Skip to content

काही वर्षांपूर्वी मी खूपच निराशेच्या गर्तेत सापडले होते.

काही वर्षांपूर्वी मी खूपच निराशेच्या गर्तेत सापडले होते.


सुजाता गंगातीरकर


‘सुंदर लिहितेस……’

….आणि मी लिहायला बसले.

भावनांना शब्दात उतरविण्यासाठी पेन आणि कागदाची मदत घेतली…

सुंदर लिहितेस….

हे 2 शब्द प्रेरणा बनून आले आणि मी लिहायला बसले. गेल्या काही दिवसांपासून ‘ MANY LIVES MANY MASTERS BY DR. BRIAN WEISS’ वाचतेय आणि त्यावर विश्वास बसत गेला म्हणून अजून वाचत गेले. कारण तशा गोष्टी घडत गेल्या , घडत आहेत. कर्माचा सिद्धांत समजू लागला.

पुढे असे पण म्हणता येईल की आजपर्यंत घडलेल्या सर्व, अगदी सर्व गोष्टींची आणि त्यामागील पार्श्वभूमी ची सांगड घालता येऊ लागली. प्रत्येक गोष्टीला, परिस्थिती ला thanks म्हणता येऊ लागले. खरंच सांगते , प्रत्येक परिस्थितीला, आयुष्यातील प्रत्येक घटनेला, व्यक्तीला Thanks म्हणणे खूप छान वाटते. वेगळाच आनंद देऊन जाते.

Thanks या शब्दातील जादू कळत जाते. स्वानुभव घेऊन पहा. त्यातील दुवे शोधत असतांना येणारा आनंद खूपच आश्चर्यकारक होता.. आज ही आहे. आयुष्यात settle होतांना बऱ्याच घटना अचानक घडतात. काहीच कारण नसतांना काही चांगले काही वाईट घडतच असते. त्याला आपण LAW OF ATTRACTION म्हणू शकतो . कर्माचा सिद्धान्त म्हणू शकतो. आणि विश्वासाने accept केले ना सर्व की दुःखाला जागाच उरत नाही.?

त्याला आपण प्रेरणा म्हणू शकतो. एक सकारात्मक ऊर्जा म्हणू शकतो. तथ्य इतकेच की ते पूर्णतः सत्य आहे यावर माझा विश्वास आहे. तुम्ही पण अंतर्मुख होऊन विचार केलात तर याच अनुमानाला येऊन थांबाल . आणि जर तसे झाले तर तुमची ऊर्जा , तुमची ताकद विधायक कामासाठी नक्की लावाल. लावा.

७-८ वर्षांपूर्वी आयुष्यात खूप च निराश , नाराज होते. असंख्य गोष्टी मनाविरुद्ध च घडत होत्या. नातेवाईक, कुटुंब, मित्र मैत्रिणी (खूप असून पण)या सर्वांपासून मी दूर होते… त्याची उजळणी पण नको वाटते मला. खरंतर ते विसरले आहे आता…? त्याची जाणीव पण नव्हती फक्त रडायचे इतकंच कळत होतं. पण कारण ही मीच असेन. मीच सुखाचा शोध घ्यायला अपुरी पडले असेन. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येतोच. यायला च हवा.

पण आता मात्र situation पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्या परिस्थितिला मी आज thaks म्हणू शकतेय…म्हटलं तर काहीच वेगळं नाही झालं. लोक तीच, मी तीच, राहणारी जागा तीच, व्यवसाय तोच, बदलली ती ‘मनाची अवस्था’.

आणि ती बदलण्यासाठी येत गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचे मनाला झालेले स्पर्श… हृदयात निर्माण झालेल्या भावना मला बदलायला भाग पाडत गेले. माझ्या मनाचे मानसशास्त्र मला कळू लागले. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्ती मला मदत करायला तयार होत्या.. त्या आधी पण होत्या माझ्या मनाची शक्ती जागृत नसावी.

ती तुम्हांसर्वांमध्ये असते ही जाणीव मला करून द्यावी असे वाटले आणि लेखणीची मदत घेतली..??

आणि आता ते सर्व मला रोमांचकारी, रहस्यमय वाटतंय. ते सगळे माझे प्रेरणा स्रोत बनत गेले. मला ऊर्जा देत strong बनवत गेले. यात माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा वाटा. कधी कोणत्या वळणावर माझेच विद्यार्थी माझे mentor बनले कळलेच नाही. त्याची संहती शब्दात सांगताच नाही येणार. ‘THE SECRET’ असेच आले आयुष्यात. अनंत उपकारच म्हणायला हवे. सांगायचे हेच की या प्रेरणेचा शोध घेत राहा. सापडते.

कोणी ना कोणी , कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही प्रेरणा देत असते फक्त आपल्याला त्या लहरींबरोबर match होता आले पाहिजे. मनाची नजर शोधक असली पाहिजे. इच्छाशक्ती तीव्र असली पाहिजे.

तसे मला भरपूर मित्र मैत्रिणी. पण आयुष्याच्या मधल्या एका वळणावर सगळेच अदृष्य होते. ते ही आता positively घ्यायला जमायला लागले आहे. ? तो आमवस्येचा काळ खूप शिकवून गेला. मोठं करून गेला. खूप भरभरून देऊनच गेला. कोणत्या ना कोणत्या सुखद अपघाताने वेगवेगळ्या वळणावर सर्व नाती मित्रमैत्रिणी परत येऊ लागले. नव्या नात्यांनी, नव्या भावनांनी.

लिहायची उर्मी आधीपासूनच होती. आवड होती. पण त्याची जाणीव नव्हती. अक्कल नव्हती. हातात Smart phone होता पण त्याचा खरा उपयोग माहीत नव्हता. पण या परत आलेल्या मित्रपरिवरामुळे ‘आपलं मानसशास्त्र’ ला join झाले. ती पण दैवी घटनाच म्हणू ना आपण. सगळं ठरलेलं, सगळं planned यावर विश्वास बसला. वाचता वाचता मनात काही न काही लिहीत गेले. आणि परत अचानक कोणीतरी म्हणाले…

‘सुंदर लिहितेस’

आणि मी लिहायला बसले. केवळ 2 शब्द नव्हते ते तर परत एक ‘प्रेरणा..’ एक ऊर्जा…. आहे माझ्यासाठी. माझ्याकडे पाठवलेली…. आणि मी लिहायला बसले पुन्हा लेखणी थांबू नये या इच्छेनेच.

खरंतर ‘कोरोना’ चे आभारच मानायला हवेत. त्याने वेळ दिला निवांत अंतर्मुख होण्यासाठी…एकंदरीत आयुष्यातील सर्वच प्रेरणांचे आभार च मानायला हवेत. मनावरचे ओझे उतरते आणि जो जो माझे प्रेरणास्थान असेल त्या स्रोता च्या हृदयापर्यंत पोहोचेन असे वाटतंय.

परत एकदा Thanq to Universe
मला आलेला अनुभव share करावा वाटला म्हणून लिहिले..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!