Skip to content

पाय दाबायच्या हेतून काका ‘ति’ ला हाक मारायचे, आणि…..

she too… (सत्य घटना)


शेजारी राहणारी निता जेव्हा तिच्या काकानी (मावशीचा नवरा) आवाज देऊन ही जाईना. तेव्हा मी स्वतः तिला सांगितले तुझे काका तुला बोलवतं आहे बघ काय काम आहे. पण ती काकांकडे जरा ही न बघता घाबरतच माझ्या घरात येऊन दिसणार नाही अशा ठिकाणी बसली.

‘मि जाणार नाही मला जायचं नाही ‘असे बडबडतच.

निता… मी रहात असलेल्या वस्तीत अगदी माझ्याच शेजारी आजी आजोबा मावश्या सोबत राहणारी मुलगी.

वय वर्षे जेमतेम 12/13 असेल. तिची एक मावशी ही समोरच्या चाळीतच रहात. बर्‍याच दा निताला ती शाळेतून आल्यावर घरकामासाठी बोलवून घेत. व स्वत मात्र चाळीतल्या बायकांसोबत कधी शाॅपिंग तर कधी सिनेमाला जात असे. हे माझ्या ही निदर्शनास आले होते.

निता जेव्हा काकांकडे जाण्यास घाबरली तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली . पण तिला बोलतं कसं करावं हा ही प्रश्न होताच. मग काही मनाशी ठरवून मी तिच्या काकाची स्तुती करू लागले ते कसे तुझ्या वडीलांसारखे आहे. आपल्या वडिलांना गरज असती तर आपण गेलोच असतो.. शिवाय तुझ्या मावशीला कळले तर तिला किती वाईट वाटेल. आणी नेमका व्हायचा तोच परीणाम झाला तिला काकां विषयी चांगले बोललेलं मुळीच आवडलं नाही. (बहूतेक इतक्या दिवसांचा राग उफाळून आला असावा) ती रडू लागली मी तिला रडत असताना माझ्या मिठीत घेऊन तिला तु माझ्या जवळ सेफ आहे असे बोलून आश्वस्त केले. तू मला सांगितले नाही तर मी तुझी कशी मदत करणार? माझ्या वर विश्वास ठेव मी सगळ व्यवस्थित करेन. खर तर माझाही त्यांच्या घरातला वावर अगदी कुटूंबा सारखाच होता. तिची धाकटी मावशी माझी बेस्ट फ्रेंड होती.

निताने जे सांगितले ते ऐकून माझ्या काळजाचा थरकाप उडाला. निताचे काका तिचं लैंगिक शोषण करत होते. कुठल्याही निमित्ताने बोलावून ते तिला हातपाय दाबायला लावत त्याचवेळी ते तिला स्वताच्या लिंगाला ही हात लावायला सांगत कधी तर ते स्वतच तिला बाहेर काढून दाखवत. तिला ही ते गच्च मिठीत घेऊन तिच्या सर्व अंगाला स्पर्श करत. गालाचेही चावे घेत.

खुप भयंकर वाटत होते हे सर्व ऐकतांना. आणि काकाविषयी चा संताप ही वाढत होता. मी तिला मदत करायची ठरवले. तिला माझ्या कुशीत घेऊन मी या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला.

रात्री माझी मैत्रिण म्हणजे निताची मावशी. आम्ही दोघेही वाॅकींगला बाहेर पडलो. मी तिला हा सर्व प्रकार माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीसोबत घडतोय असे सांगून सुरवात केली. ती घरी सांगत नाही त्या व्यक्तीला घरात खुप मान आहे. तिच्या वर घरात कुणी ही विश्वास ठेवणार नाही असं तिला वाटत. तीची मनस्थिती सध्या खूप वाईट आहे याचा परिणाम म्हणून तिचे आभ्यासातही लक्ष लागत नाही. हे ऐकून मावशीचा ही संताप झाला त्या मुलीने ही गोष्ट घरच्यांना विश्वासात घेऊन सांगावी व काकाला अद्दल घडवावे असे मत व्यक्त केले.

खात्री पटल्यावर हे प्रकरण तुझ्या घरात घडतोय निताच्या बाबतीत तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

मि तिला हे सर्व प्रकरण निताला विश्वासात घेऊन हळुवार हाताळायला सांगितले. त्याचरात्री मावशीने निताला सोबत घेऊन घरच्यांबरोबर हा विषय मांडला आणि निताला न्याय तर दिलाच व तिचा विश्वास ही मिळवला.
आता मावशी आणि भाचीची भिंत मोडून पडली होती.
यापुढे दोघींमध्ये मनमोकळा सुसंवाद साधणार होता.

अगदी मैत्रिणी सारखा.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!