Skip to content

एखादे घर सारखे आजारी पडण्याची कारणे माहितीयेत का ??

एखादे घर सारखे आजारी पडण्याची कारणे माहितीयेत का ??


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


घरातील एक व्यक्ती आजारी पडणं हि गोष्ट आपण सगळे ऐकून आहोत. परंतु घरातली प्रत्येक व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर त्यामागे अनेक प्रकारची मानसिक कारणे असण्याची दाट शक्यता असते.

म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीचे आपापसातील असणारे संबंध, एकमेकांना स्वतःचे विचार मांडण्याची स्पेस, एकमेकांना केले जाणारे साहाय्य, समजूतदारपणा, सामाजिक भान इ. अनेक कारणे अशी आहेत ज्यामुळे घराची मानसिक स्थिती सुदृढ आहे कि निकृष्ट आहे, याविषयी अनेक मते मांडता येतील.

किंबहुना एखादे घर मानसिकरीत्या आणि शारीरिकरीत्या वारंवार आजारी पडत असेल तर त्यामागे सुद्धा वरील हि कारणे कारणीभूत असतात.

काही महत्वपूर्ण कारणे पाहुयात…

१) असमजूतदारपणा.

घरातल्या कौटुंबिक रचनेत असमजूतदारपणा असल्यास त्याचा त्रास घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. यामध्ये एकमेकांना अजिबात समजून न घेणे किंवा एखाद्याच सदस्याला अति प्रमाणात समजून घेणे असे वातावरण असल्यास वादविवाद होऊन चिंता-अतिविचार सारख्या लक्षणांना व्यक्ती बळी पडते.

२) स्वतःची स्पेस न मिळणे.

जेव्हा एखाद्या घरात जबाबदार व्यक्तीला स्वतःची स्पेस मिळत नाही किंवा अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत स्पेस दिला जात नाही. एकच व्यक्ती स्वतःचा निर्णय सर्वांवर लादत असल्यास अशा घरातले वातावरण नेहमी डिप्रेसिव्ह प्रकारातलेच असणार. ताण निर्माण होऊन किंवा दडपण वाढून हायपरटेन्शनला सामोरे जावे लागते.

३) प्रचंड राग, चिडचिड आणि सतत भांडणे.

चिडचिड करणारं घर असेल आणि त्याठिकाणी सय्यम नावाची कोणतीही गोष्ट नसेल तर अशा घरी सदैव टोकाकडची भांडणे पहायला मिळतात. शिव्यागाळ करणे, एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे, घरातल्या वस्तूंची मोडतोड करणे इ थरापर्यंत राग व्यक्त केला जात असेल तर त्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम हा होणारच आहे.

४) हेवेदावे करणे.

सतत हा असाच, तो तसाच…एकाचं कौतुक करणं आणि त्याच व्यक्तीबद्दल दुसरीकडे वाईट बोलणं. हे सगळे हेवेदावे व्यक्तीचे व्यक्तिमत्व संकुचित बनवतात. इतर नातेवाईकांकडे न जाणे, २४ तास घरालाच चिटकून राहणे यामुळे मेंदूला तोचतोचपणाची सवय लागते आणि मेंदू आजारापासून लवकर बरा होण्याची शक्यता कमी होते.

५) नकारात्मक विचार.

मी हे करू शकत नाही आणि तू सुद्धा करू शकणार नाही. असे सतत नकारार्थी वाक्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरणे. यांमुळे असणारा आत्मविश्वास कमी होऊन कोणताही आजार जेव्हा जडतो तेव्हा त्यातून बाहेर न पडण्याला किंवा आजार दीर्घकाळापर्यंत टिकण्याला हेच नकारार्थी वातावरण खतपाणी देत असते.

६) भविष्याची चिंता

एखादे कुटुंब ज्यावेळी भविष्याचा अतिविचार करते, असं झालं तर-तसं झालं तर, पुढे कसं होईल आपलं, अशा अतार्किक गोष्टींमध्ये विनाकारण स्वतःला गुरफुटून ठेवते त्या घरातली लोकं सतत आजारी पडताना दिसतात. भविष्यात काय होईल हे कोणाच्याही हातात नसून त्याबद्दल विचार करून करून सध्याचा वर्तमान बाधित होत असतो.

७) जनरेशन गॅप

एखाद्या कुटुंबात पुष्कळ प्रमाणात जनरेशन गॅप असेल आणि त्यातून एकमेकांना हवी तशी स्पेस मिळत नसेल. काही पारंपारिक गोष्टी सोडाव्या लागत असतील किंवा त्या करण्यासाठीची जबरदस्ती केली जात असेल तर मनातली गोंधळाची स्थिती वाढते आणि एकमेकांविषयी राग उत्पन्न होतो.

८) गृहीत धरणे

सतत गृहीत धरणे, ती व्यक्ती अशीच आहे असा लेबल लावणे आणि त्या व्यक्तीला तशाच पद्धतीची वागणूक दिल्यास अंतर्गत वाद निर्माण होऊन डोकेदुखी सारखे गंभीर शारीरिक परिणाम निर्माण होऊ शकतात.

डोकेदुखी, थायरॉईड, ब्लड प्रेशर, शुगर, कँसर, अपचन, डिप्रेशन, चिंता, भिती, बैचेनी, अतिविचार या सर्व टोकाकडील समस्यांमागे आपल्या घरातील वरील हि कारणे असू शकतात. ती शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना केल्यास किंवा प्रशिक्षित समुपदेशकाची मदत घेतल्यास निश्चित यातून बाहेर पडण्याची दिशा आपल्याला मिळू शकते.

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!