Skip to content

भूतकाळात घडलेल्या घटना आपला पिच्छा का सोडत नाहीत??

भूतकाळात घडलेल्या घटना आपला पिच्छा का नाही सोडत ??


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


अनेक वर्षांपासून अमितच्या मनातून तो प्रसंग काही जात नाहीये. बॉसने त्याचा कसा अपमान केला होता, इतर सहकारी वर्ग कसे फिदी-फिदी हसले होते, तसेच ऑफिसमधलीच त्याची आवडती मैत्रीण त्या प्रसंगापासून कशी दुरावत गेली. हे सर्व आठवून अमित अजूनही स्वतःला त्रास करून घेतोय. त्यानंतर त्याने जॉब सुद्धा चेंज केला. परंतु सध्याचा बॉस त्याचा चांगला असूनही भूतकाळातला बॉस त्याला वर्तमानात जगू देत नाहीये…

अपर्णाच्या लग्नाला परवाच ५ वर्षे पूर्ण झालीये. आधी सासू विनाकारण छळ करतेय अशी अपर्णाची पतीकडे सारखी तक्रार असे. एकदा तर राग अनावर होऊन अपर्णा थेट सासूवर धावून गेली होती. त्यानंतर सासूबाईनी स्वतःत पुष्कळ बदलही केले. परंतु जुने काही दिवस आठवले कि अपर्णाला सासूशी सामान्य वागता येत नाहीये…

अजित हा आपल्या बायकोचा खूपच तिरस्कार करतोय. याला कारण त्याच्या बायकोच्या घरातून त्याला मिळालेली अपमानास्पद वागणूक. एखादा बायकोचा कुठलाही मुद्दा खटकला कि अजित तोच प्रसंग रेटून बायकोशी सारखा भांडत बसतो.

अनिता वडिलांना अक्षरशः शिव्या देतेय. तसे कारणही आहेच. ते म्हणजे वडिलांनी या वयात केलेले दुसरं लग्न. परंतु त्या प्रसंगाला खूप वर्षही लोटलेत. तिचे वडीलही आता सोबत राहत नाहीत. पण सगळ्या पुरुषांबद्दल तिच्या मनात तिटकारा निर्माण झालाय. वय वर्ष ३५ ओलांडूनही तिला लग्न करण्याची मुळीच इच्छा होत नाहीये…

सुनीताचे शेजाऱ्यांशी अत्यंत टोकाकडचे भांडण झाले होते. तेव्हापासून सुनीता फारशी घराबाहेर पडत नाही. तसेच इतर संबंधितांनी सुद्धा शेजाऱ्यांशी बोलू नये. हि अवास्तव अपेक्षा ती सगळ्यांकडून ठेवत आहे. जो कोणी शेजाऱ्यांशी बोलेल त्यांच्याशी सुद्धा ती नाते तोडत चाललीये…

हे आणि यापेक्षा सुद्धा असंख्य प्रसंग आपल्या भूतकाळात घडून गेलेले असतात. परंतु त्यातले काही प्रसंग आपला पिच्छा का नाही सोडत. ते का सारखे-सारखे आपल्या समोर येत असतात.

अशा सर्व प्रसंगांशी डील कसं करायचं ??

कितीही ठरवलं तरी तोच प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल तर याचा अर्थ त्या प्रसंगाने तुमच्या खोल मनात जागा केलेली आहे. म्हणून त्या प्रसंगांची तीव्रता कमी होण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ लागेल.

एखादा प्रसंग हा खोल मनात तेव्हाच शिरतो जेव्हा त्याच त्याच प्रसंगाबद्दल तोच तोच विचार केला जातो. म्हणून मनाला सुद्धा ब्रेक देता आला पाहिजे. ब्रेक दिल्याने विचारांची साखळी तुटते आणि मन दुसऱ्या ठिकाणी गुंतण्याची शक्यता वाढते.

तोच प्रसंग वारंवार समोर येत असल्यास अशा वेळी त्या प्रसंगाकडे पाहण्याचा अँगलच बदलता यायला हवा. म्हणजेच तो प्रसंग काही पर्मनंट नाही. यानंतर समाधान देणारे सुद्धा अनेक प्रसंग घडणार आहेत. असं काहीसं सांत्वन करून मार्गक्रमण करणे केव्हाही उत्तम.

भूतकाळातील प्रसंग पुन्हा-पुन्हा येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्याकडे असलेला रिकामा वेळ. हा रिकामा मेंदूच जुने प्रसंग ओरबाडण्याचं काम करत असतो. म्हणून आपल्या मेंदूला एका सिस्टिमॅटिक डेली रुटीनमध्ये व्यस्त ठेवल्यास भूतकाळ अगदी ठिपका वाटायला लागेल.

जुने प्रसंग न आठवून सुद्धा वर्तमानात ते सारखे घडत असतात. यामागे एक कारण असंही असावं कि तुमचं मन अजूनही जुन्या प्रसंगात घुटमळतंय आणि तेच घुटमळलेलं मन तुम्हाला त्याच त्याच प्रसंगाकडे आकर्षित करणार. म्हणजेच तुम्ही स्वतःहून तुमच्या नकळत त्या प्रसंगांच्या दाराशी जाऊन उभे राहता.

जुन्या प्रसंगांचं एक असंही सायन्स आहे कि त्या कधीच मनातून काढून टाकता येत नाहीत. त्या कायमस्वरूपी मनात राहू शकतात. फक्त त्या प्रसंगाबद्दल असणारी भावना रूपांतरित होत असते. म्हणजे ५ वर्षाआधी अपमानाबद्दल तीव्र राग आणि ५ वर्षानंतर मिश्किल कॉमेडी.

भविष्याचा वेध घेणाऱ्या व्यक्ती जुन्या प्रसंगात फार काळ अडकत नसतात. ते नवनवीन प्रसंग पटकन जुने कसे होतील, याकडेच लक्ष देऊन असतात.

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

2 thoughts on “भूतकाळात घडलेल्या घटना आपला पिच्छा का सोडत नाहीत??”

  1. राजेंद्र शिंदे

    खूप छान लेख आह वाचल्यावर खूप बर वाटलं

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!