Skip to content

आपला हसरा चेहरा ही प्रसन्न मनाची निशाणी आहे!!

आपला हसरा चेहरा ही प्रसन्न मनाची निशाणी आहे.


सौं. शीतल चंद्रशेखर पाटील


“मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर
किती हाकला हाकला फिरी येती पिकावर “

बहिणाबाई यांच्या या कवितेच्या ओळी मनाबद्दल किती अचूक माहिती देतात. मनासारखा चंचल काहीच नाही. ते स्तिर कधीच नसते. फुलपाखरासारखे इकडून तिकडे हेलपाटे घालत असते. शरीर स्वस्थ असणे जितके गरजेचे त्याहून अधिक मनाचे स्वास्थ महत्त्वाचं.

मग मानसिक आरोय हणजे काय? जीवनात येणाऱ्या सर्व संकटाना सक्षमतेने सामोरे जाणे, सुखद व दुःखद घटनांचा तोल सांभाळता येऊन समाजासाठी काहीतरी योगदान देणे होय.

स्पर्धात्मक युग, सर्व मिळवण्याची जिद्द अपमान अपयश पचवता न येणे आणि या धावपळीच्या व धकाधकीच्या स्पर्धेत मी सर्वात उत्तम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यात मनाचा विचार करायला वेळच कुठेय?

तरुण पिढी मानसिक स्वास्थ्याचा अभावापायी व्यसनाधीन होत चाललीय. अतिशय शुल्लक कारणावरून आत्महत्या सारख्या गुन्ह्याकडे वळत जातेय. ही आजची शोकांतिका आहे.

मी सुंदर दिसले पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, स्टेटसने लाइफ जगले पाहिजे असा सर्वांचा हट्ट. मग चला यशस्वी आयुष्यासाठी मनाचे आरोग्य सांभाळुया. भरभरून हसा, योगा करा, मेडिटेशन करा, स्वतःसाठी दिवसभरातून एक तास तर द्या. तुम्हाला आवडेल ते करा गाणी एका, नाचा, मनमुराद बोला, कोणाविषयी राग मनात धरू नका, कुणासोबत तरी मनातले बोला, आनंद -दुःख व्यक्त करा. स्वतःच्या मनाबरोबर इतरांच्याही मनाची काळजी घ्यायला शिका.

मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊया “मानसिक आरोग्य जापूया प्रत्येक क्षण सोनेरी बनवूया”. माझं मानसिक स्वास्थ व इतरांचे मानसिक स्वास्थ जपणे ही माझी जबाबदारी आहे. मानसिक स्वास्थ उत्तम असेल तर आपण आत्मविश्वासाने वावरू शकतो. नेहमी मनाला आनंदी ठेवा. लक्षात असुद्या “चांगले मानसिक आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे “.

तुमचा हसरा चेहरा ही प्रसन्न मनाची निशाणी आहे. सर्वाना आनंद वाटत रहा मन आपोआपच आंनदी आणि स्वस्थ होईल. निसर्गाचा नियमच आहे चांगले देत रहा चांगलेच मिळत राहील. आपलं मन आपल्या आयुष्याचे अस्तित्व आहे. सकारात्मक विचार करा आनंदी रहा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!