Skip to content

नातं नुसतं सजीव असून नाही चालत, त्यात जिवंतपणा हवाच !

नाती …….


सौ. प्रिया अडके – वसगडेकर


जगात जगत असताना निनावी कोणी जगत नसतं .. …

आपण समोरील व्यक्तीसोबत त्या व्यक्तीशी आपल्या असणाऱ्या कोणत्याही भावनेला बांधून ठेवणारी भावना म्हणजे नातं मग ते नातं कोणतंही असो ..

आई वडील ,आई मुलगा ,आई- मुलगी ,वडील -मुलगा ,सासू सून ,नणंद-भावजय ,मित्र मित्र ,मित्र-मैत्रीण ,नवरा – बायको ,प्रियकर प्रेयसी ,अगदी एकमेकांचे वैरी देखील (हे ही एक नातंच आहे )ज्यात काहीतरी भाव असतात ,आनंद, द्वेष ,समाधान,मोकळेपणा,तिरस्कार कोणताही असो …

नातं …..कोणतंही असो …
3 प्रकारची असतात ….

सजीव नातं ..
निर्जीव नातं ..
जिवंत नातं ..

प्रश्न पडला असेल न ?

सजीव नातं …..

सजीव नातं हे जिवंत असेलच असं नाही ….
ज्या नात्यात रहाटचक्र आहे …

जी एकमेकांपासून तुटत नाहीत आणि जोडली पण जाऊ शकत नाहीत…
फक्त चालतात बोलतात म्हणून सजीव …
फक्त कामापुरतं बोलणं ,इतरवेळी एकमेकांना टाळणं,
इथे सवडीशास्त्र जास्त चालत….

वेळ असेल तर बोलणार ,इच्छा असेल तर उत्तर देणार ….ते नातं जपण्यासाठी आपणहुन प्रयत्न न करता जितक आपोआप जपलं(रेटत) जाईल तेवढच टिकणारे हे नाते असते …ह्यात त्या व्यक्तीबद्दल काहीच आपलेपणा नसतो ….जी नाती तोडता येत नाहीत तिथे असं सजीव पणे राहील जातं ,

निर्जीव नातं –

इथे श्वास सुरु असतात पण मनानं नातं कधीच मेलेलं असतं …
त्या नात्याबद्दल काहीच आत्मीयता ,आपुलकी ,प्रेम ,अगदी तिरस्कार सुद्धा राहिलेला नसतो …..

त्या नात्याची काहीच किंमत उरलेली नसते ….ते नातं जिवंतपणीच संपुष्टात आलेल असतं ..इथे नको असणारी आणि सोडून जाता येण्यासारखी नात्याला पूर्णविराम येतो ..

त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यात असून काहीच उपयोग नसेल ,फायदा नसेल (मतलबाने जोडलेली ),किंवा काही असलेला हेतू ,काम पूर्ण झाल असेल तर अशा नात्याचा शेवट होतो इथे ….असून नसल्यासारखे असते हे नाते
ज्यात भावनाच उरली नाही ते निर्जीव नातं ..

जिवंत नातं –

ह्या नावातच सकारात्मकता आहे …
नातं नुसतं सजीव असून नाही चालत,त्या नात्यात जिवंतपणा हवाच …
एकमेकांसाठी असलेल नातं …..

जबाबदारी ,किंवा ओझ मनामध्ये नसून प्रेमाने एकमेकांना बांधून ठेवलेल हे नातं …

निस्वार्थीपणे ,निर्मळपणाने चालतंबोलतं असलेलं ..
अशा ठिकाणी नातं खूप प्रामाणिक असतं …
सूर्यप्रकाशा सारखं पारदर्शक ….

तिथे खरं बोलतो ,जिथे आपल्या चुका कबूल करायला कमीपणा वाटत नाही ,हक्काने चिडतो ,भांडतो , काळजी घेतो ,छोट्यात छोटी मोठ्यात -मोठी कोणतीही गोष्ट सांगायला उत्सुक असतो ,

नात्यातील जिवंतपणा बघून कमीपणा ,इगो ,अटीट्युड,मत्सर ,भेदभाव इर्षा ह्या गोष्टी इथे आपोआप विरघळून जातात …..ह्या सगळ्यापेक्षा आपल्याला ते नातं जास्त महत्वाच असतं ….

जेव्हा आपण ते नातं अलगदपणे ,आपोआप स्वीकारतो तेव्हा त्या नात्यासाठी आपोआप वेळ काढला जातो ……हे नातं कधीच जुनं होत नाही ….

जितक एकमेकांसोबत सुखात ,दुःखात ,संकटात आनंदात असेल तितक ते नात्याची झळाळी वाढत जाते …नात्यातील ओढ ,प्रेम कायम वाढत राहते ….

अगदी त्रासात leave me alone म्हणणारे असतील तरी त्यांना खरतर एकटेपणाची नाही तर जिवंतनात्याची गरज असते …सोबतीची गरज असते …प्रत्येकाच्या आयुष्यात असं जिवंत नातं असेल न तर ती व्यक्ती सर्वात श्रीमंत असते ……

म्हणून एकदा मिळालेल्या आयुष्यात आपल्या माणसांना सोडू नका ,त्यांना साथ द्या ,त्यांच्यासोबत राहा ,त्यांना वेळ द्या …..

पैसे मिळवून पोट भारता येतं पण .खरं समाधान इथेच मिळतं…



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

1 thought on “नातं नुसतं सजीव असून नाही चालत, त्यात जिवंतपणा हवाच !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!