झोप का लागत नाही किंवा कधीतरी खूपच झोप का लागते ???


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


सर्वसामान्यपणे झोपेची अवस्था म्हणजे मनोशारीरिक पातळीवर शांततेची, विना घडामोडींची अवस्था, अशी आपली समजूत असते. त्याचप्रमाणे झोप म्हणजे एकच एक सलग अशी अवस्था आहे, अशीही अनेकांची कल्पना असते. परंतु झोपेत असलेल्या व्यक्तीच्या मेंदुतील EEG रेकॉर्ड वरून असे स्पष्ट होते की, झोपेत सुद्धा मेंदु क्रियाशील असतो. तसेच स्नायु व डोळ्यांच्या हालचालीही होत असतात.

झोप न लागने

Advertisement

निद्रानाश किंवा निद्राविकार हा Sleep Disorder चाच एक मुख्य प्रकार आहे. अशा व्यक्तीला झोपेबाबत विविध समस्या असु शकतात. काहींना सुरुवातीलाच झोप लागायला खुप वेळ लागतो. एकदा झोप लागली की मग ब-यापैकी सलग झोप लागते. काहींना त्या मानाने लगेच झोप लागते, पण अधेमधे सारखी जाग येणं, किंवा पहाटे लवकर जाग येऊन मग पुन्हा झोप न येणं असे प्रकार अनुभवास येतात, तसेच म्हणावी एवढी गाढ झोप न लागणं. डिप्रेशन, काही मानसिक आजार किंवा मेंदुला इजा झालेल्या व्यक्ती फार गाढ झोप घेऊ शकत नाही. त्यामुळे कितीही वेळ झोपले तरी त्यांना सकाळी फ्रेश वाटत नाही.

अति झोपने

निद्रानाश यामध्ये व्यक्तीस झोप न लागने यासंबंधी समस्या असतात, तर याउलट याच्या अगदी विरुद्ध लक्षणे ही अति झोपने या विकृतीमध्ये आढळतात. यामध्ये त्रस्त व्यक्तीस रात्रीची तर भरपूर झोप लागतेच, परंतु दिवसासुद्धा अधूनमधून सारखी झोप येते, डुलकी लागते. तसेच रात्री भरपूर आणि व्यवस्थित झोप होऊनही दिवसा काम करताना, कुणाशी बोलताना किंवा अगदी जेवताना सुद्धा झोप येते. दिवसातुन अठरा तास झोपुनही व्यक्तीला फारसे फ्रेश वाटत नाही.

Advertisement

केस १

आजकाल अंकीताला रात्र नकोशी वाटते. जशी संद्याकाळ जवळ येते तशी हिला धडकी भरायला सुरुवात होते. संपूर्ण रात्र कुस बदलत असते. थोडीशी झोप लागली की लगेच जागी होते. नेमके कोणते विचार छळतात हे सुद्धा ती कुणालाही सांगत नाही. अंकीताचे हे असे रोज घडत आहे. तिलाही कळून चुकलंय की ती कोणत्यातरी आजाराकडे वाटचाल करत आहे.

केस २

Advertisement

त्यादिवशी प्रमोद त्याच्या मित्रांना कल्याण स्टेशनवर अक्षरशः डुलकी अवस्थेत सापडला. इतक्या रहदारीत आणि इतक्या गोंगाटात प्रमोद निश्चिंत कसा झोपलाय याचे त्याच्या मित्रांना नवल वाटले. आजकाल प्रमोद पाहिजे तेथे डुलक्या मारायला लागलाय. कोणतरी आपल्याला पाहतंय याचे सुद्धा भान त्याला राहीलेले नाही. रात्री व्यवस्थित झोप मिळूनही त्याला फ्रेश वाटत नव्हते. याच कारणाने प्रमोदला ८ वेळा नोकरीतुन काढून टाकण्यात आले होते.

लक्षणे

१) या दोन्हीही विकृत्या झोपेशी संबंधित असल्याने त्यातील पहिल्या व्यक्तीस रात्र होऊच नये असे वाटते, तर दुसऱ्या व्यक्तीस रात्र होण्यासंबंधी अतिउत्सुकता आढळते.

Advertisement

२) झोप न झाल्यामुळे पहिल्या व्यक्तीस फ्रेश वाटत नाही, तर अति झोपल्यामुळे या व्यक्तीस ही फ्रेश वाटत नाही.

३) पहिल्या व्यक्ती घराबाहेर पडण्यास तयार होवू शकतात, मात्र दुसऱ्या व्यक्तीसाठी तारेवरची कसरत करावी लागते.

४) पहिल्या व्यक्ती झोपेच्या आणि भुकेच्या गोळ्यांचे शिकार बनतात, तर वेळेवर झोपेतुन जाग येण्यासाठी दुसऱ्या व्यक्ती नाना त-हेचे प्रयत्न करताना दिसतात.

Advertisement

५) या दोहोंचेही डोळे सदैव लाल असलेले दिसतात, एकाचे झोप न झाल्यामुळे आणि दुसऱ्याचे अति झोपल्यामुळे.

कारणे

१) या दोन्हीही विकृत्यांची कारणे मानसिक आजार/आघात आणि मेंदुतील रसायनांमध्ये दोष असु शकतात.
२) अनुवंशिकतेमार्फत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत ही विकृती येऊ शकते.

Advertisement

३) औषधांचे केलेले अतिसेवन हे या विकृतीचे एक विशेष कारण आहे.
४) इतर परिस्थितीय कारणे (कामचा ताण, उध्वस्त लैंगिक जीवन, अपूर्ण ध्येयपूर्ती ई.)

उपचार

१) प्रथमतः या आजाराची संपूर्ण माहिती व्यक्ती आणि कुटुंबाला देणे.
२) केस स्टडीमार्फत आजाराचे मुळ कारण शोधून उपचाराची योग्य दिशा ठरविणे.

Advertisement

३) CBT या सायकोथेरेपीचा उपयोग या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो
४) Meditation चाही चांगला परिणाम होवु शकतो.
५) Music आणि Dance (ग्रुप थेरेपी) या थेरेपीचा ही परिणामकारक फायदा होवु शकतो.

लेख कसा वाटला नक्की सांगा.


Advertisement

Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Leave a Reply

Your email address will not be published.