Skip to content

पुष्कळ वेळा ठरवलेल्या गोष्टी हातून घडत का नाहीत ??

पुष्कळ वेळा ठरवलेल्या गोष्टी हातून घडत का नाहीत ??


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


अनेक व्यक्ती या अनेक प्रकारच्या इच्छा, आशा, आकांशा बाळगून रोजचा दिवस नव्याने कसा घालवता येईल, यासाठी धडपड करताना दिसतात. बहुतांश गोष्टी या पूर्ण होतातही, परंतु जितक्या ठरवलेल्या गोष्टी शेवटी पूर्ण न करता आल्याने निराशा दाटून येते.

आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या राहिलेल्या अपूर्ण गोष्टींचा नव्याने करण्याच्या गोष्टींवर परिणाम होत जातो. आणि हा भार हळूहळू दिवसेंदिवस वाढत जातो. मग सगळ्या सोप्या गोष्टींना एक अवघडपणा यायला लागतो.

अशा गोष्टींचं मॅनेजमेंट कसं करायचं ??

१) फ्लेक्सिबिलिटी

सर्वप्रथम एक गोष्ट पक्की मनात ठेवा जितक्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतील तितक्या घडायलाच हव्यात याबद्दल अट्टाहास नको. आपण जितकं यावर ठाम राहू, तितक्या इतर गोष्टींपासून वंचित राहू. कितीही काहीही केलं तरी एखादी गोष्ट उद्यासाठी पेंडिंग राहणारच आहे, हे आधीच मनाला सांगून ठेवा.

२) कौटुंबिक हातभार

अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागत असल्याने किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता आल्याने काही ठरवलेल्या गोष्टी आपल्याकडून राहून जातात. पण यामध्येही तुम्हाला नेमकं कोणाला पसंती द्यायची आहे, हे ठरवण्याची आवश्यकता आहे.

३) योग्य पसंती क्रम

दिवसभरात तुम्हाला १० गोष्टी करायच्या असतील तर त्यांना योग्य पसंती क्रमाच्या यादीत टाकायला हवं. त्यांचं महत्व, गरज ओळखून तुम्ही त्यांना पसंती क्रम देऊ शकता आणि कमी महत्वाच्या गोष्टी उद्या-परवा जरी झाल्या तरी चालतील, अशांना तुम्ही शेवटचं स्थान देऊ शकता.

४) ओढावून घेतलेली कामे

दिवसभरात अनेक कामे आपण ओढवून घेतलेली असतात. म्हणजे सध्या किराणा मालाच्या आणाव्या लागणाऱ्या गोष्टी मीच व्यवस्थित आणू शकतो म्हणून त्याठिकाणी आपली ऊर्जा सुद्धा जाते आणि वेळ सुद्धा जातो. घरातील त्या-त्या व्यक्तींना ती-ती कामे करून देण्याचं स्वतंत्र द्यायला हवं.

५) आळस आणि कंटाळा

पुष्कळ करावयाच्या कामांचा भार मनात साचल्यामुळे त्या करण्यासाठीची बरीच ऊर्जा हि अतिविचारात वाया जाते. म्हणून शरीरात आणि मनात एक स्थूलपणा दाटून येतो. प्रथमतः हा आळस आणि कंटाळा कसा मॅनेज करता येईल याला प्राधान्य द्यायला हवं. सर्वांना आळस असतो, पण तो आळस अपेक्षेपेक्षा वाढीव असल्यास तो मॅनेजच व्हायला हवा.

६) अवास्तव अपेक्षा

तुमची व्यक्तिगत संबंधित सर्व ठरलेली कामे करण्याची जबाबदारी हि केवळ तुमचीच. जर एखाद्याला तुम्ही ते करायला देत असाल आणि अनायसे ते पूर्ण करणं शक्य न झाल्यास तर त्याबद्दल नम्र राहून प्रतिसाद देणं हे तुमचं कर्तव्यच आहे. कारण तुम्ही तुमची व्यक्तिगत कामे त्या व्यक्तीला करायला दिलेली असतात. म्हणून शक्यतो अशी सगळी कामे स्वतःकडून कशी पूर्ण होतील याबद्दल नियोजन करणं आवश्यक.

याव्यतिरिक्त सुद्धा असे बरेचसे मुद्दे सांगता येतील, ज्या मार्फत आपल्या रोजच्या कामांचं सुव्यवस्थापन करून एक उत्तम निरोगी आयुष्याकडे आपण कूच करू शकतो. फक्त फ्लेक्सिबिलिटी सोबत ठेवायला हवी. जर ते काम आज नाही झालं तर उद्या नक्की होईल, पण परवा-तेरवा पाहू इतका आळस त्या फ्लेक्सिबिलिटी मध्ये यायला नको.

हा लेख वाचून जर नक्की काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर खाली कमेंट करून जरूर कळवा.

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

4 thoughts on “पुष्कळ वेळा ठरवलेल्या गोष्टी हातून घडत का नाहीत ??”

  1. Rajendra Yashwant Bhosale

    लेख खूपच आवडला, नक्की उपयोगी पडेल.

  2. GORAKSHA HARI SUKATE

    जेंव्हा पासुन हा ग्रुप join केला आहे तेंव्हा पासुन एक ऊर्जा संक्रमित झाली आहे. स्वतःला खूश ठेवण्यासाठी चा अनमोल खजिना आहे हा.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!