Skip to content

लैंगिकतेवर बोलू काही…….

प्रभाकर सुधाकर पवार


लैंगिकतेवर बोलू काही…….


एक चित्रपट पाहत होतो. चित्रपटामधील एक दृश्य असे दाखवले. चित्रपटातील नायक दुसर्‍या ग्रहावरून आलेला असतो. एका कार्यालया बसला असता. शेजारून एक व्यक्ति जाते. त्या व्यक्तिच्या खिशातून कंडोमच पाकिट पडते. हा नायक ते पाहतो आणि त्याला परत करण्यासाठी आवाज देतो. मुळात नायकाला माहीत नसते. हे पाकिटं नक्की कश्याचे आहे. ती व्यक्ति त्याचे कंडोम पाकिट असून घ्यायचे नाकारतो. मग हा अनेकांना विचारतो हे तुमच आहे का?. पण कुणी त्याला आपलं बोलायला तयार झाला नाही. प्रत्येक टाळू लागला. नंतर नायिका सांगते की हे ह्या माणसाचे आहे. मग हा त्याला पाकिट देतांना विचारतो.
“हे काय आहे?.
समोरून उत्तर मिळते हे कंडोमचे पाकिट आहे.
हा पुन्हा प्रश्न विचारतो.
“याचा उपयोग काय?.
समोरून उत्तर मिळाले.
“हे संतति प्रतिबंधक आहे.”
याचा पुन्हा प्रश्न
“मग सर्व ह्याला टाळीत का होते.”
समोरून उत्तर आले की.
“स्त्री पुरुषामधील शारीरिक संबंध ही वैयक्तिक बाब आहे. म्हणून त्या गोष्टीबद्दल कुणी उघड चर्चा करत नाही.”
याने पुन्हा प्रश्न केला.
“सेक्स ही वैयक्तिक बाब आहे तर मग लग्न करतांना तुम्ही तर मोठ्या धुमधडाक्यात करता. आख्या जगाला अोरडून सांगता. हे दोघे स्त्री पुरुष लग्न करण्याच्या माध्यमातून सेक्स करायला एकत्र येणार आहेत.”
समोरच्या व्यक्तीकडे ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. हे आम्ही शिकलो पण लैंगिकता ही सुध्धा माणसाची मुलभूत गरज आहे हे आम्हांला कुणी सांगत नाही. कदाचित ही गरज जन्मताच नसेल पण वयाच्या काही वर्षानंतर तयार होतेच की. पण ह्या विषयावर चर्चा कधी केली जात नाही. ह्या अश्या विषयावर बोलणार्‍या व्यक्तिला फालतू म्हणून हिणवल जाते. वयात आल्यावर तो शारिरीक बदलाला सामोरा जातो. उदा. आवाजात घोगरा पणा येतो. नाका खाली अोठा जवळ कालसर होते. मुलींना मासिक पाळी यायला सुरवात झाली असते. ह्या सर्व बदला बद्दल त्यांना पायजेय ती माहिती नसते. अश्यावेळी मुलांन मध्ये आपण काही चुकतो का?. मग मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. म्हणून कदाचित सांगीतलं जात असेल मुलं मोठी झाली का पालकांनी त्यांच्या बरोबर मैत्रीचे नाते ठेवायचे असते. संस्काराच्या नावाखाली सेक्स ची गरज मारून तर टाकली जात नाही ना?. जो जन्माला आलाय जगात सेक्स ही त्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. वयात आल्यावर विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण स्वाभाविक आहेच. ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.
सेक्स दोघांची गरज असते. पण एखाद्या वेळेस एकाला सेक्स हवा असतो आणि दुसर्‍याला नको असतो. त्यावेळेस माणूस म्हणून दुसर्‍याला समजून घेणं गरजेच असते. कधी कधी मानसिक अथवा शारिरीक थकव्या मुळे सुध्धा जोडीदारा कडून नकार मिळत असेल अश्यावेळी जोडीदाराला प्रेम द्या. भांडण नको. एकाच्या इच्छेने होणारा शरीर संबंध हा आनंद देणारा नसतो. तो बलात्कारच असेल न उघड होणारा.
***
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लैंगिकतेवर बोलू काही…….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!