Skip to content

मी शिकलोय….आयुष्य समाधानाने कसं जगायचं !!

मी शिकलोय…………..


प्रा. राजरत्न खिल्लारे

(समुपदेशक)


मी शिकलोय कि आपण कधीच एखाद्याला आपल्यावर प्रेम करण्यास भाग पाडू शकत नाही. आपण फक्त स्वत:स एखाद्याच्या प्रेमास पात्र बनवू शकतो. अर्थात हे पुढील व्यक्तीवरही अवलंबून असते. मी शिकलोय कि विश्वासपूर्ण संबंध निर्माण करायला कित्येक वर्ष खर्ची पडतात, परंतु विश्वास तुटण्यास मात्र काही क्षणही पुरेसे असतात ! मी शिकलोय कि, आयुष्यात तुम्ही किती कमावालत हे फारसं महत्वाच नसत, महत्वाच असतं ते हे कि तुम्ही काय कमावालत.

मी शिकलोय कि, फार तर पंधरा मिनिट लोक तुम्हाला सहन करू शकतात. त्या नंतर तुम्ही तुमचं काहीतरी जाणून घेण / शिकण अपेक्षित असत. मी शिकलोय, आपण स्वत:ची कधीच कुणाशी तुलना करू नये . हे काम इतर लोक चांगल्या प्रकारे करू शकतात. मी शिकलोय कि, लोकांवर काय परिस्थिती ओढावते हे फारस महत्वाचं नसत महत्वाच असतं ते हे कि, त्या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात.

मी शिकलोय कि, एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही कितीही युक्तीवाद करा, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. मी शिकलोय कि आपण नेहमीच आपल्या प्रियजनांचा हसतमुखाने निरोप घ्यावा, कारण तुमची ती भेट कदाचित शेवटचीही असू शकते!! मी शिकलोय कि, आता बसं आता चालणे शक्य नाही असे म्हणता म्हणता तुम्ही बरंच अंतर पार करून जाता.

मी शिकलोय कि नायक ते असतात जे, काय करायला हवं तेच करतात. जेव्हां करायला हवे तेव्हांच करतात, व करत असताना परिणामांची चिंता करत नाहीत. मी शिकलोय काही लोक असेही आपल्याभोवती असतात जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, परंतु त्यांना फक्त ते व्यक्त करता येत नाही.

मी शिकलोय कि, कधी कधी मी रागावतो, मला रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु याचा अर्थ मला क्रूर होण्याचा अधिकार आहे असा मुळीच होत नाही. मी शिकलोय खरी मैत्री दूर राहूनही बहरू तसेच खरे प्रेमही.

मी शिकलोय, कि कुणी तुमच्यावर तुमच्या इच्छेप्रमाणे प्रेम करत नसेल तर याचा अर्थ ते तुमच्यावर अजिबात प्रेम करत नाही असा मुळीच होत नाही. मी शिकलोय मित्र कितीही चांगला असला तरी किमान एकदा तरी तो तुम्हाला दुखावणार आणि तरीही तुम्हाला त्याला मोठ्या मनाने माफ करावेच लागणार.

मी शिकलोय नेहमीच इतरांकडून माफी मिळवणे पुरेसे नसते. कधी कधी आपण स्वत:लाही माफ करायला देखील शिकले पाहिजे!

मी शिकलोय, केवळ मतभेद होतात म्हणजे त्या दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत नाहीत असा अर्थ होत नाही. वा दोन व्यक्तींमध्ये अजिबात मतभेद नाहीत म्हणजे त्या एकमेकांवर प्रेम करतात असेही नाही. मी शिकलोय कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्ती बद्दल त्याच्या कर्मास दूर ठेऊन विचार करावा लागतो.

मी शिकलोय कि, दोन व्यक्ती एकच गोष्ट बघतात परंतु त्यांचे संवेदन / दृष्टीकोन पूर्णत: वेगळे असू शकतात. मी शिकलोय परिणामांचा विचार ना करता जे स्वत:शी प्रामाणिक राहतात ते आयुष्यात फार पुढे जातात.

मी शिकलोय जेव्हा तुमच्याकडे द्यायला काही नसत, पण अशा परिस्थितीत मित्राने मदतीसाठी आर्त साद घातली कि तुम्हाला मदत करण्याचे आपोआप बळ येते. मी शिकलोय लिहिण्याने किंवा बोलल्याने भावनिक वेदना दु:ख हलके होतात.

मी शिकलोय ज्या लोकांची तुम्ही जीवनात खूप काळजी करता ते स्वत:ला तुमच्यापासून फार लवकर तोडतात. मी शिकलोय, चांगल असण आणि लोकांच्या भावना ना दुखवण या गोष्टींत सीमारेषा आखण फार कठीण असत. आणि त्याहूनही कठीण असत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहाण.

मी शिकलोय प्रेम करायला, आणि प्रेम मिळवायला!

मी शिकलोय…………..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!