सतत टेन्शन घेणाऱ्या एका व्यक्तीमुळे अक्ख घर उध्वस्त होतंय !!


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


घरात जर एक व्यक्ती सतत अतिप्रमाणात टेन्शन घेतही असेल आणि टेन्शन देतही असेल तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो.

आणखीन चांगल्या पद्धतीने हि केमिस्ट्री समजून घेऊया..

Advertisement

एक प्रयोग घेऊया….

आपल्या सर्वांच्या घरात एक मोठा स्विच बोर्ड आहे. ज्या बोर्डमध्ये ट्यूब लाईट, फॅन आणि इतर विद्युत उपकरणे सुरु होतील अशी बटणे आहेत. जर तुम्ही ट्यूब लाईट चे बटन दाबले तर ट्यूब लाईट सुरु होईल, फॅनचे दाबले तर फॅन. चार्जर कनेक्ट केला कि चार्जर, टीव्ही असेल तर टीव्ही. म्हणजेच सगळ्या ठिकाणी व्यवस्थित ती एनर्जी जाईल.

समजा, तुमच्या घरी एक अशी रूम आहे, जी एक वर्षांपासून बंद आहे. बाहेरून लॉक केलेली आहे. तुम्ही १ वर्षांपासून खोलीच्या आत गेलेला नाही आहात. पण तुम्हाला माहित नाही कि गेल्या १ वर्षांपासून त्या खोलीतला फॅन आणि ट्यूब लाईट सुरूच आहे.

Advertisement

म्हणजेच ती एनर्जी वाया गेली. ती एनर्जी वाया गेल्यामुळे त्याचा तुमच्या मूलभूत गोष्टींवर परिणाम होणार.

म्हणजेच,

१) लाईट बिल जास्त येणार.

Advertisement

२) बाहेरचा फॅन आणि ट्यूबलाईट डीम होणार.

३) विद्युत उपकरणे बिघडणार.

याहीपेक्षा सर्वात मोठं नुकसान म्हणजे १ वर्षांपासून फॅन आणि ट्यूब लाईट सुरु राहिल्यामुळे शॉर्ट सर्किट होणार, त्या खोलीला आग लागणार. फक्त त्याच खोलीला आग लागेल का, तर अक्ख्या घराला आग लागणार, फक्त तुमचंच घरच जळेल का, तर तुमच्या घराला जी-जी कनेक्टेड घरं आहेत त्यांना सुद्धा आग लागणार.

Advertisement

म्हणजे इलेकट्रीसिटीचं सायन्स काय सांगतंय कि जर एनर्जी वाया गेली तर आपल्या बेसिक गोष्टींवर त्याचा वाईट परिणाम हा होतोच. लहानपणी किंवा आजही जेव्हा लोडशेडिंग होते, तेव्हा दुसऱ्या कुठल्यातरी गावाकडे किंवा शहराकडे एनर्जी वाया गेलेली असते, म्हणून त्याचा परिणाम आपल्या गावावर होतो.

तसेच जेव्हा एखाद्या शहराची पाईप लाईन फुटते तेव्हा ४-५ दिवस आपल्याही गावात पाणी येत नाही.

म्हणजेच कुठेतरी काहीतरी वाया गेलं तर त्याचा परिणाम अवतीभवती असणाऱ्या घटकांवर हा होतोच.

Advertisement

आता आपण मुद्द्याकडे येऊया….

सतत टेन्शन, अतिविचार, चिंता करून आपण सुद्धा आपली कित्येक मानसिक ऊर्जा हि वाया घालवत असतो. ज्याचा आपल्या मूलभूत गोष्टींवर परिणाम होतो. जसं कि, आपली एकाग्रता, सय्यमीपणा, समजून घेण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इ. गोष्टींवर जेव्हा परिणाम होतो, तेव्हा गॅरेंटेड आपली मानसिक ऊर्जा हि काही मिनिटांपूर्वी, दिवसांपूर्वी अतिविचार, टेन्शन, चिंता अशा ठिकाणी वाया गेलेली आहे.

आणि ती ऊर्जा जर सतत वाया जात असेल तर वरीलप्रमाणे त्याचा आपल्या बेसिक गोष्टींवर परिणाम तर होणारच, पण आपल्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा त्रास सहन करावा लागणार.

Advertisement

जसं कि आपण आधीच बघितलं कि जळताना तुमचं फक्त एकट्याचंच घर नाही जळणार तर तुमच्या घराला जी-जी कनेक्टेड घरं आहेत, त्यांना सुद्धा आग लागणार……

म्हणून एनर्जीचं हे सायन्स समजून घ्या आणि हे सुद्धा समजून घ्या सर्व सामान्यपणे ती एनर्जी थोडी फार कुठेतरी वाया जाणारच आहे. फक्त अतिप्रमाणात वाया गेली तर ती तुमच्यावर आणि तुमच्या आप्तस्वकीयांवरच उलटणार…

हे मात्र नक्की.

Advertisement

लेख कसा वाटला नक्की सांगा.Online Counseling साठी !

क्लिक करा

Advertisement


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Leave a Reply

Your email address will not be published.