Skip to content

तुम्ही सोशल मिडिया एडिक्टेड आहात का ? चला चेक करूया.

सोशल मिडिया एक एडिक्शन


नागेश मादेशी


सद्या लॉकडाऊन मुळे अनेक लोक घरी आहेत . बाहेर जाता येत नाही म्हणून अनेक लोक सोशल मीडिया वर जास्त connect आहेत काही लोक सोशल मीडियाचा आपल्या स्वतः च्या सर्वांगिण विकासासाठी वापर करत आहेत.

तर काही लोक मात्र social media च्या इतका अधीन गेले आहे की ते मोबाईल शिवाय राहूच शकत नाही, सूचत नाही, किमान अर्धा तास ऑनलाईन असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु याच्या पेक्षा जर जास्त वेळ पर्यंत चॅटिंग , Facebook, Instagram,twitter, WhatsApp अश्या social media वर जास्त वेळ घालवत असेल तर सदर Clint’s ला social media addiction झाले असे गृहीत धरले जाते.

एका सर्व्हे नुसार संपूर्ण जगात 20 कोटी पेक्षा जास्त लोकांना social media addiction असू शकतो असा अंदाज केला जातो. डोपामिन (Dopamine) नावाच्या रसायन मध्ये बदल झाल्यामुळे सदर social media addiction हा मनोविकार आजार होतो .

यामुळे आपल्या स्वतः व्यक्तिगत आयुष्य, कौटुंबिक वातावरण , सामाजिक जीवन अश्या सर्व पातळीवर माणसाचे नुकसान होते. यामुळे खर काय आणि खोट काय आहे हे सर्व विसरून जातो .

Social media addiction ची लक्षणे

1)खूप वेळ social मीडिया वर online असणे.

2) आपल्या पोस्टला किती लाईक्स आणि comments आलेत हे वारंवार चेक करत राहणे

3)किती लोकांनी माझे पोस्ट वाचले, किती लोक शेअर केले हे तपासत राहणे

4) सकाळी उठल्याबरोबरच आणि रात्री झोपताना वारंवार मोबाईल हातात घेऊन चेक करत राहणे

5) सण साजरा करताना , लग्न समारंभ संपन्न होत असताना मोबाईल वर सेल्फी काढणे खूप महत्वाचे वाटून त्यामध्येच गुंग असणे.

6) मोबाईल ची बॅटरी उतरली की खूप उदास होणे.

असे वरील काही लक्षणे तुमच्या मध्ये दिसत असेल तर , विचार चक्र जर तुमचा मनात सतत चालू असेल तर कदाचित तुम्हाला social media addiction झाले असेल याची खातरजमा करून घ्यावी.

स्वतः च्या मनाला वारंवार विचारा की वरील लक्षणे माझ्या मध्ये तर नाही ना ?

जर असेल तर ते कमी करण्यासाठी चिंतन मनन करा, स्वतः स्वीकार करून त्यातून लवकरात लवकर बाहेर कसे पडता येईल याकडे लक्ष द्यावे, ध्यान धारणा करा, जास्तीत जास्त छंद जोपासा, व्यायाम करा, चांगले पुस्तक किंवा कांदबरी वाचन करणे, गाणी गाणे , गाणे ऐकणे, सायकल चालवणे ,असे अनेक छंद जोपासणे.

या आभासी जगातून (virtual) बाहेर पडून, वास्तव जगात( Real Life) येण्यासाठी प्रयत्न कराल असे नम्र आवाहन करतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!