला तरीदेखील काय फरक पडणार आहे. तसेही आपण मेल्यानंतर आपल्यानंतर आपली पिढी काय करत आहे याचे खरंच कोणाला ज्ञान असते? त्यामुळे आपण मेल्यानंतर आपली पिढी किंवा संपूर्ण मनुष्य जात नष्ट झाली तर त्याने फरक काय पडणार? आणि तसेही मनुष्यजात म्हणजे निसर्गाला शाप आहे.

इतके मोठे तारे यांचा अवकाशामध्ये प्रत्येक क्षणाला नष्ट होत असतात तेथे मानवजात आणि तिचे अस्तित्व अत्यंत नगण्य आहे.

म्हातारपणी माझ्यासारख्या माणसाला कोणता हे भावनिक किंवा मानसिक त्रास होणार नाही इतके नक्की. शारीरिक त्रास आपल्या हातात नसतात. परंतु मानसिक आणि भावनिक त्रास मात्र नक्की आपल्या हातात असतात.

कारण लग्न केलेल्या किंवा कोणाबरोबर तरी आयुष्य काढलेल्या माणसांना कोणी ना कोणीतरी बरोबर सोबत असावे या गोष्टीची सलग तीस ते चाळीस वर्ष सवय झालेली असते. त्यामध्ये त्यांचा पार्टनर हे जग सोडून गेला की नंतर मात्र एकटेपणा त्याला खायला उठते. कारण एकटेपणाची कधीही सवय झालेली नसते. आणि अशा सवयी अचानक लागत नाहीत. त्यासाठी ते चाळीस वर्षांची तपश्चर्या एकटे राहण्याची मागे असावी लागते.

परिस्थिती ओढवली यामुळे एकटे राहणे आणि स्वतःच्या निर्णयामुळे एकटे राहणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्वतःहून एकटे राहणे व भविष्यातील आयुष्याचा आहे वाईट प्रसंग आधीच लक्षात घेऊन स्वतःला त्यासाठी पूर्णपणे तयार करणे यासाठी मनाची प्रचंड ताकद लागते.

अर्थातच यामध्ये देखील मी मनुष्य असल्यामुळे समूह हा मला आवडतो यात वाद नाही. माझ्याबरोबर जंगलामध्ये फिरणारे आहे काही मित्र व मैत्रिणी. कधी कधी रात्र रात्र गप्पा मारणारे मित्र-मैत्रिणी हे आहेतच. परंतु एक दिवस एकटे राहणे व त्यांच्या मध्ये एकत्रित राहणे यामध्ये मला कधीही फरक जाणवला नाही. ते असले तरी मी आनंदी असतो आणि ते नसले तरी देखील.

काही लोक एकटी असले तर भीतीने झोपू देखील शकत नाहीत. कारण एकटे राहण्याची सवय आज अजिबात नसते. एकटे राहण्यासाठी प्रत्येक भीतीवर मात करावे लागते. मग ती खर्‍याखुर्‍या माणसांची असेल किंवा मनाने तयार केलेल्या भुतांची असेल.

त्यामुळे बऱ्याच जणांना हे वाटते की एकटा माणूस म्हणजे मानसिक दृष्ट्या कमकुवत आणि जबाबदारी घेण्याकरता नकर्ता असतो. नालायक असतो म्हणून तो एकटा राहतो. परंतु साथीदाराच्या जोडीने आणि मुलाबाळांच्या साथीने जगणारे तर 90% आजूबाजूला सापडतात कारण ती गोष्ट अत्यंत सोपी आहे.

अर्थातच माझाच रस्ता बरोबर हा माझा आग्रह नाही. परंतु बाकीच्या लोकांचा मात्र बोलताना हा सूर नक्की असतो की आपला धर्म किंवा संस्कृती किंवा पारंपारिक गोष्टी याप्रमाणे लग्न करून राहणे हा आपला धर्म आहे वगैरे वगैरे. थोडक्यात त्यांचा रस्ता बरोबर हे बहुसंख्य लोक सांगण्याचा प्रयत्न नक्की करतात. माझे असे काहीच म्हणणे नाही.

तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण तुमच्या समाधान आणि आनंद कायम राहत असेल तर तुम्ही लग्न करून रहा किंवा एकटेच रहा काहीही फरक पडत नाही. शेवटी शाश्‍वत आनंद आणि समाधान हेच सत्य ज्याच्या शोधात माणूस जन्मापासून कायम असतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “‘आपला मानसिक त्रास’ हा आपल्याच हातात असतो.”

  1. खूप छान विचार !!! प्रत्येक शब्द न शब्दाशी सहमत …!

  2. TATYASAHEB AKHADE

    I like this article so much. It has power to
    Make people think differently and change
    their point of view towards life.

    People should learn to live life independently. I don’t mean that they should not marry anyone. But one thing is very loud and clear that we should learn to live life happily whether someone is with you or not.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!