परिस्थितिला समजून घेवूयात….


अरबाज मोमीन


आयुष्यात ज्याला जगायचच असतं ना तो कशाही पद्धतीने जगतो पण ज्याला भीती ही मरणाची असते ना त्याला कोणी ही वाचवू शकत नाही.

जो पर्यंत तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहात तो पर्यंत तुम्हाला अडचणी येत राहणार आणि हळूहळू त्यामधून मार्ग ही निघत जाणार परंतु यामध्ये महत्त्वाच आहे ते संयम हे माणसाने कायम म्हणजे कायम आपल्या जवळ ठेवावे मग ते कोणत्या ही गोष्टी बाबतीत असो.

Advertisement

कोणताही येणारा प्रसंग हा काही काळा पुरता मर्यादित असतो पण तो मर्यादितच असतो याची खूणगाठ प्रत्येक माणसाने डोक्यामध्ये बांधून ठेवायला हवी. मी काय करू शकतो याचं विचार करण्यापेक्षा माझ्या कडून काय होईल याचा विचार करणे महत्त्वाचं आहे.

स्वतः मध्ये असणार चांगले विचार शोधा, त्यांना स्वतः तुमच्या वर्तमान जीवनात कशा पद्धतीने अमलात आणता येईल याचा विचार करा. स्वतःसाठी वेळ द्या, जीवनात मृत्यू हे एकदाच आहे परंतु येणारी नवीन पहाट हे तुमच्यासाठी रोज एक नवीन जीवन आहे.

त्यामुळे तुमच्यामध्ये असणाऱ्या कमतरता यांना पूर्णत्व कसे मिळेल आणि त्या गोष्टीमध्ये आपण आपले सर्वस्व कसे देऊ शकतो याच्या बाबतीत सकारात्मक विचार करा.

Advertisement

एक उदाहरण सांगतो विनीत आणि धवल हे दोघे मित्र गाडीवर जात असताना समोरून एक ट्रक येऊन त्यांना धडक देऊन निघून जातो त्यांच्या गाडीचा अपघात होतो.

हळूहळू तेथे लोक जमू लागतात सर्व परिस्थिती बघून लोक विचार करतात की आता ही वाचतील का? कारण एवढा भयानक अपघात होता तो, थोड्यावेळाने तेथे एक ॲम्बुलन्स येथे आणि दोघांनाही घेऊन जाते दोघांवर उपचार सुरू होतात त्यांच्या घरच्यांनाही कळवलं जातं सहा-सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर दोघेही सुखरूप बाहेर येतात परंतु दोघांचे वार्ड वेगवेगळे असतात, आपला मित्र कसा असेल याची दोघांनाही कल्पना नसते.

दोन तीन दिवसानंतर हळूहळू विनीत मध्ये चांगला फरक दिसू लागतो परंतु धवलच्या बाबतीत मात्र पूर्णपणे उलट होत असत, विनिता मनातून खूप सकारात्मक होता तो सतत असा विचार करत होता की आपल्याला विधात्याने पुन्हा एक नवीन जीवन दिले आहे.

Advertisement

आपली श्रद्धा आपण केलेली कामे आज आपल्या अडचणीच्या वेळेस मदतीला आले त्यामुळे आपण वाचलो. आणि धवल मात्र मी मी मेलो असतो तर? माझ्या संपत्तीचा काय झालं असतं? माझ्या घरच्यांचा काय झालं असतं? माझ्या मुलाबाळांचं काय झालं असतं?

असे बरेच नकारात्मक विचार तो सतत करत असतो आणि ज्या गोष्टीची भीती त्याला सतत मनामध्ये असते तेच होतं धवल आपल्या आयुष्याची शर्यत हरलेला असतो .

कारण परिस्थितीचा विचार नक्की केला पाहिजे जे झाले ते झाले परंतु याच्यामधून मी स्वतः कसा सावरू शकतो किंवा त्याच्यातून योग्य प्रकारे कसा बाहेर पडू शकतो याचा सकारात्मक विचार केला पाहिजे तरच आपण कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतो.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.