एक संधी जीवनाला
स्वप्नजा स्वप्निल करजगी
खरचं जगणं इतकं महाग झालं का ? आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण व्हावा . जन्माला आलेला प्रत्येकजण मरणार आहेच.
अस असताना सुद्धा सारखं मरण का पत्कराव ?
अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवून जाण्यापेक्षा इथेच आपल्या माणसात राहून उत्तर शोधली पाहिजेत… प्रश्न आहेत तशी उत्तर आहेत फक्त शोधली पाहिजेत.. त्याकरता जगलच पाहिजे..
खर तर आत्महत्या हा गुन्हा आहे , पण तो केल्यावर शिक्षा मात्र आपल्या माणसांना मिळते..बऱ्याच वेळा नैराश्य किंवा उदासीनता , नातेसंबंधाचा गुंता , नशा , अशा अनेक गोष्टी मानसिक ताणतणावाला कारणीभूत असतात.
पण नऊ महिने कष्ट घेऊन आपल्याला जन्म देणाऱ्या आईला काय त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेली बरी. तिच्यासाठी तर तीच बाळ म्हणजे नवनिर्मिती असते..
सतत काबाडकष्ट करत असलेल्या वडिलांना काय वाटत असेल ? आपण कुठे चुकलो हाच विचार ते शेवट पर्यंत करत बसतील..
सध्याच्या पिढीतल्या मुलांना माझे हे सांगणे आहे… नकाराचे रुपांतर संधीत करा अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा , यश कसे मिळेल इकडे लक्ष द्या. आयुष्य हे बोर्ड परीक्षे सारखं राहू द्या.
प्रीलियम परीक्षेला नापास झालात तरी चालेल पण आयुष्याच्या लढाई मध्ये नेहमी टॉप राहायच . त्यासाठी खूप जगलच पाहिजे होणारा त्रास विसरून जा त्यासाठी जगणं विसरू नका..
नसलेल्या गोष्टीची हुरहूर का लावून घ्यावी मनाला… संयम मनावर आणि विश्वास स्वतःवर ठेवा.


