मला माझ्या नवऱ्याबरोबर रहायची मुळीच इच्छा नाहीये !!


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आजकाल बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त महिला ह्या नवऱ्याला कंटाळलेली असतात. कसाबसा संसाररूपी चाक पुढे ढकलत असतात. इतरांपुढे त्या नवऱ्याविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी सतत नकारार्थी भावनाच व्यक्त करत असतात.

आपण अशा महिलांविषयी बोलत आहोत, ज्यांची स्थिती तितकीशी गंभीर स्वरूपाची नसते. त्याहूनही गंभीर परिस्थिती यशस्वी पेललेल्या असंख्य महिला आज स्वतःचा संसार एका वेगळ्या दिशेला घेऊन गेलेल्या आहेत.

Advertisement

आपण त्या महिलांविषयी बोलत आहोत, जे स्वतःच एखादी सामान्य परिस्थिती अधिक गंभीर करून दुःखांना आमंत्रित करीत असतात. यामधल्या काही महिलांना परिस्थितीची जाणीव नसल्याने असा प्रसंग ओढवतो तर काही मात्र जाणीवपूर्वक आपली दिशा निवडून दशा करून घेतात.

आज या लेखात असेच काही मुद्दे अधोरेखित करूया. जेणेकरून हातातली परिस्थिती सुद्धा हाताबाहेर जाऊ नये. कारण सामान्य स्थितीच जेव्हा गंभीर वाटते तेव्हा हे मोठं मानसिक अपयश आहे, असंच म्हणावं लागेल.

मुद्दे पुढीलप्रमाणे…

Advertisement

१) नवरा खूप घोरतो.

स्वाभाविकतः अशा तक्रारी करणाऱ्या महिला खूप आहेत. परंतु आता तुम्हीच सांगा नवरा घोरतो तर त्यावर काही उपाय करण्यापेक्षा अत्यंत टोकाची भावना व्यक्त करणे, ताटातूट होईल असे वागणे ठेवणे हे योग्य आहे का ??

२) नवरा कामावरून खूप उशिरा येतो.

Advertisement

जर खरंच तुमच्या नवऱ्याला नोकरीच्या ठिकाणी काम असेल आणि खरंच त्याला यायला उशीर होत असेल तर अशा वेळी तुम्ही हि बाजू समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नवरा जर टाळत असेल, मुद्दामहून उशीर करत असेल तर तुमच्या दोघांमध्ये तशा पद्धतीचा संवाद व्हायला हवा.

३) नवरा मोबाईलवर सारखा बिझी असतो.

अशा वेळी संशय निर्माण करून न घेता अत्यंत विश्वासाने सत्य परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. कारण मोबाईल वरच काम असलेल्या नवऱ्यांना सुद्धा अत्यंत टोकाकडच्या संशयी स्वभावाला सामोरे जावे लागते.

Advertisement

४) नवऱ्याच्या भूतकाळात शिरू नये.

कधीतरी कुठेतरी भूतकाळातली घडलेली घटना वारंवार आठवून तुमच्या दोघांमध्ये दरी निर्माण करत असते. नेहमी हि गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ज्या ठिकाणी नवरा-बायको हे नातं येतं त्यावेळी भूतकाळातली मैत्रीण, प्रेयसी जेव्हा बोलण्यातून, वागण्यातून किंवा प्रत्यक्ष जेव्हा संपर्कात येतात तेव्हा भांडणेच होतील.

५) नवऱ्याला माझ्या माहेरच्यांची किंमत नाही.

Advertisement

बरेच नवरे असे असतात जे बायकोच्या घरातले संबंध मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी राखूनच ठेवतात. परंतु अशा वेळी बायकोची अति घाई, संयम न ठेवणे यांमुळे ते संबंध बिघडू शकतात.

६) नवरा मानसिक आणि शारीरिक सुख देत नाही.

आपल्या नवऱ्या बरोबर न राहण्याचं हे प्रमुख कारण कित्येक महिला जवळ बाळगून असतात. परंतु हि जी काही गरज आहे ती मागून, व्यक्त करून कधीच नैसर्गिक पद्धतीने मिळत नाही. दोघांकडून त्या गोष्टी येण्यासाठी वेळेचा संयम तर पाळावा लागतोच.

Advertisement

७) नवरा घरच्यांचा बाजूने जास्त बोलतो.

जवळजवळ सर्वच नवऱ्यांना हि तारेवरची कसरत करावी लागते. त्यामध्ये पुष्कळ नवरे आपल्या घरचांच्याच बाजूने उभे राहतील. कारण त्यांची एकमात्र अपेक्षा असते कि बायकोने याबद्दल मला समजून घ्यावे.

८) नवरा फार कमवत नाही.

Advertisement

सामान्य आर्थिक स्थिती असूनही नवऱ्याकडून पुष्कळ भरमसाठ गरजा पूर्ण न करता आल्यामुळे सुद्धा भांडणाला कारण मिळते. खरंतर नवऱ्याने सगळी कमाई माझ्याकडे द्यावी हि अपेक्षा अशा सर्व बायकोंची असतात.

अशी असंख्य किरकोळ कारणे आणि त्या कारणांमुळे “मला माझ्या नवऱ्यासोबत राहायची मुळीच इच्छा नाहीये” हे भलं मोठं वाक्य कित्येक महिलांकडून बाहेर पडताना दिसत आहे.

खरंतर अशा वेळी जास्त दूर जायची गरजच नाही. आपल्या आई-वडिलांनी केलेला संसार आपण सर्व लहानपणापासून पाहत आलोय. जर खरंच पाणी नाकाच्या वर जात असेल आणि त्याला कारण सुद्धा विशेष असेल तर अशा वेळी सहन करण्यापेक्षा पटकन एखादा निर्णय घेणं केव्हाही उत्तम.

Advertisement

संसाराबद्दल आपले आई-वडीलच आपले खरे मार्गदर्शक आहेत. परंतु मुलांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांना सुद्धा काही गोष्टी हाताळता येत नाहीत. त्यांनी जसे स्वतःचे प्रश्न मार्गी लावलेले असतात, तसंच आपण सुद्धा त्यांना कधीच भांडणाच्या मध्ये घेऊन त्यांच्याकडून अपेक्षा करू नये.

आणि त्यांनी सुद्धा मुलांच्या संसारात फार काळ मध्यस्थी करू नये. मुलींकडच्या सदस्यांनी सुद्धा ‘दिल्या घरी सुखी रहा’ हा जुन्या पिढीने दिलेला कानमंत्र विसरू नये.

दिल्या घरी आम्ही पण सुखी राहू. आजकाल असं पाहायला मिळत असल्याने दोघांसाठी तो एक अडथळा होऊ शकतो.

Advertisement

प्रत्येकाने आपापल्या मर्यादा ओळखण्याची हि गरज आहे. त्यामुळे हा पूर्ण लेख विशेषतः महिलांच्या बाजूने लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण महिलांना एक संसार उध्वस्त होऊन पुन्हा दुसऱ्या संसाराची सुरुवात करताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो.

पुरुषांना त्या मानाने पुष्कळ स्वातंत्र्य आहे.

म्हणून महिलांनो, तुमचा संसार अशा किरकोळ कारणांनी तुटू नये, म्हणून आजचा लेख तुम्हाला समर्पित करीत आहे.

Advertisement

लेख कसा वाटला नक्की सांगा.Online Counseling साठी !

क्लिक करा

Advertisement


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

7 Replies to “मला माझ्या नवऱ्याबरोबर रहायची मुळीच इच्छा नाहीये !!

  1. हा लेख अजिबात आवडला नाही आहो आयुष्यात तुम्ही जी कारण सांगताय ती खरच तुम्हाला वाटत आहे तेवढी योग्य नाहीत

  2. Ajun ashi kahi karn astat je ti 4 lokansamor sangu shkat nahi ki. Yamule tichya mnacha kondmara hoto. An fkt mulanchya changaly bhavishayasathi tila ticha wartaman an bhavishya srv panala lavav lagt.an bhutkal pn khup changla gelela nsto.
    Tine ky karav?

  3. Mala ha lekh awadla nahi ani karna patil pan nahit, karan ya peksha sudha vegli karna astat.

  4. Yat asha kahi goshti add nahi ahet kiva karne vegli ahet ki ekati byko sahan karte.
    baryachsha goshti ti dusrya lokana nahi sangu shakat ,pan ti navryala sodu pan shakat nahi ani sahan hi hot nahi fakt mansik ritya ti khup ekati padte. mulanchi jababdari ani loklajja ,aai -vadilanchi ijjat Jau naye he chakra tichya bhovti firat aste.

Leave a Reply

Your email address will not be published.