एकाच्या संशयी स्वभावामुळे वैवाहिक जीवन उध्वस्त होत आहेत !!!


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


व्यक्तीमत्वात संशय असणे ही एक स्वाभाविक अशी प्रक्रिया आहे. संशय नाही अशी कोणतीही व्यक्ती या पृथ्वीतलावर उपस्थित नाही.

केवळ तो संशय व्यक्त करण्याची पद्धत ही काहींची सामान्य तर काहींची अति तीव्र असू शकते. म्हणजेच मनात संशय बाळगून त्या संशयावर व्यवस्थापन करण्याचे काम जर व्यक्तीला जमत असेन तर ते सामान्य, पण तोच संशय जर रौद्र स्वरूप धारण करून त्याचा स्वतःला व इतरांना त्रास होत असेल तर मात्र आता त्या संशयावर त्या व्यक्तीचे नियंत्रण राहिलेले नाही.

Advertisement

अशा परिस्थितीत व्यक्ती तिची संशयवृत्ती स्वीकारुच शकत नाही, ज्यामुळे तिचे दैनंदिन जीवन उध्वस्त होण्याकडे वाटचाल करते. आजकालची परिस्थिती पाहता व्यक्तीची संशय घेण्याची वृत्ती ही हळूहळू वाढते आहे, मग त्याचा त्रास व्यक्तीला वैवाहिक व कौटुंबिक जीवनात तर होतोच पण तिच्या कामाच्या ठिकाणी ही व्यक्तीला जुळवून घेणे अवघड होते. जेव्हा अशा लक्षणांनी व्यक्ती कंटाळलेली असते तेव्हा तिचे निदान या मानसिक आजाराने होते.

केस :

भूषण वय ३० वर्ष, एक विवाहित मुलगा, ८ महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. अत्यंत चपळ व भावनिक विचार करून निर्णय घेणारा अशी त्याची ओळख सर्व मित्रमंडळी व नातेमंडळीत आहे.

Advertisement

विवाह अगोदरपासूनच भूषणला नवीन परिस्थितीत जुळवून घेणे कधीच जमले नाही, तसेच आहे त्या जुन्या परिस्थितीतही भूषणचे नेहमीच कुणाशीतरी खटके उडत असत. इतर आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार करतात, वाईट बोलतात, मुद्दाम आपल्याला त्रास देण्याचे कारस्थान रचतात, आपल्याबद्दल चुगली करतात इ. प्रकार भूषणचे लग्ना अगोदर थोडेसे कमी होते, परंतु तरीही त्याचा तितकाच त्रास भूषणला होत होता, परंतु लग्नानंतरच्या ८ महिन्यातच भूषणची संशय घेण्याची मात्रा ही दुपटीने वाढली आहे.

आजकाल भूषण आपल्या बायकोवर विनाकारण चिडायला लागलाय, नको नको ते बोलायला लागलाय, एकंदरीत तिच्यावर संशय घ्यायला लागलाय. आपला नवरा काहीही कारण नसताना आपल्याला विशिष्ट व्यक्तीचे नाव घेऊन हिणवतोय, आपल्या चारित्र्यावर संशय घेतोय ही भावना भूषणच्या बायकोला खात होती.

भूषणच्या अशा सततच्या वागण्यामुळे त्या दोघांचेही वैवाहिक जीवन पार उध्वस्त झाले होते, आणि ते इतके उध्वस्त झाले होते की घटस्फोटापर्यंत येऊन टेकले होते. इतक्या ८ महिन्यातच घटस्फोटापर्यंत निर्णय जावा, अश्या या भूषणच्या मानसिक आजाराची कल्पना लग्न लावण्या अगोदर त्याच्या आई-वडिलांना नव्हती का ? आता तरी भूषणची मानसिक अवस्था समजून घेऊन त्याला त्या पद्धतीने उपचारासाठी प्रोत्साहीत केले जाईल का ? भूषण स्वतः आपल्याला मानसिक आजार झाला आहे हे स्वीकारेल का ? कोण जाणे !

Advertisement

लक्षणे :

१) अशा व्यक्तींचे मुख्य लक्षण म्हणजे कोणताही आधार नसताना इतरांवर सारखा संशय घेणे, तसेच अविश्वास दाखविणे.

२) इतर लोक आपल्याला चिडवण्यासाठी, त्रास देण्यासाठी मुद्दाम असे वागतात, अशी त्यांची समजूत असते.

Advertisement

३) अशा व्यक्तींच्या संशयी स्वभावामुळे ते फारसे मित्र बनवू शकत नाहीत, तसेच जवळचे नातेसंबंधही तणावपूर्ण असतात.

४) कोणावरच विश्वास नसल्यामुळे ते कोणाशीच मनमोकळे पणाने बोलू शकत नाहीत, आपण एखाद्याला काही सांगितले तर ती माहीती आपल्या विरुद्ध वापरली जाईल अशी त्यांना भीती असते.

५) अशा व्यक्तींना सर्वात मोठी समस्या ही ऑफिसमध्ये जाणवते, कारण सहकार्यांना पूर्णपणे टाळणे शक्य नसल्याने याठिकाणी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

Advertisement

कारणे :

१) लहानपणापासून आई-वडिलांचे प्रेम कमी मिळाल्यामुळे तसेच इतर भावंडांना जास्त मिळत असल्याची तक्रार मनात ठेवून मोठे झालेल्या व्यक्तींना हा आजार पटकन जडतो.

२) तसेच आई-वडिलांचे अती प्रेम मिळाल्यामुळे किंवा सतत अती सुरक्षित वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हा आजार उद्भवू शकतो.

Advertisement

३) एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा आजार जाण्याची शक्यता ही जास्त असते.

४) निर्माण होणारी प्रत्येक इच्छा ही दाबल्यामुळे किंवा पूर्ण न झाल्यामुळे नवीन इच्छांवर किंवा भावनांवर ते संशय व्यक्त करतात.

उपचार :

Advertisement

१) प्रथमतः या आजाराची मूळ कारणे समजून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.

२) अबोध मनातील दबलेला कचरा साफ करण्यासाठी मनोविश्लेषण हे तंत्र उपयुक्त ठरू शकते.

३) REBT व CBT या उपचार तंत्राचा वापर करून अस्तित्वाची जाणीव करून देण्यास मदत केली जाते.

Advertisement

४) मन नियंत्रणात आणण्यासाठी Meditation चाही फार मोठा फायदा होतो.

५) तसेच Personal Counseling, Marriage Counseling आणि Stress Relief Technique ही उपयुक्त ठरू शकतात.

लेख कसा वाटला नक्की सांगा.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Advertisement

One Reply to “एकाच्या संशयी स्वभावामुळे वैवाहिक जीवन उध्वस्त होत आहेत !!!”

Leave a Reply

Your email address will not be published.