मल्टिटास्किंग आणि जीवनशैली
मेराज बागवान
आजच्या युगात, ‘मल्टिटास्किंग’ हा शब्द खूप प्रचलित आहे. कॉर्पोरेट जगात, तर ह्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. मग हे ‘ मल्टिटास्किंग’ नक्की आहे तरी काय?
खरे तर ह्या कॉर्पोरेट जगाच्या आधीपासूनच आपल्या रोजच्या जीवनात आपण सगळे हे स्किल वापरत च आहोत.म्हणजे काय? तर आपण एका वेळी अनेक कामे करतो, अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो. यालाच ह्या कॉर्पोरेट क्षेत्राने गोंडस असे नाव दिले आहे आणि ते म्हणजे ‘मल्टिटास्किंग’.
आपल्या कडे तर स्त्रीया ह्या मल्टिटास्किंग मध्ये खूप परफेक्ट आहेत.एकीकडे घर, मूल, संसार, नातेवाईक, आणि दुसरीकडे नोकरी, व्यवसाय, प्रोजेक्टस, सेमिनार अश्या विविध जबाबदाऱ्या त्या चोख रित्या पार पाडत आहेत.फक्त स्त्रिया च नाही तर पुरुष देखील असेच मल्टिटास्किंग काम करीत आहेत, जसे की घरातील खरेदी, बँकेची कामे, नोकरी,व्यवसाय, मुलांना शाळेत सोडणे इत्यादी.
कॉर्पोरेट क्षेत्रात तर आता प्रत्येक उमेदवाराकडून असेच बहुआयामी व्यक्तिमत्त्व अपेक्षिले जाते आणि प्रत्येकाचा रोल देखील कार्यालयात अगदी तसाच असतो.
असे हे मल्टिटास्किंग मात्र आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडविते.खूप वेळा, आपण या कडे एक ‘डोकेदुखी’ ,’ओढाताण’ म्हणून पाहतो.पण ह्या सगळ्यातून आपले व्यक्तिमत्व एक वेगळ्याच प्रकारे झळकत असते.
१) मल्टिटास्किंग मुळे आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करू लागतो.वैचारिक पातळी वाढते.
२) प्रत्येक क्षेत्रामधील ज्ञान मिळू लागते.मग कोणतीही परिस्थिती आली तरी देखील मग काही अडत नाही.
३)आत्मविश्वास वाढीस लागतो.कमी वेळात अनेक कामे मार्गी लावू शकतो.
४) सर्वांगीण विकास होण्यात हे मल्टिटास्किंग फार उपयोगी आणि फायदेशीर ठरते.
५) मल्टिटास्किंग मुळे काम कंटाळवाणे वाटत नाही.
६) व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास हे मल्टिटास्किंग खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
पण काही वेळेस मल्टिटास्किंग मुळे मानसिक गुंता, निर्णय घेण्यात अडचणी येणे अशा देखील समस्या उद्भवतात.पण , प्राधान्यक्रम देऊन हे मल्टिटास्किंग चे स्किल वापरले तर मात्र काहीच अडचण येत नाही.
फक्त सारासार विचार करण्याची वृत्ती, थोडा समजूतदारपणा अंगी बाणला तर हे मल्टिटास्किंग यशाच्या अनेक पायऱ्या चढण्यासाठी आपली मदत च करीत असते.



Good…