जीवन म्हणजे काय ? हे जरा समजून घेऊया !!!
प्राजक्ता खरात
जीवन म्हणजे काय?
जीवन म्हणजे नेमकं काय?हा प्रश्न सगळयांना पडलेला असतो..चला मग आपण जीवन म्हणजे काय हे जरा समजून घेऊ.
“जीवन म्हणजे दोन नद्यांचा संगम.एक नदी म्हणजे सुख आणि दुसरी नदी म्हणजे दुःख.” सुखात सगळे आपल्या सोबत असतात.आणि दुःखात काही मोजके माणसे सोडली तर कोणी सोबत नसते. यालाच तर जीवन म्हणायचे.म्हणजेच् जीवनाच्या प्रवासात खुप माणसे भेटतात.काही चांगलें भेटतात. काही आधार देतात.काही फायदा घेतात.
माणुस हा असा प्राणी आहे की,जीवन जगत असताना थोडेफार कमवायच्या नादात जीवन जगायचे गमावुन् टाकतो…आणि नंतर लक्षांत येत कि जीवन जगायचं राहील.जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचा मांडलेला खेळ आहे.कधी जीवनात खुप अशा,अपेक्षा असतात आणि कधी खुप आशेची निराशा आणि अपेक्षा चा अपेक्षा भंग होतो.पण यामध्ये कधीच खचून ,ड़गमगुन् न जाता परत जोमाने उभें राहायचे यातच जीवनाचा खरा आनंद आहे.
“जीवन जगत असताना हे नेहमी लक्षात घ्यायचे म्हणजे तुम्हाला हवे तसें जगा.लोकांचा विचार करू नका.आणि समाधानी राहा .जे आहे त्यात समाधानी राहा.त्यात सुख शोधा.असेही होऊ शकते जे आज तुमच्याकडे आहे ते सगळया कडे असेलच असे नाही.
जीवन जगात असताना काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर जीवनामधे खुप प्रोब्लेम आले तरी काही जास्त फरक पडणार नाही.
१) साधी राहणी( म्हणजे वेळ आणि ममाणसे बघून ) आणि उच्च विचार ठेवले ना कुणीही आपले काही करू शकत नाही.
२) सगळयांना समजून घ्या.आणि प्रत्येकाला विचार मांडायला प्रधान्य द्या.आपलेच खरे आहे .हि भूमिका जरा बाजूला ठेवून सगळयांना समजून घ्या.म्हणजे समजून घेणारा खुश आणि आपण हि खुश.
३)जीवनात कधी लहान होऊन जगायचं असते आणि कधी मोठे होऊन जगायचे असते.म्हणूनच प्रत्येकाचा आदर करा.,”Take Respect Give Respect”.
४) लहान मुलांच्या कामाला प्रोत्साहन द्या.मोठ्यांना सपोर्ट करा.
या गोष्टी जर तुम्ही पण लक्षात घेतल्या तर जीवन खुप सरळ आणि साधे होईल.
जीवन म्हणजे खरंच कधी न सुटणारे कोडे असते.खरंच जुनी लोक बघा खुपच साधी जीवन जगायचे पण खुप सुसुखी सम्पन्न असायची.खूप माणुसकीही असायची.त्या मातीच्या घरात पण प्रेम आणि माया असायची.आताच्या धावपळीच्या जगात कोणी स्वतःसाठीच जगत नाही तर कुठे हरवली ती माणुसकी .म्हणून स्वतःसाठी जगा.तुमच्या मनाशी बोला.आज फिरावं वाटल तर मनसोक्त फिरा.एखाद्या डोंगरावर जाऊ वाटल तर जा..काही खाऊ वाटले तर खाऊन घ्या.नाहीतर म्हातारपणी उगाच मनाशी म्हणायला नको जीवन जगायचे राहून गेले.
प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला.दुसऱ्याला आनंद देत चला.यात आपले समाधान आहे .तुम्हाला आनंद भेटतो आणि दुसऱ्या ला पण आनंद भेटतो.
“जीवन असे आहे की काही क्षण तुम्हाला रडवून जातील.आणि काही क्षण हसवून जातील.म्हणूनच या जीवन रुपी प्रवासातला एक एक क्षण तुम्हाला जीवन जगणं शिकून जाईल….,,”!
“जीवन म्हणजे खरंच पाहिले तर जन्म आणि मृत्यु यामधला प्रवास.”
सुखाने जगला तर अजून जगवा वाटणारा प्रवास..आणि दु: खाने जगाल तर न जगू वाटणारा प्रवास”
म्हणूनच मला एक जीवनबद्द्ल कविता सुचते.
जीवन म्हणजे काय असते
तुमचे आमचे सेम असते,
कधी अशा,कधी निराशा,
कधी हसू ,कधी आसू,
कधी उन्ह ,कधी पाउस.
जीवन म्हणजे काय असते
तुमचे आमचे सेम असते……….
खरंच या जीवनात असे आहे की तुम्ही किती पैसा कमवला हे तुम्हला कुणीच विचारत नाही.पण किती माणसे कमवली हे एखाद्याच्या अन्तविधिला गेल्यावर कळते, कि त्याला किती माणुसकी होती.
जीवनात चढ -उतार होतच असते.उन्ह सावली चा खेळ चालू राहणार असतो.त्यामुळे मन कायम स्थिर ठेवायचे.आणि येणाऱ्या
संकटांवर मात करायची.उलट असे ठरवायचे कि संकटाला मी challenge करणार.काही असेल तरी सकारात्मक विचार( positive thinking) खुप महत्वाची आहे.
खरंच जीवन म्हणजे कधी न सुटनारे एक कोडे असते.कधी कधी खुप हसायला लावणारे,आणि कधी खूप रडायला लावणार हे जीवन आहे.काही वेळीं माणुस खुप यश मिळवत असतो,पण कौतुक करायला कुणीच नसते त्याच्याकडे.
म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती कायम आपल्या सोबत ठेवा कि जिच्या सोबत आपण सगळं share करू शकतो.जीवन जगत असताना पैसा पैसा करून जगू नका.तो पैसा आपल्या वर खर्च करा.उगाच पुढच्या पिढीसाठी साठवून ठेऊ नका.
म्हणूनच strong रहा, happy रहा,healthy रहा.जीवनाला challenge करा.आणि या “जगन्यावर शतश्: प्रेम करावे”.



khup chan aahe mi pana sodun dene garjece aahe.
Best
KHUP CHAN
खूप छान