स्वतः चा आदर करा……
सोनल कोल्हे- पटारे
आई वडिलांनी आपल्याला जे सुंदर आयुष्य दिलं आहे… देवाच्या कृपेने जे सुंदर जीवन आपण जगत आहोत त्याचा आदर करणे खूपच गरजेचं आहे….
इथे ना कोणी श्रेष्ठ ना कोणी कनिष्ठ…जस प्रत्येक झाडाचं फुल वेगळं … प्रत्येक पक्षी वेगळा… प्रत्येक आपल्या गुणांनी परिपूर्ण…आणि सुंदर आहे तसाच आपल्या मधील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आणि स्वतःच्या गुणांनी परिपूर्ण व सुंदर आहे….
गुलाबाची फुले सुंदर…. जास्वंदी चे फुल अतिशय गुणकारी..तर..मोगरा सुवासित…..
कोकिळा उत्तम गाते….मोर सुंदर नाचतो तर सुगरण उत्तम घरट बांधते….असेच आपण सर्व आहोत प्रत्येका मध्ये कोणता ना कोणता सुप्त गुण लपलेला आहे ….त्याचा आदर करणं खूप गरजेचे आहे…
स्वतः ला कधीही कमी लेखू नये… १०^-१० मी. साइज असणारा अती अती सूक्ष्म असा अनु पण त्यात अफाट अशी ऊर्जा सामावलेली आहे…..अगदी तेवढीच ताकत आणि ऊर्जा ही प्रत्येकात सामावलेली आहे. ….प्रत्येक असाध्य हे साध्य करण्याची ताकत आपल्यात आहे फक्त त्यासाठी गरजेचं रसायन आहे ते म्हणजे…
“इच्छाशक्ती”……
इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आणि आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते साध्य करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा .. साध्य करण्यासाठी स्वतः ला झोकून द्या…बघा तुम्हाला अशक्य अस काहीच नाही…फक्त तुमच्या मध्ये जी अफाट शक्ती आहे तिला ओळखा आणि तिचा आदर करा….
एखादी गोष्ट तुमच्या कडे नाही आणि इतरांकडे आहे तर त्याचा न्यूनगंड बाळगू नका .. कारण जे तुमच्या कडे असेल ते कदाचित कुणाकडेच नसेल….
कोकिळे ला रूप नाही पण सर्वात गोड आवाज आहे.. मोर खुप सुंदर आहे पण गाऊ शकत नाही….त्यामुळे तुमच्या कडे जे आहे त्याचा आदर करा….. प्रत्येक जन वेगळा आहे आणि परिपूर्ण आहे…. मुळात मी तर म्हणेन तुलनेत आपला अमूल्य वेळ आणि मानसिक स्वास्थ्य वाया घालाऊ नये…
तुलना करायची च असेल तर स्वतःशी करावी… जीवनात काय मिळवलंय काय नवीन आत्मसात केलंय आणि आजुन काय साध्य करायचं आणि काय नवीन गोष्ट आत्मसात करायच्या आहे यात आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा…..
एक गोष्ट लक्षात ठेवा …जगात असे खुप लोक आहेत की ज्यांना दोन वेळच अन्न मिळत नाही… असे खुप लोक आहेत की ज्यांना अपंगत्व आहे… असे खुप लोक आहेत की जे परिस्थिती पुढे हतबल आहे…. त्यामुळे जे रूप आपल्याला मिळाले आहे … त्याचा आदर करावा…
जी परिस्थिती आपली आहे त्याचा आदर करावा…जे नाही त्यासाठी कुढत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आदर करा..आणि जे आहे ते अजून सुंदर कसं बनऊ शकतो यासाठी प्रयत्नवादी राहायला हवं…
जीवन खुप सुंदर आहे….फक्त त्याचा आदर करा आणि त्याला अजून सुंदर बनवा……
जिंदगी एक सफर है सुहाना……


