Skip to content

विवाह व शरीरसंबंध यांमधील तफावत आणि सोप्पी व्याख्या !

विवाह व शरीरसंबंध यांमधील तफावत आणि सोप्पी व्याख्या !


डॉ.रमेश पोतदार
डॉ.उमा पोतदार


”असून अडचण व नसून खोळंबा ” असा काहीसा प्रकार या दोन्हींच्या परस्पर संबंधात आहे. केवळ शरीर शास्त्राच्या दृष्टीने पहिले तर शरीरसंबंधासाठी विवाहाची आवश्यकता नाही.,असे कोणालाही वाटण्याचा संभव आहे . काहींच्या मनात तर असाही विकल्प येईल कि एकादविवाह झाला कि काय एकाच जोडीदारासोबत कायम शरीरसंबंध ….. म्हणजे काय कि विविधताच नष्ट होईल …नाही का?
या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध निश्चित करू या. त्यासाठी पुढील गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. —-

१) शरीरसंबंधात लैगिक आकर्षण हि काही आयुष्यभर भासणारी व पुरणारी गोष्ट नाही.
२) तरीसुद्धा लग्नानंतरच्या सुरवातीच्या काळात शरीरसंबंधावरच लग्न यशस्वी होणे पुष्कळसे अवलंबून असते.
३) शरीरसंबंधामध्ये पुरेश्या सुखी नसणाऱ्या जोडप्यांमध्ये लग्नानंतरच्या आयुष्यात इतर अनेक तणाव निर्माण होतात .
४) शरीरसंबंधाखेरीज सहजीवन यशस्वी होण्यासाठी इतर अनेक गोष्टींची जरुरी असते.

आता या गोष्टींचा थोडा सविस्तर परिचय करून घेऊ या…

१) लैगिक भूक प्रत्येक प्राणीमात्राच्या नर व मादी यांना उपजतच असते .पण वय वाढत जाते तसे लैगिक आकर्षणामधील लैगिकता कमी होऊन ,संभोगाचे प्रमाण ,त्यातली नवथरता कमी होऊन तो एक (कधी कधी कंटाळवाणा) दैनंदिन , साप्ताहिक ,मासिक कार्यक्रम होण्याचा संभव असतो .म्हणजेच काय ..शरीरसंबंधावर अधिष्टित असूनसुद्धा,त्यामध्ये विविधता व रुची आणण्याचा प्रयत्न करूनसुद्धा केवळ लैगिक आकर्षण हाच एक विवाहसंस्थेचा पाय मानण्यात अर्थ नाही .अर्थात तरुण वयात योग्य ते महत्व लैगिक संबंधांना देणे आवश्यक आहे .

२) प्रेमोत्तर विवाह असो ,कि विवाहोत्तर प्रेम वा सहजीवन असो, शरीरसंबंध योग्यप्रकारे ,योग्य प्रमाणात व एकमेकांना पूर्णतः सुख देणारे असणे अतिशय जरुरीचे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कित्येकवेळा अगदी एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांमध्ये सुद्धा ज्याला आपण (पुस्तकी)आदर्श लैगिक संबंध म्हणू शकू असे संबंध येणे कठीण असते,कारण मने जुळली कि शरीरे जुळतीलच असें नाही .

मनुष्याला बुद्धी मिळाली असल्यामुळे वस्तुस्थितीची जाणीव करून घेणे व तिच्यावर आपल्या वागणुकीला मुरड घालून ,असेल त्या परिस्थितीला जास्तीतजास्त आनंद मिळवणे हे एकेकट्याच्या जीवनापेक्षा विवाहाद्वारे सहजीवन हे केव्हाही जास्त श्रेयस्कर केवळ त्यालाच जमू शकते . याच गुणांचा फायदा सर्व सुखी जोडपी करून घेत असतात . एकमेकांचे लैगिक गुणदोष तडजोडीने स्वीकार करून त्याला पूरक अश्या तर्हेने आपले लैगिक आयुष्य आखून घेत असतात.

यात सुद्धा प्रामुख्याने स्त्रियाच जास्त समजूतदार असतात असा जगातील सर्व शास्त्रांचा अनुभव आहे. सर्वसाधारणतः स्त्री पेक्षा पुरुष स्वतःच्या लैगिकतेबद्दल जास्त संवेदनशीलअसतो पण वस्तुतः दोघांनीही एकमेकांना न दुखावता सांभाळून घ्यायला हवे

अनेक जोडप्यांच्या विभक्त होण्याची किंवा न पटण्याची कारणे सकृतदर्शनी जरी मानसिक ,बौद्धिक किंवा सामाजिक वाटली तरी खोलात गेल्यास ती लैगिक असल्याचे आढळून येते. या दृष्टीने विचार केल्यास सुरवातीच्या आयुष्यच स्त्री किंवा पुरुष या दोघांनीही आपल्या लैगिक इच्छा-अनिच्छा च्या बाबतीत एकमेकांशी खाजगीत पण मोकळेपणाने चर्चा करून स्वतःव्हे लैगिक आयुष्य समाधानाच्या पायावर उभारण्याचा प्रयत्न करायला हवा.
शरीरसंबंधाचे महत्व ज्ञानात घेऊन सुद्धा रेम,एकमेकांच्या विचारांची सहमत होणे,एकमेकांच्या छंदांमध्ये समरस होणे ,एकमेकांची रुची,चव इत्यादीबाबत थोडेफार एकमत होणे,एकमेकांची आर्थिक अपेक्षा सारखी असणे आणि तडजोडीची तयारी दोघांचीही सारखी प्रमाणात असणे याही गोष्टी यशस्वी विवाहाला आवश्यक आहेत,याचा विसर पडता काम नये.
विवाह हे एक संस्कार आहे व शरीरसंबंध हे एक शास्त्र आहे व या दोघांचा समन्वय मनुष्याच्या आयुष्यातील सुमारे ४० वर्षाचा कालखंड संमृद्ध करू शकतो.



online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

6 thoughts on “विवाह व शरीरसंबंध यांमधील तफावत आणि सोप्पी व्याख्या !”

  1. परिपूर्ण विवेचन विवाह संस्कार व शरीर संबंध शास्त्र खूप सुंदर

  2. शुद्धलेखनाच्या खुपच चुका आहेत,
    लेख छान आहे.

  3. चांगलं लिहिलेय. लैंगिक संबंधात वैविध्य असणे पण महत्त्वाचे वाटते…तसेच त्या बाबतीत वैचारीक एकरूपता होणे पण आवश्यक आहे असे वाटते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!