लैंगिक शिक्षणाअभावी वैवाहिक जोडपी गोंधळलेली आहेत !!!


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


लैंगिकता किंवा शारीरिक सुख या विषयी प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी एक कमालीची आकर्षकता असून सुद्धा त्याबद्दल शास्त्रीय माहिती अत्यंत कमी असल्याने दोघांचेही नाते दिशाहीन प्रवास करत आहे.

पुष्कळ वेळेस दोघांपैकी एकाच्या ठिकाणी तीव्र इच्छा असते तर मात्र दुसऱ्याच्या ठिकाणी ती इच्छा अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. कितीही म्हटलं कि शारीरिक सुख हे वैवाहिक जीवनात अत्यंत नगण्य बाब आहे तरीही फिसिकल बॉण्डिंग जर बिघडली तर त्याचा ताण संसारावर पडतो, हे आता सर्वमान्य आहे.

Advertisement

अशा प्रसंगी दोघांनीही एकमेकांना लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी त्याबद्दल शास्त्रीय अभ्यास करणे उचित ठरेल. दोघांपैकी केवळ एकाला हे शिक्षण असून उपयोग नाही. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार असंख्य प्रकारची गुप्तता भंग होत आहेत. आज मोबाईलच्या एका क्लिकवर पॉर्न साईट्स सर्रास पाहायला मिळते.

तसेच या सर्व साईट्सवर दाखविल्या जाणाऱ्या सर्व पोसिशन्स आपल्या जोडीदाराला जमेलच आणि जरी जमलं तरी त्यातून त्या जोडीदाराला समाधान मिळेलच याबद्दल काहीच शाश्वती नसते.

केवळ अशा साईट्सवर वारंवार जाऊन हल्लीचे जोडपी आपली लैंगिकता विकृत पद्धतीने विकसित करीत आहेत. ज्याचा फटका दोघांच्या फिसिकल आणि मेंटल बॉण्डिंगवर पडत आहे.

Advertisement

तसेच सर्व पोसिशन माहित असणे म्हणजे लैंगिक शिक्षण असणे, या भ्रमात जोडप्यांचे पाय आणखीन खोल रुतत चालले आहेत. मेंदूत अशा सर्व विकृत गोष्टी जात असल्याने आणि प्रत्यक्षात अस्तित्व उलट असल्याने मेंदूची विकृत गरज भागली जात नाहीये.

आणि ते हेच कारण आहे, दोघांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं !

लग्नाच्या सुरुवातीला पुष्कळ स्त्रिया भारतीय संस्कृतीनुसार याबद्दल फार अबोल असतात. तसेच त्या पटकन व्यक्त होताना दिसत नाहीत. याउलट त्याठिकाणी ‘तुला काही माहितीच नाही’ असा स्त्रियांवर लेबल लावून तिला पॉर्न व्हिडीओ पाहण्याची किती गरज आहे याबद्दल वातावरणनिर्मिती करण्यात येते.

Advertisement

म्हणजेच आतापर्यंत लैंगिकतेचं शास्त्र राहिलं बाजूला, तर अशा साईट्सकडे धाव घेणाऱ्यांचा टक्का फार मोठा आहे. आज पॉर्न साईट्स पाहणार्यांपैकी जवळजवळ ७० ते ८० टक्के लोकं आपल्या जोडीदाराबद्दल असमाधानी आहेत म्हणून पॉर्न साईट्स पाहून कुठेतरी समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे निदर्शनास येत आहे.

लैंगिक जीवन अस्ताव्यस्त असण्याचे काही प्रमुख मुद्दे पाहुयात….

१) पॉर्न साईट्सचा बळी असणे. दिवसातला बराचसा भाग अशा साईट्सवर घालविणे. तसेच इतर स्त्रियांबद्दल किंवा पुरुषांबद्दल मनात सतत याबद्दल विचार येत राहणे.

Advertisement

२) जोडीदाराला पॉर्न साईट्स पाहण्याची जबरदस्ती करणे किंवा असे व्हिडीओ पाहिल्याशिवाय समाधानाने कामसुख न घेता येणे.

३) दिवसातून पुष्कळ वेळा कामसुख करण्याची इच्छा होणे किंवा महिनो-महिने मुळीच इच्छा न होणे.

४) लिंग अत्यंत कमी उंचीचे आहे, याबद्दल न्यूनगंड बाळगून जोडीदाराकडे अक्षरशः दुर्लक्ष करणे. लैंगीक इच्छा मनातल्या मनात दाबत ठेवणे.

Advertisement

५) मनात सतत तेच विचार घोळत राहणे, त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही महत्वाचे काम न सुचणे.

६) लैंगिकतेबद्दल भीती बाळगणे. जर आपण समोरच्याला सुख दिले नाही तर आपलं पुढे कसं होईल, या नकारार्थी विचारांमध्ये स्वतःला अडकवून ठेवणे.

७) कल्पनांची अतिशयोक्ती करणे, दिवास्वप्न पाहणे तसेच केलेल्या अतिविचारांमुळे किंवा कल्पनांमुळे झोपेतच शीघ्रपतन घडून येणे.

Advertisement

८) हस्थमैथुनाबद्दल गैरसमज बाळगणे. तसेच जोडीदाराबरोबर कनेक्ट न होता अति प्रमाणात हस्थमैथुनाकडे कल असणे आणि प्रत्यक्षात संबंध प्रस्थापित करताना व्यवस्थित न करता येणे.

९) लैंगिकता उद्दीपनासाठी अतिप्रमाणात औषधांचा वापर करणे. एकप्रकारे औषधांची सवय लावून घेणे. तसेच समोरच्या जोडीदारालाही औषधे किंवा इंजेक्शन घेण्यास सांगणे.

१०) अवास्तव अशा अमुक तमुक पोसिशन बद्दल कमालीची उत्सुकता ठेवणे. त्या गरजा पूर्ण न झाल्यास मनस्ताप करून घेणे.

Advertisement

अशाप्रकारे लैंगिकता आपण जितकी फ्लेक्सिबल ठेऊ तितकी ती आपल्या जोडीदाराला समाधान देणारी असेल. विकृत पद्धतीचे विचार जितक्या मेंदूपर्यंत पोहोचतील आणि प्रत्यक्षात जर तसे काहीच होताना दिसले नाही तर मेंदू हा उलट रिऍक्शन नक्की देणार.

त्यामुळे जास्तीत जास्त लैंगिक शिक्षण कसे घेता येईल, याकडे आपल्या सर्वांचा कल असायला हवा.

लेख कसा वाटला नक्की सांगा.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.