आयुष्यातील स्थिरता
नम्रता पवार
प्रत्येकाच्या आयुष्यात स्थिरता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.तसेच स्थिरते सोबतच समतोल असणे हेही महत्त्वाचे आहे.म्हणजे जर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू आपण एका डोळ्याने पाहिली तर ती एका ठिकाणी दिसते. परंतु त्याच क्षणी लगेच आपण तीच वस्तू दुसऱ्या डोळ्याने पाहिल्यास ती त्या ठिकाणी दिसत नाही. परंतु दोन्ही डोळ्यांनी एकत्र अशी पाहिली, तर त्याच तिच्या मूळ ठिकाणी स्तिर दिसते.
तसेच आपल्याला ही आपले आयुष्य व त्यामध्ये घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी यामध्ये “समतोल” व “स्थिरता” राखता आली पाहिजे.म्हणजेच जशा नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक व्यक्तीच्या नेहमीच दोन बाजू असतात. त्यामुळे नेहमीच जसे दोन डोळे उघडून एकसात पाहिल्यास वस्तू स्थिर दिसते. त्याच प्रमाणे आपण आपल्या आयष्यातील काही गोष्टींचा समतोल राखला पाहिजे.म्हणजेच त्या समतोलामुळे आपल्या आयुष्यात स्थिरता निर्माण होऊ शकते.
जसे की आपल्या आयुष्यातील अनेक भावना या ही तितक्याच महत्वाच्या म्हणजेच एक प्रकारे अविभाज्य घटक आहेत. व त्या भावनांचा आपल्या आयुष्यावर नेहेमीच सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होताना आपण पाहतो.
म्हणजेच आपल्या भावनेचं आपल्या आयुष्यात एक ठराविक स्थान आहे. म्हणजेच जर ती भावना तीव्र असतील, तर आपण त्याचां जास्त विचार करतो. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील ध्येयापासून दूर होऊ लागतो.
तसेच जर भावना तीव्र नसेल आणि सावधान पूर्वक जर असेल तर ती भावना नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरते. म्हणजेच एखाद्या आव्हानाला “मी आता कसे सामोरे जाऊ” या पर्यायाचा विचार करतो.
म्हणजेच आपल्या आयुष्यात तीव्र भावना किंवा कमी तीव्र भावना अशा गोष्टीमुळे ही समतोल साधला जाऊ शकणार नाही. म्हणजेच तीव्रता कमी असेल तर माणूस निष्काळजी बनतो आणि तीव्रता जास्त असेल तर व्यक्ती अनेक समस्यांमध्ये भरकटते.
म्हणजेच येथे ही आपल्या भावनामध्ये समतोलता असणे. अत्यंत आवश्यक आहे.


