Skip to content

आज तिला तिच्यातली ‘ती’ भेटली

आज तिला तिच्यातली ती भेटली..


प्राजक्ता देशपांडे
समुपदेशक, मुंबई


बरेच दिवस झाले, तिला ती भेटलीच नव्हती. खुप दिवसांनी तीच काम लवकर उरकल आणि तिची नजर आरश्यात गेली. आणि बघते तर काय ती आज स्वतःच हसू स्वतःच बघत होती, आणि त्या हसू मागे असलेलं तिचे आसवांनी भरलेलं डोळे देखील बघत होती.

ती आज खुप रडली, कारण मागच्या काही दिवसात तिला होणारा त्रास, दुःख, साह्य भावनांनी भरलेलं डोळे तिच्याशी मोकळेपणाने बोलत होते.

साधारण एखाद वर्ष झाल असेल तिच्या लग्नाला. बहुतेक तिने स्वतः ला तिच्या कुटुंबासाठी वाहून दिलं असेल, किंवा मग अस म्हणता येईल की ती त्यांच्यात एखाद्या साखरेप्रमाने मिसळून गेली असणार, म्हणून ती स्वतःला विसरले असणार येवढं नक्की..

पण गेल्या काही दिवसात तिला खुप मनाला लागेल अश्या गोष्टी घडत होत्या किंवा मग बोलल्या जात होत्या. त्यामुळे ती अस्वस्थ होती,शांत,अबोल झाली होती.

पण ती कुणाला सांगू शकत नव्हती. समजून घेणारी अनेक व्यक्ती होत्या तिच्या आजूबाजुला पण का,कुणास ठाऊक ती का सांगत नव्हती. बहुतेक तिच्यात एक न्यूनगंड निर्माण झाला होता, स्वतः बद्दलचा.

आता हा न्यूनगंड कसला होता याच्या आम्ही शोधात निघालो, मग आम्हाला असे लक्षात आल की, तिने गेल्या काही दिवसात तिचे स्वतःचे असे निर्णयच घेतले नव्हते, समोरच्याचे मन राखण्यासाठी, मन जपण्यासाठी ती शांतपणे जे काही होत आहे त्याला फक्त हो म्हणत होती.

तिला तीच्यातले कमतरता दाखवण्याचं बहुदा सतत प्रयत्न केला जात होता. बहुतेक तिच्या मतांची किंमत कमी झाली होती, तिला गृहीत धरल होत वाटत सगळ्यांनी.

तिला अजून असे किती त्रास होत असतील माहित नाही.सगळ्यांचा मी पणा जपण्यात ती स्वतःचा मी पण विसरले होती.. पण आज ती स्वतः ला आरश्यात बघून सुखावली होती.

कारण आज ती खुप दिवसांनी स्वतःशी बोलली होती. आणि तिने त्याक्षणी ठरवलं होत, की आता सगळ्यांचा आवडीचा विचार करत असताना स्वतःचा तितकाच विचार करायचा..

आनंदी जीवन जगत असताना स्वतः सोबत सगळ्यांच्या मनाचा विचार करणे गरजेचे आहे, आयुष्यात चांगल्या-वाईट गोष्टी येतात. त्यांचा शांतपणे विचार करून त्यावर मात करता येते.

त्यातून जीवन जगण्याचा मार्ग सापडतो. म्हणजेच आनंदी जीवन जगण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे.

आणि तिने तो प्रयत्न पुढे कटाक्षाने पाळला….

अशाच एका महिलेला समुपदेशन करताना मला आलेलं अनुभव अर्थात तिच्याच संमतीने..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!